होय, मी मतदान करणार

अहमदनगर ;- विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे मतदारांचे स्वाक्षरी अभियान राबवून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. होय, मी मतदान करणार या आशयाखाली हे अभियान राबविण्यात आले असून, या अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला आपण करुया मतदानचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (दि.18 ऑक्टोबर) निमगाव वाघा येथे … Read more

मागील 5 वर्षात मुकुंदनगरसह शहराचा संग्राममय विकास झाला

अहमदनगर :- एमआयएम पक्ष मोदी प्रणित असून, छुपी युती उघड झाली आहे. शहरामधून ज्यांला एमआयएमची उमेदवारी देण्यात आली असून, त्याने महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. अशा उमेदवारावर जनता विश्‍वास ठेवणार नाही. अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाच्या विरोधात कोणताही कायदा भाजप शिवसेना सरकारने काढला, तेंव्हा शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहून त्याला विरोध दर्शविला. मागील … Read more

युवक काँग्रेसच्या ‘वेकअप महाराष्ट्र ‘ ट्रेंडला ट्विटरवर उदंड प्रतिसाद

मुंबई :- विधानसभेच्या मतदानाचे काऊंटडाऊन सुरु झाले असताना, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज ‘वेकअप महाराष्ट्र ‘या हॅशटॅगच्या नावाने ट्विटरवर केलेल्या ट्रेंडला महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांनी भरभरून प्रतिसाद देऊन  वेकअप महाराष्ट्राच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले. विधानसभेचा प्रचार संपायला अवघे काही तास उरले असताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र युवक काँग्रेसने आज ‘ वेकअप … Read more

विकासकामात आडकाठी आणण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले…

शिर्डी – पुढाऱ्यांमध्ये भांडणे लावून जिल्ह्याला दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्या शरद पवार यांनी प्रचारादरम्यान जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर एक शब्दही उच्चारला नाही. जिल्ह्याचे वाळवंट करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्याची योग्य संधी निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. अस्तगाव येथे प्रचार सांगता सभेत विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. खासदार … Read more

ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर : राजळे

शेवगाव –  गेल्या पाच वर्षांत जनहिताच्या कोणत्याही मुद्द्यावर न बोललेले, तसेच लोकांच्या सुख-दु:खात सामील न झालेले आज जात-पात व भावनेचा विषय काढून दिशाभूल करत आहेत. ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर आपण लढवत आहोत, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.  भाजपच्या प्रचाराची सांगता सभा शनिवारी जनता व्यासपीठावर झाली. सभेपूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

श्रीगोंद्याला गतवैभव मिळवून देणारच – पाचपुते

श्रीगोंदे घोड व कुकडीचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष, ऊस, लिंबूसह अन्य पिकांची स्थिती चांगली असून या पुढेही पाणी नियमानुसार घेऊ, असे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी शनिवारी पारगाव येथे सांगितले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाचपुते म्हणाले, मी चाळीस वर्षे काय केले, या विरोधकांच्या प्रश्नात राजकारण आहे. जे प्रश्न करतात, … Read more

भाजपात राम शिल्लक राहणार नाही…

कर्जत – राज्यात सध्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीची जोरात चर्चा आहे. मुख्यमंत्री तीनदा इथे येऊन गेले, पण मतमोजणीनंतर भाजपत राम शिल्लक राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी कर्जत येथे सभा घेतली. शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या सभेच्या तुलनेत येथील सभेला पाऊस … Read more

नगरकर कोणता भैया विधानसभेत पाठवणार?

अहमदनगर –  शहरात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आ. अनिल राठोड यांची लढत चांगलीच रंगतदार अवस्थेत आली आहे. खरतरं, या दोन्ही नेत्यांना नगरकर मोठ्या आदराने ‘भैय्या’ अशी हाक मारत असले तरी मतदानावेळी नेमकं कोणत्या ‘भैय्या’ ला पसंदी देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  नगर शहराचं राजकारण तसं जगताप, कोतकर, कळमकर यांच्याबरोबर राठोड, गांधी, … Read more

निळवंडेचे पाणी तुमच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पूर्ण करणार : ना. विखे

राहाता – निळवंडेच्या कालव्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. डिसेंबर २०२० अखेर निळवंडेचे पाणी लाभक्षेत्राला मिळेल, याची जबाबदारी माझी आहे. १२०० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने कालव्यांच्या खोदाईला सुरुवात झाली. विखे पाटलांना बदनाम करण्याचे काम काहिंनी केले, कामे सुरु झाली. निळवंडे कालवा कृती समिती आता कशाला? असा सवाल करत पाणी येणार आहे. तुमची प्रामणिक भूमिका असेल तर … Read more

कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही…’

श्रीरामपूर – ‘श्रीरामपुरातील आता जसे राजकारण सुरू आहे तसेच चालू राहू द्या डिस्टर्ब करु नका.. पण श्रीरामपूरची परिस्थिती पहाता मीच डिस्टर्ब झालो आहे… श्रीरामपुरात कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही… ‘अशा शब्दात खा. डॉ. सुजय विखे यांनी जोरदार टोलेबाजी केली.  त्यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी जोरदार साथ दिल्याने सभेचा नूर बदलून … Read more

भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा -खा. डॉ. सुजय विखे

श्रीरामपूर – येत्या २४ ऑक्टोबरला राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे श्रीरामपूर मतदार संघाचे रस्त्याचे प्रश्न असो किंवा सर्वात महत्वाचा पाटपाण्याचा प्रश्न असो त्यात हक्काचे पाणी मिळण्यासाठी सरकार पक्षाचे आमदार म्हणून भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा, असे आवाहन खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केले. श्रीरामपुरात काल … Read more

भाजपने तरुणांच्या तोंडाला पाने पुसली:ॲड. ढाकणे

पाथर्डी: राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक घटकांना त्याचा फटका बसला. नोकर भरतीचे आमिष दाखवून प्रत्यक्षात एकाही विभागाची नोकर भरती गेल्या पाच वर्षात झालेली नाही. ज्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळण्याची अपेक्षा बाळगली त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. पवित्र पोर्टल, ऑनलाईन अर्ज, मेगाभरती या संदर्भात आतापर्यंत फक्त आश्वासनांच्या पलिकडे काहीच मिळाले नाही. पाथर्डी व शेवगाव … Read more

निष्क्रीय असल्यामुळेच त्यांनी रणांगण सोडले : पाचपुते

श्रीगोंदा : केवळ भाजपमध्येच विकास करण्याची ताकद आहे. माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना सर्वसामान्य शेतकरी हाच केंद्र बिंदू मानून काम केले. पण मागील पाच वर्षात चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा डोळ्यादेखत जळताना पाहून वाईट वाटते. घोड, कुकडी, विसापूर, साकळाई,सीना,या महत्वाच्या शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या प्रश्नाला विद्यमान लोकप्रतिनिधीने कधीच महत्व दिले नाही. ते तालुक्याचे आमदार होते की एका … Read more

राष्ट्रवादीचा सुपडासाफ होईल : खा. सुजय विखे

शेवगाव : राज्याच्या १५ वर्षामध्ये हजारो कोटीचे भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे राष्ट्रवादी कॉग्रस सरकार आणि त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या वेळी शेतकरी आणि पाणी प्रश्नावर काम करण्यास सुरवात केली मात्र या निवडणूकीत राष्ट्रवादीला तीस पेक्षा जास्त जागा मिळणार नसून त्यांचा सुपडासाफ होईल, असा प्रबळ दावा खा. सुजय विखे यांनी केला. महायुतीचे उमेदवार आ. मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ … Read more

विकासकामांचा जनतेला हिशेब द्या : आमदार कर्डिले

राहुरी: तालुक्याची वाट लावल्याने जनतेने तुम्हाला घरी बसवले. तुमच्या २५ वर्षांच्या सत्तेतील कर्तबगारी व माझ्या १० वर्षांतील विकासाची कामगिरी समोरासमोर ठेवून जनतेला हिशेब द्या, असे आव्हान आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांना दिले. उंबरे येथील सभेत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव ढोकणे होते. राहुरीची अस्मिता जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत … Read more

कुकडीचे पाणी अडवणाऱ्यांना धडा शिकवा : ना.शिंदे

जामखेड : कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे कुकडीचे पाणी बारामतीकरांनी पुणे जिल्ह्यात अडविले होते. परंतु मी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी आणले. आज त्या खुनसीपोटी निवडणुकीत उभे राहिले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुकडीचे हक्काचे पाणी पुणे जिल्हात ठेवण्यासाठीच त्यांना आमदार व्हायचे आहे. परंतु ही जनतेने आपला स्वाभीमान दाखवत बारामतीचं पार्सल परत पाठवण्याची व तुमच्या हक्काचे पाणी अडविणाऱ्यांना धडा … Read more

घोटाळ्यात नाव असलेल्यांनी जनाची नाही, मनाची तरी लाज धरावी… उदयनराजे भोसले

राशीन घोटाळ्यात नाव आलेल्यांनी जनाची नाही, मनाची तरी लाज धरत निवडणुकीस उभे राहू नये. अशा निष्क्रिय लोकांच्या सानिध्यात नको, म्हणूनच आपण खासदारकीचा राजीनामा अवघ्या ४ महिन्यांतच दिला, असे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी राशीन येथे भाजपच्या प्रचारसभेत बोलताना सांगितले. उदयनराजे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना १५ वर्षे कुकडीची काय अवस्था झाली हे आपल्याला माहीत आहे. … Read more

शिर्डी झोपडपट्टीमुक्त करणार : मंत्री विखे

शिर्डी :- सर्वधर्मीय अशी ओळख असलेल्या साईबाबांच्या शिर्डीचा गेल्या काही वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलला. हॉटेल व अन्य लहान-मोठ्या व्यावसायिकांना स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी ठोस उपाययोजना करू, अशी ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. भविष्यात शिर्डी झोपडपट्टीमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संवाद कार्यक्रमात विखे बोलत होते. नगराध्यक्ष अर्चना कोते, कैलास कोते, योगीता शेळके, अनिता … Read more