पालकमंत्री राम शिंदे – रोहित पवार समर्थकांमध्ये ‘तुफान’ राडा

जामखेड – पालकमंत्री राम शिंदे व रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत.  यामुळे चिडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात हाणामारीच्या … Read more

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारुची विक्री करणाऱ्यांविरुध्द धडक कारवाई सुरु आहे. त्यांच्याकडून ६ लाख ८० हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणूकीच्या काळात अवैद्य दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन … Read more

विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू

जामखेड : शेतात शेळ्या चारत असताना खाली पडलेल्या पोलच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे अशोक शिवाजी पुढाईत (वय २५ वर्षे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील आघी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी जामखेड तालुक्यातील आघी या ठिकाणी रविवार दि.२० रोजी अशोक शिवाजी पुढाईत हा तरुण शेळ्या चारण्यासाठी घेवून गेला होता. सध्या पावसाळा असल्याने गेल्या … Read more

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे दांडीबहाद्दर अडचणीत

अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन नगर शहर मतदारसंघातील तिघांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान साहित्य नेण्यासाठी दोन केंद्राध्यक्ष, एक मतदान अधिकारी यांनी टाळाटाळ व हलगर्जीपणा केल्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.  या तिघांच्या सेवेतून निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना तत्काळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगर शहर मतदारसंघाचे सहायक … Read more

नगरमध्ये ५४ लाखांचे सोने-चांदी व भेटवस्तू जप्त

नगर –विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने रविवारी सोने, चांदी व महागड्या भेटवस्तू असा सुमारे ५४ लाखांचा मुद्देमाल पकडला. वसंत टेकडी भागात वाहनांची तपासणी करत असताना त्यांना संशयास्पद वाहनात (एमएच ०२ डीजे ७१७७) दोन बॉक्स आढळले. एका बॉक्समध्ये ५१ लाख ७२ हजार ८३९ रुपये किमतीचे सुमारे दीड किलो सोने आणि दुसऱ्या बॉक्समधे ३ लाख १५ … Read more

निळवंडेचे पाणी मिळेल त्या दिवशी आमदारकी सार्थकी

कोपरगाव : या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न धसास लावण्यासाठी विरोधकांनी कितीही आडकाठी निर्माण केली, तरी न डगमगता त्याचा खंबीरपणे मुकाबला करणारच. विरोधकांनी निळवंडे पाणी योजनेत खोडा घातला; परंतु ज्या दिवशी कोेपरगावकरांना निळवंडेचे पाणी प्यायला मिळेल, तो दिवस आपली आमदारकी सार्थकी लागण्याचा असेल, असे भावोद्गार महायुतीच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काढले. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही

कर्जत : विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, त्याची सुरुवात ना. शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात केली आहे. विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही की, फिरवली की झाला विकास. ना. शिंदे या सर्वसामान्य व्यक्तीकडे ना कारखाना होता, ना शिक्षण संस्था, ना पैसा. तरीही त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर मतदारसंघात विकासाची प्रक्रिया सुरू केली, ही त्यांची … Read more

लोकसभेप्रमाणेच आघाडीचे पानिपत होईल

अहमदनगर : नगर तालुक्यातील बहुतांशी पाणी योजना शिवसेनेने आणल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार शेलार यांनी खोटे बोलून दिशाभूल करुन श्रेय लाटू नये. शिवसैनिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत. मागील ५ वर्षात सत्तेच्या विरोधातील आमदार निवडून दिल्याने तालुक्याची पिछेहाट झाली. चुकीच्या माणसाला निवडून दिल्याने मागील ५ वर्षे जनतेने शिक्षा भोगली आहे. असे टीकास्त्र शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. गाडे … Read more

मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील !

कर्जत : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही; परंतु ठराविक उद्योजकांसाठी मोठ-मोठ्या सवलती दिल्या जातात, याला नेमकं काय म्हणायचं? भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांची मोठी उपेक्षा केली असून, त्याची किंमत आता त्यांना मोजावी लागणार आहे. मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. महाआघाडीच्या … Read more

अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी मला ताकद द्या

राहुरी : तालुक्यातील हक्काचे पाणी, जमीन ताब्यात राहाण्यासाठी, गोर- गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी, तुम्ही मला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी केले. नवी पेठ येथे काल तनपुरे यांची सांगता सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तनपुरे यांनी बाजार समितीपासून प्रचार फेरी काढली … Read more

आमदारकीचा षटकार ठोकणार: आ. कर्डिले

अहमदनगर : जेऊर गटामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आमदार होण्याची संधी मिळाली. नगर नेवासा मतदारसंघाचे विभाजन झाले. त्यानंतरही राहुरी मतदार संघात जेऊर गट आहे. आणि तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने मी सहाव्या वेळीही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास आ. शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला. आ. कर्डिले यांनी नगर तालुक्यातील ४० गावांमध्ये रॅली काढत जेऊर … Read more

अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी मला ताकद द्या

राहुरी शहर : तालुक्यातील हक्काचे पाणी, जमीन ताब्यात राहाण्यासाठी, गोर- गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी, तुम्ही मला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी केले. नवी पेठ येथे काल तनपुरे यांची सांगता सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तनपुरे यांनी बाजार समितीपासून प्रचार फेरी … Read more

त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते

राहुरी: शहरातील नागरिकांचे सर्व प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सोडवू. सत्ता असताना अनेक वर्षात नगरपालिकेची साधी पाणीपुरवठा योजना करता आली नाही, त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते. अशी टीका आ.शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर केली. राहुरी येथे आ.शिवाजीराव कर्डिले यांनी पेठेतून प्रचार फेरी काढली. यावेळी नागरिकांशी संपर्क साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंर्त्यांकडे पाठपुरावा … Read more

तुल्यबळ लढत – राम शिंदेना बारामतीचं आव्हान पेलवलं का?

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मंत्री म्हणून ओळख असलेले राम शिंदे आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यामध्ये ही लढत होत आहे. मतदारसंघांमध्ये १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लढत दुहेरीच होणार यात मात्र शंका नाही!  कर्जत – जामखेड – विधानसभा मतदारसंघावर मागील २५ … Read more

दोन भैयांच्या लढतीत कोणाचं पारडं जड?

नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार तसेच अहमदनगर चे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि सलग पाचवेळा निवडून आलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यातील ही अतिटतीची लढत शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली आहे.   शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना युती न होण्याचा फटका बसल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला.  मात्र मागील पाच … Read more

बारामतीचे आक्रमण परतवून लावा !

अकोले :- विधानसभेची निवडणूक हि विकासाची नांदी असून लोकांनीच ती हाती घेतली आहे. समोरच्या लोकांकडे निंदा,नालस्ती करणे व अपशब्द वापरणे हाच कार्यक्रम आहे. याला उत्तर मतदानातून द्या आणि बारामतीचे आक्रमण परतवून लावा, असे आवाहन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अमित … Read more

आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिवस गोड करा

सोनई : गेली चार ते पाच दशके मी या परिसरात व नेवासा तालुक्यात राबलो. या माझ्या तालुक्यात समृद्धी आणायची, एवढी एकच जिद्द मनात होती. माझ्या त्या स्वप्नांना माझ्या पिढीच्या लोकांनी साथ दिली, म्हणून ते स्वप्न प्रत्यक्षात आणू शकलो. आता आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिस गोड व्हावा, एवढी एकच इच्छा आणि अपेक्षा तुमच्याकडून आहे, असे भावपूर्ण आवाहन … Read more

मोदी-शहांनीही केले राम शिंदेंकडे दुर्लक्ष !

कर्जत :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही राम शिंदे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. भाजपाच्या एका अंतर्गत सर्व्हेमध्ये राम शिंदे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याने त्यांची जागा धोक्यात असल्याची बाब पुढे आली होती. मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास केला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी नेमक्या विकासाच्या मुद्द्यावर संपूर्ण निवडणूक … Read more