श्रीगोंद्यात पोलिस निरीक्षकालाच गंडा ! 

श्रीगोंदे – ठाणे जिल्ह्यात नोकरीला असलेल्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या नावे श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ येथे जमीन होती. काही लोकांनी बनावट आधार कार्ड बनवून ही शेतजमीन परस्पर विकली.  या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वेल्हा (पुणे) येथील किशोर चंद्रकांत पासलकर हे ठाणे जिल्ह्यात पोलिस निरीक्षक असून त्यांच्या पत्नी मीना पासलकर यांच्या नावे … Read more

…तर त्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू – आ. जगताप

अहमदनगर  – शहरात मागील अनेक दिवसांपासून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून, त्या माध्यातून प्रतिष्ठीत लोकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडत आहेत.  अशा प्रकाराचा अन्याय यापुढे कोणावरही होऊ देणार नाही. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना उघडे पाडून शहरातून बाहेर काढू, असा इशारा देतानाच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची माहिती पोलिसांकडून मागवून घेणार असून अशांवर कारवाईची मागणी करणार … Read more

नगरसेविका सारिका भुतकर यांचे नगरसेवक पद रद्द !

  अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या प्रभाग सहा अ मधील विद्यमान नगरसेविका सारिका हनुमंत भुतकर यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गातून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांची ही दुसरी टर्म होती. मागील महापालिकेत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले होते. मात्र जातपडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्दबातल … Read more

लाच मागणारा जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गजाआड

नगर – वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी १३ हजारांची लाच मागणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. राजेंद्र सुधाकर नेहूलकर असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. तक्रारदाराच्या मुलाचे वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने दहा टक्क्यांप्रमाणे १३०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १२०० रुपये स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने ही कारवाई … Read more

त्या  आरोपींना फासावर द्या 

पारनेर :   दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे झाली, तरी अद्याप शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करून निर्भयाला न्याय मिळावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २० डिसेंबरपासून मौन आंदोलन सुरू करणार आहेत.  यासंदर्भात हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात … Read more

पण त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील सम्राट ‘बारा-शून्य’ करू असा नारा देत होते. त्यांना गर्व झाला होता. साधन संपत्ती त्यांच्या हाती होती, पण त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीप वळसे यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना नाव न घेता लगावला. नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण … Read more

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक महिनाखेरीस निवड? ही नावे चर्चेत…

अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. या पदासाठी विद्यमान अध्यक्ष शालिनी विखेंसह राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, काँग्रेस थोरात गटाच्या अनुराधा नागवडे, राष्ट्रवादीच्या प्रभावती ढाकणे यांची नावे चर्चेत आहेत.  मंत्री बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर … Read more

ताब्यात घेतलेले जेसीबी, डंपर तस्करांनी पळवले

पारनेर : गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी जापनीज हबमध्ये ताब्यात घेतलेले दोन जेसीबी व एक डंपर कंपनीचा पत्रा तोडून मध्यरात्री कारवाई सुरू असतानाच पळवून नेण्यात आला. एक पोकलेन पळवून नेण्याचा प्रयत्न पथकाने हाणून पाडला. मायडीया, कॅरीअर व मिंडा या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उभारणीचे काम सुरज बिल्डकॉन व ईसीआर या नामांकित बांधकाम कंपन्यांकडे आहे. या कंपन्यांनी गौण खनिजाचा … Read more

काकडी प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घ्या

कोपरगाव : देशाच्या व जगातील साई भक्तांना शिर्डी येथे साई दर्शनाला येण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे माजी आमदार अशोकराव काळे यांनी विमानतळ आणले होते. या विमानतळासाठी काकडीच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी भूसंपादित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी विमान प्राधिकरनाणे या प्रकप्ल बाधित शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र आजपर्यंत विमानप्राधिकारणाने अजूनही अनेक आश्वासनाची पूर्तता … Read more

तिजोरीत भाजपा सरकारने खडखडाट करून ठेवलाय – मंत्री बाळासाहेब थोरात

राज्याच्या  : मंत्री थोरात राज्याच्या तिजोरीत मागील सरकारने खडखडाट करून ठेवला : मंत्री थोरात श्रीदत्त व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण सोहळ्यात बोलताना . संगमनेर: महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. मागील सरकारने तिजोरीत खडखडाट करुन ठेवला, परंतू नवीन सरकार यातून मार्ग काढणार आहे. निळवंड्यासह अनेक अपूर्ण कामे पूर्ण करावयाची असून समृध्द व संपन्न तालुक्यासह … Read more

कांद्याला वीस हजार भाव बळीराजा सुखावला

नेवासे: तालुक्यातील घोडेगाव उपबाजारात रविवारी जुन्या गावरान कांद्याला वीस हजार, तर नवीन लाल कांद्याला दोन ते बारा हजार क्विंटल दर मिळाला. नवीन कांद्याची साडेपंधरा हजार गोण्या आवक झाली. बाजारात साडेतीन कोटींची उलाढाल झाली आहे. लिलावातील पारदर्शकता, समितीचे नियंत्रण व आमदार शंकरराव गडाखांचे लक्ष असल्याने या बाजार समितीत जिल्ह्यात सर्वाधिक भाव मिळतो व लगेचच रक्कम अदा … Read more

नायलॉन मांजामुळे गळा कापला

कोपरगाव : सोनारी येथील सुकदेव आघाव हे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धारणगाव रस्त्याने दुचाकीवरून जात असताना चिनी बनावटीच्या नायलॉन मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. ते गंभीर जखमी झाले आहेत. शहरात हा धोकादायक मांजा सर्रास विकला जात असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. त्याबद्दल जनतेत चीड निर्माण झाली आहे. आघाव हे संजीवनी … Read more

कारखान्याच्या हलगर्जीपणाने ३३ संस्था सदस्य ठरले अक्रियाशील

श्रीगोंदे:  नागवडे सहकारी साखर कारखान्याने सहकार कायद्याच्या कलम २६ (२)( ब ) नुसार दरवर्षी वित्तीय वर्षे संपताना ४३ संस्था सदस्यांचे क्रियाशील आणि अक्रियाशील असे वर्गीकरण करून, त्याला संचालक मंडळाची ठरावाद्वारे मान्यता घ्यावयास हवी होती.  त्यानंतर ३० एप्रिल अखेर अक्रियाशील संस्था सदस्यांना विहित पध्दतीने ( पोच घेऊन) नमुना डब्ल्यू नुसार कळवावयास हवे होते व तरतुदीतील निकषांची … Read more

एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला

राहुरी : शहरातील  नगर-मनमाड मार्गावरील राहुरीच्या बसस्थानकासमोरील काॅम्प्ल्केसमधील स्टेट बँक शाखेचे एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. पोलिस आल्याचा सुगावा लागताच टोळीतील ५ चोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. पळून जाणाऱ्यांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बसस्थानकासमोरील गाळ्यात असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. पाच चोरांच्या टोळीने एटीएम केबीनमध्ये प्रवेश करून … Read more

उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक: खा. सुजय विखे पाटील

नगर : शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी मािहती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खासदार डाॅ. सुजय विखे यांनी नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते … Read more

प्लास्टिक उत्पादनावर निर्बंधासाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार : आमदार जगताप

नगर : शासनाच्या धोरणानुसार प्लास्टिक बंदी कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर संबंधितांवर कारवाई होत आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने ५० मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या वस्तू असूनही त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळे आपण संबंधित पथकाला खातरजमा करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच दंडात्मक रकमेबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले … Read more

वाडिया पार्कमधील अनधिकृत इमारतीवर कारवाई 

अहमदनगर : शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या इमारतीवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार ही इमारत जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत आहे. मोठी इमारत पाडल्यामुळे शहरातील अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत. मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी काहींनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे धाव घेतली … Read more

नापिकी, दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड: सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती, परतीच्या पावसामुळे पाण्याखाली गेलेली पिकं यामुळे अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली असलेल्या तालुक्यातील सरदवाडी येथील अप्पासाहेब रावसाहेब गंभिरे (वय ४८) या शेतकऱ्याने कुसडगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुळे परिसरात शोककळा पसरली. अप्पासाहेब गंभिरे हे गुरुवारी जामखेडवरून सरदवाडी येथे दुपारी घरी गेले होते. आपला मोबाइल घराबाहेर ठेवला … Read more