खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली ही मागणी 

अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असून, ओल्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत नूकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत केंद्र सरकारच्या मदतीबाबतच्या अधिसूचनेवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेवून त्यांनी … Read more

पिकांच्या नुकसानीच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. काढणीस आलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, भूईमूग यासारख्या पिकास मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकरी हतबल होऊन खचून गेले आहेत. राहाता तालुक्यातील वाकडी येथील अल्पभूधारक शेतकरी सुखदेव पुंडलिक गाढवे यांचेही या पावसाने अतोनात नुकसान झाले. त्याचा त्यांना जबर मानसिक धक्का बसला. … Read more

पार्थ पवार  म्हणतात राज्यात सर्वसामान्यांचे सरकार येणार !

  शिर्डी : महाराष्ट्रात लवकरच बळीराजा व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केली. पार्थ पवार यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, उपतालुकाध्यक्ष सुधाकर शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- बसस्थानकासमोरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

अहमदनगर :- शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेतले आहे. कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी ही संयुक्तपणे कारवाई केली. पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.तारकपूर परिसरात एका अपार्टमेन्टमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती मिटके यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली … Read more

मोबाइल नंबर घेऊन धमकी देत क्लेरा ब्रूस मैदानाजवळ तरुणीवर गाडीत बलात्कार!

अहमदनगर :  बाहेरगावाहून नोकरीनिमित्त शहरात खासगी वाहनाने येणाऱ्या तरुणीवर वाहनचालकाने गाडीतच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना स्टेशनरोडवर क्लेरा ब्रूस मैदानाजवळ मंगळवारी (१९ नोव्हेंबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. टाकळी काझी परिसरातील एक युवती नगरमध्ये नोकरीकरिता खासगी वाहनाने चार महिन्यांपासून येते. मंगळवारी तिला रात्रीची ड्युटी होती. त्यावेळी नगरला येत असताना हा प्रकार घडला. … Read more

नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल – आ.संग्राम जगताप

नगर: महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना रस्त्याने फिरणेही अवघड झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल. अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा येत्या मंगळवारी (२६ नोव्हेंबर) नागरिकांसह आंदोलन करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. शहरातील नागरी प्रश्नांबाबत आमदार जगताप यांनी … Read more

श्रीगोंदे तालुक्यातील तरुणांनी चोरले पंचायत समिती सदस्य पतीचे ५५ लाख !

पारनेर : उद्योजक सुरेश धुरपते यांच्या आलिशान मोटारीतील ५५ लाखांच्या रोकड चोरीप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक जालन्याकडे रवाना झाले आहे.   बुधवारी पहाटे २.३० च्या सुमारास धुरपते यांच्या आलिशान मोटारीची (एम एच ४३ बी. एन. ४५४५) काच फोडून रोकड … Read more

श्रीगोंदे साखर कारखाना परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा

श्रीगोंदे : श्रीगोंदे साखर कारखाना परिसरातील मारुती मंदिरासमोरील खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी दुपारी छापा टाकत पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य व रोख ५ हजार ५३० रुपये पोलिसांनी जप्त केले.  कॉन्स्टेबल संतोष कोपनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. काहीजण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने छापा टाकून … Read more

 कांदा पोहोचला ८००० रुपयांवर !

नाशिक :- गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत माेठ्या प्रमाणात घट झाल्याने बाजारभावाने उच्चांकाचे नवीन रेकाॅर्ड केले असून उन्हाळकांंद्याला देवळा बाजार समितीत आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. आशिया खंडातील सर्वात माेठी बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत गुरुवारी (दि. २१) केवळ ४०० क्विंटल कांदा आवक झाली. त्यामुळे बाजारभावाने सात हजार रुपयांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बलात्काराची फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेस विवस्त्र करत सोडले रेल्वे रुळावर !

अहमदनगर :- बलात्काराची फिर्याद पोलीस ठाण्यात दिल्याच्या रागातून एक 21 वर्षीय तरुणीस पोत्यात घालून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिचा खून करण्याच्या उद्देशाने रेल्वे रूळावर  फेकून देण्यात आले. भाजी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीचे  अपहरण करून नंतर तिला विवस्त्र अवस्थेत विळद परिसरात पोत्यात सोडल्याची घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. एक 21 वर्षीय तरुणी हातपाय बांधलेल्या, तोंडाला चिकटपट्टी … Read more

काँग्रेसच्या कार्यकर्त्याची भाजपाच्या पदाधिकाऱ्याने धुलाई केली !

श्रीरामपूर ;- दुसऱ्याच्या घरात डोकावणे एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला चांगलेच महागात पडले असुन बेलापूरच्या बाजारपेठेत सकाळी सकाळी झालेल्या भांडणाची गावात चांगलीच चर्चा चालू आहे.  याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , गावातील भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात कुरापती करण्याचा प्रयत्न एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केला. घरातील आर्थिक व्यवहाराविषयी त्याने भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरच्यांना फोनवर सांगितले. यावरुन भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात वाद … Read more

भरदिवसा अल्पवयीन तरुणीस पळविले

संगमनेर – संगमनेर खुर्द परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष ३ महिने वयाच्या अल्पवयीन तरुणीस काल राहत्या घरातून दुपारच्या दरम्यान अज्ञात आरोपीने कायदेशीर रखवालीतून काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली … Read more

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अटक

शिर्डी :- जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या काल घडलेल्या पोलिसावर गोळीबार प्रकरणातील  गोळीबार करणारा आरोपी सचिन लक्ष्मण ताके , वय ३२ , रा . शिरसगाव , ता . श्रीरामपूर याला रात्री ८ . ०५ वा . अटक करण्यात आली.  दरम्यान दुसरा फरार आरोपी अमित सांगळे याचा कसून शोध घेतला जात आहे . कालच्या राहाता … Read more

हुंडेकरी कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या !

अहमदनगर :-  उद्योजक करीमशेठ हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणाला चार दिवस उलटले तरी पोलिस अद्याप मुख्य सूत्रधार अजहर मंजूर शेख याच्यापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. पोलिसांना गुंगारा देणारा अजहर हुंडेकरी कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे . सोमवारी ( दि . १८ ) पहाटे नमाजसाठी जात असताना येथील प्रख्यात उद्योजक … Read more

भारतीय स्टेट बँके शाखेच्‍या मॅनेजरकडुन जेष्ठ नागरीक व ग्राहकांना दिला जातो खाते बंद करण्याचा सल्ला

लोणी : लोणी येथे असलेली भारतीय स्टेट बँकेची शाखा ग्राहकांसाठी असुन नसल्यासारखीच आहे. अनेक जेष्ठ नागरीक व विद्यार्थ्यांना या शाखेत रोजच अरेरावीच्या भाषेला सामोरे जावे लागत आहे. लोणी बुद्रुक परिसरात भारतीय स्टेट बँकेंची शाखा आहे. या बॅंकेत परिसरातील जेष्ट नागरीक, शालेय विद्यार्थी तसेच अन्य खातेदारांची खाती आहेत. शासनाच्‍या वृध्‍दापकाळ योजनेचे पैसे काढण्‍यासाठी तसेच अन्य व्यवहारासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर शहरातील या चौकात तरुणीवर पिकअप मध्ये बलात्कार !

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस बलात्कार, विनयभंग सारख्या घटनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. अगदी प्रवास करणे महिला , तरुणींसाठी प्रचंड धोक्याचे झाले असून नगर शहरात पिकअप मध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी  कि, काल नगर तालुक्यातील टाकळी काझी परिसरात राहणारी एक २१ वर्षांची तरुणी पांढऱ्या रंगाच्या पिकअप … Read more

हुंडेकरी अपहरण प्रकरण : आरोपींकडून धक्कादायक खुलासे

अहमदनगर :- शहरातील उद्योजक,व्यावसायिक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना परतूर (जालना) येथे अटक केली. दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार हुंडेकरी यांचे अपहरण २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी करण्यात आले होते. मात्र या कटाचा सुत्रधार शहरातील कुख्यात गुन्हेगार अजहर मंजूर शेख व त्याचा जोडीदार मात्र पोलिसांच्या सापळ्यातून पसार झाले. अजहर शेख याच्याविरुद्ध अनेक … Read more

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेत लग्न लावणाऱ्या सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल !

अहमदनगर :-  नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गावातील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिचे गावातील तरुणाशी एका मंदिरात लग्न लावून देण्यात आले आहे.  याप्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात गावातील सरंपचाने मदत केल्याने त्याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय पोपट चोभे, शिवराज अशोक इंगळे, अतुल … Read more