राम शिंदेंनी बांधली विखेंच्या विरोधात माजी आमदारांची मोट ?

नगर: अहमदनगर जिल्हा  भाजपमध्ये आता पर्यंत गांधी – आगरकर दोन गट असल्याची चर्चा होती. पण आता  माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिसरा गट भाजपमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच भाजपची  बैठक माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून शिंदे यांनी विखे यांच्याविरोधात नाराजांची मोट बांधल्याची … Read more

बापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता पण ते गेल्यानंतर नागवडे कारखान्याची वाईट अवस्था

श्रीगोंदे: शिवाजीराव नागवडे यांनी सहकार चळवळ उभी करून कारखान्याची उभारणी केली. तळागाळातील शेतकऱ्यांनी पैसे दिले. बापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता ,पण बापू गेल्यानंतर कारखान्याची वाईट अवस्था झाली असून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हुकूमशाही सुरू केली असून कारखान्याच्या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवून सुडाचे राजकारण करत आहेत, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब … Read more

भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाहीवर घाला

संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार घटनेच्या तत्त्वावरील असून सामान्य माणसाच्या विकासाचे आहे, तर भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मंत्री झाल्यानंतर प्रथमच शुक्रवारी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन यशोधन इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. मंत्री थोरात म्हणाले, भाजपचा कारभार म्हणजे राजकारणातला … Read more

बाळासाहेब थोरात यांच्याकडून दादापाटील शेळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

नगर : राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांच्या खारे कर्जुने (ता. नगर) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी शुक्रवारी दुपारी शेळके कुटुंबीयांची भेट घेतली. दादापाटील शेळके हे शेतीनिष्ठ असे व्यक्तिमत्त्व होते. कृषी, … Read more

विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी ; एक बेशुद्ध

राजुरी : प्रवरा परिसरातील एका शाळेत गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शाळा भरण्याच्या वेळेस मुलांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. यामध्ये एक विद्यार्थी बेशुद्ध पडला असून याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. प्रवरानगर येथील एका शाळेत गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शाळा भरण्याच्या अगोदर शाळेतील मुलांमध्ये चांगल्याच हाणामारी झाल्या असून यामध्ये मारहाण झालेला मुलगा बेशुद्धावस्थेत पडला … Read more

शेतीच्या बांधावरून लाकडी दांड्याने आणि कुन्हाडीने मारहाण

शिर्डी :  कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात राहणाऱ्या शेतकरी महिला मिराबाई उत्तम देवकर यांच्या शेताच्या सामाईक बांधावर शेजारील आरोपींनी बांधावरील शेत नांगरताना मोडल्याने मिराबाई देवकर या आरोपींना समजावून सांगत असताना त्यांना पाच आरोपींनी लाकडी दांड्याने व कुन्हाडीने मारहाण केली. मुलगा सोमनाथ उत्तम देवकर हा सोडविण्यासाठी आला असता त्याला पण बेदम मारहाण केली. मिराबाई उत्तम देवकर या … Read more

नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर : मायबाप सरकार . आमचं काही चुकतं का? नाही तर आम्हाला मरू द्यावाट पाहून पाहून आमची सहनशीलता आता संपुन गेली तुम्ही काही दाद देत नाही, मग आम्हाला तुमच्या दारातच मरु द्या. अशी आर्त हाक कामरगाव येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथे एप्रिल ते ऑक्टोबर२०१७ या काळात अवकाळी व अतिवृष्टीमुळे १०१ शेतकऱ्यांच्या … Read more

‘त्या’ मुलांच्या शोधासाठी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान

अहमदनगर : विशेष पोलिस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र, मुंबई यांनी ऑपरेशन मुस्कान दि.२८ नोव्हेंबर रोजी हरविलेल्या बालकाच्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार ऑपरेशन मुस्कान-७ ही शोधमोहिम दि.१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्यात दरवर्षी प्रमाणे राबविण्याचे आदेश पारीत केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात मुस्कान-७ शोधमोहिम दि.१ पासुन सुरू केली असल्याची माहिती अनैतिक मानवी … Read more

वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू 

 सुपा : पारनेर तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावर सुपा शिवारातील हॉटेल शिवनेरी समोर दि.२ रोजी १२ वाजेचे सुमारास अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने व अविचाराने भरधाव वेगात चालवून एका अंदाजे ५० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषास पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्या अनोळखी व्यक्तीस गंभीर दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत होवून … Read more

नेवासा नगर पंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष १८ डिसेंबरला निवड

नेवासा : नेवासा नगर पंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ येत्या १९ डिसेंबर रोजी पूर्ण होत असल्याने पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १८ डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. नेवासा नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक २४ मे २०१७ रोजी झाली. … Read more

लोणी गोळीबार व हत्या प्रकरणातील पाच आरोपींना अटक

लोणी : रविवारी लोणीत गोळी घालून तरुणाची हत्या करणाऱ्या व पसार झालेल्या सात पैकी पाच आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पाचवा आरोपी शुभम कदम याला शुक्रवारी लोणी पोलिसांनी बाभळेश्वर येथून अटक केली. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. गेल्या १ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता राहाता तालुक्यातील लोणी बु. येथील हॉटेल साईछत्रपतीमध्ये श्रीरामपूर येथील … Read more

भररस्त्यावर तरुणावर चाकूने वार

नगर: नगर शहरात तोफखाना परिसरात शितळादेवीच्या मंदिराजवळून दीपद देवानंद ताडला, वय १९ रा. दातरंगे मळा, नालेगाव, नगर हा तरुण दुचाकीवरुन जात होता. आरोपी मोहीत परदेशी याने दीपक ताडला या तरुणाच्या दुचाकीची चावी काढून घेतली व शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. धारदार चाकूने मोहीत परदेशीने दीपक या तरुणावर वार करून हातावर, पोटावर जखमी केले. गंभीर जखमी … Read more

भरदिवसा डोळ्यात मिरचीपूड टकून लुटले

श्रीरामपूर : कोल्हार-बेलापूर रोडवर उक्कलगाव गळनिंबच्या दरम्यान महिला बचत गटांना कर्ज देणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आले. शुक्रवारी (दि. ६) डिसेंबर ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास धोंडीराम कदम (रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) हे फिनकेअर स्मॉल फायनान्स कंपनी राहुरी येथे वसुलीचे काम करतात. ते वसुली करून बेलापूरमार्गे राहुरीकडे … Read more

जिल्हा नियोजन समिती निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतच चुरस

नगर : जिल्हा नियोजन समितीच्या मुदत संपलेल्या पाच जागांसाठी आलेले सर्व २५ अर्ज वैध ठरले. ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून (जिल्हा परिषद) एका जागेवर राष्ट्रवादीचे धनराज गाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. महापालिका क्षेत्रातून तीन जागांसाठी १८ अर्ज वैध ठरले. लहान निर्वाचन क्षेत्रातील (नगरपालिका) एका जागेसाठी दाखल ६ अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज … Read more

सरकारने प्रति हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत करावी – खा. डॉ. सुजय विखे पाटील

नगर: नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी संसदेत केली. हिवाळी अधिवेशनात नियम १९३ अन्वये कृषी विभागावरील चर्चेत डाॅ. विखे यांनी शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज्यात अवकाळी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रति हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत करावी; विम्याची … Read more

शाही विवाह सोहळ्यातून 17 तोळे सोने लंपास

शिर्डी – राहाता शहरात एका शाही विवाह सोहळ्यातून चोरट्याने 17 तोळे सोने आणि दहा हजार रुपये रोख असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना  सीसीटीव्हीत कैद झाला आहे. श्रीरामपूर येथील उद्योजक मूळे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा, राहाता येथील कुंदन लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. मंजुषा … Read more

पत्नीचा साडी धरुन विनयभंग, तर पतीला पट्ट्याने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी!

शिर्डी – राहाता शहरात पिंपळवाडी रोड भागात राहणारे एका २८ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीचा मागील भांडणाच्या कारणावरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन साडी धरुन विनयभंग केला.  तसेच तरुणीस व तिच्या पतीस लाथाबुक्क्याने व पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत विवाहित तरुणीने राहाता पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन नातेवाईक असलेले आरोपी अक्षय … Read more

भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवले !

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ५ च्या सुमारास भरदिवसा तिच्या रहात्या घराजवळून अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले.  याप्रकरणी मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे. मुलीचा व आरोपीचा हे.कॉ. औटी हे … Read more