शेतकऱ्यांसाठी खुश खबर ….. या महिन्यातच राज्यासह देशभरात धुवाधार …!

Ahmednagar News : राज्यात मान्सूनने चांगली हजेरी लावली आहे. सध्या वातावरण पोषक आहे. पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मौसमी पाऊस दाखल होणार असून जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला … Read more

आता नगरचा रेल्वे प्रवास देखील होणार ‘सुपरफास्ट’ ; रेल्वेगाड्यांचा विनाकारण थांबा बंद होणार

Ahmednagar News : मनमाड ते नगर डबल लाईन (द्रुतगती) रेल्वेमार्गाच्या नव्या टप्प्याची चाचणी नुकतीच घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा वेग वाढला आहे. या महत्त्वाकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल. अशी माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली. मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव ८.६६ … Read more

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा … अन्यथा महापालिकेमध्ये कुत्रे सोडणार !

Ahmednagar News : जसे नगर शहर वाढत आहे तशाच शहरात समस्या देखील वाढत आहेत. यातील भटक्या कुत्र्यांची समस्या सर्वात गंभीर बनली आहे. या कुत्र्यांनी आजवर अनेकांवर हल्ला देखील केला आहे . याबाबत पालिकेला निवेदने दिली मात्र त्यांच्याकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पालिकेत आंदोलन केले. यावेळी जर आगामी काळात या … Read more

मोगऱ्याच्या किमतीची रेकॉर्डकडे वाटचाल, गजरेही होतायेत दुर्मीळ !

mogra

Ahmednagar News : लग्नसराई व इतर कारणांसाठी फुलांची मागणी वाढतेय. त्यामुळे फुलांचे भाव चढलेले आहेत. यामध्ये सध्या मोगरा भाव खातोय. त्यामुळे मोगऱ्याचे गजरेही घेणे लोक टाळतायेत. सध्या मार्केटमध्ये मोगऱ्याच्या फुलास ८५ हजारांचा प्रतिक्विंटलला भाव मिळत आहे. काही दिवसात हे भाव आणखीन वाढतील असे चित्र सध्या असल्याचे व्यापारी म्हणत आहेत. अहमदनगर शहरातील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न … Read more

काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याच तालुक्यात राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर अंडाफेक …!

Ahmednagar News : हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच तालुक्यात खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर अंडी फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. लोकसभेच्या सुरु असलेल्या अधिवेशनात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिर म्हणून समजल्या जाणाऱ्या संसदेमध्ये हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ भाजप … Read more

कर्जत – जामखेडकर युवकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार ! औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाकडून कंटूर सर्व्हेक्षण

Ahmednagar News : कर्जत येथील एमआयडीसीसाठी अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने आता महत्वपूर्ण कंटूर सर्व्हेक्षणासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे पथक प्रस्तावित जागेवर दाखल होणार आहे. या सर्व्हेक्षणानंतर प्रस्तावित जागेचा भुसंपादनाचा मार्ग मोकळा होणार असून, त्यामुळे लवकरच कर्जत जामखेडकरांचे युवकांचे एमआयडीसीचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार रोहित पवारांनी आपले राजकीय वजन … Read more

दिंडी प्रमुख असणाऱ्या प्रसिद्ध महाराजांचे नगरमध्ये पालखी सोहळ्यातच हृदयविकाराने निधन, अहमदनगरसह नाशिकमध्ये शोककळा

shilapurkar

Ahmednagar News : सध्या वारकऱ्यांचा दिंडी सोहळा हा विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध दिंड्या सध्या मार्गस्थ झालेल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर एक बातमी अहमदनगरमधून आली आहे. दिंडी प्रमुख असणाऱ्या प्रसिद्ध महाराजांचे वारीमध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यातील दिंडी … Read more

एक रुपयात पीकविमा योजना; ‘चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला’ ..!

Ahmednagar News : राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा योजना लागू केलेली असताना प्रत्यक्षात अर्ज भरताना शेतकऱ्यांकडून १०० रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे ही योजना म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ अशी अवस्था झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला आहे. आता खरिपाची पेरणी करताना पदरमोड करून बियाणे व रासायनिक … Read more

आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडली ; गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगणीला !

Ahmednagar News : शिक्षण हा आधुनिक समाजाचा पाया आहे, म्हणूनच प्रत्येक मुलास शिक्षित केले पाहिजे. मुलांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क किंवा शिक्षणाचा अधिकार (आरटीई ) हा भारतीय संसदेचा कायदा आहे. हा कायदा ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा मूलभूत हक्क बनवितो. भारतीय घटनेतील कायद्याचा हा भाग भारतातील मुलांना अधिक रोजगारक्षम, स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र … Read more

कांदा, दूधप्रश्‍नावर खा. लंके यांचे शुक्रवारी आंदोलन ; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार महाविकास आघाडीचे वादळ

Ahmednagar News : निर्यातबंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दुधाच्या दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि.५ जुलै रोजी सकाळी १० वाजता या आंदोलनास सुरूवात होणार असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनासंदर्भात … Read more

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’; ग्रामसेककासह अंगणवाडीसेविका देखील भरणार हा फॉर्म ..

Ahmednagar News : राज्यातील महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे. महिला आणि त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. या उद्देशाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ योजना सुरु केली आहे. मात्र या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा करताना महिलांची चांगलीच धावपळ होत आहे. … Read more

Ahmednagar News : हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून नगर शहरातील गुन्हेगारी वाढतेय? गाडे-कोतकर यांच्यावरील दाखल गुन्ह्यानंतर ‘या’ चर्चांना उधाण..

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तथा शहरातील राजकारण हे काळानुसार बदलू लागले आहे. दरम्यान अनेक राजकीय व्यक्ती या विविध व्यवसायात देखील उतरलेल्या आहेत. दरम्यान नुकत्याच घडलेल्या काही घटनांनंतर हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून नगर शहरातील गुन्हेगारी वाढतेय का अशा चर्चांना उधाण आले. नगर शहरात हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी सचिन भानुदास कोतकरसह ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. … Read more

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षाच ; जिल्ह्यातील जलसंकट अधिक तीव्र

Ahmednagar News : यावर्षी पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी वरूणराजाची म्हणावी तशी कृपा झालेली नाही. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील जलसंकट अधिक तीव्र झाले आहे. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा ९ प्रकल्पांमध्ये २ जुलैअखेर केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेचा पाणीसाठा ३५ टक्के इतका होता. यंदा कडाक्याच्या उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन वेगात … Read more

टोळक्याकडून हॉटेल मालकावर तलवार कोयत्याने सपासप वार, अनेक कर्मचारी गंभीर जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक

Ahmednagar Crime

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील हॉटेलवरून काल झालेला राजकीय लोकांमधील वादाची घटना ताजी असतानाच आता आणखी एक मोठी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. जेवणावरून, बिलावरून झालेल्या वादामुळे हॉटेल मालकावर एका टोळक्याने थेट तलवार कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. हॉटेल मालक यात गंभीर जखमी झालेआहेत. या टोळक्याचा थरार सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे. ही घटना … Read more

बहिणी संतापल्या, ‘लाडकी बहीण’ नियोजनाचा ‘खेळ’ ! महिलांच्या रांगा, विद्यार्थ्यांचेही हाल, काही ठिकाणी तलाठीच गायब

file photo

Ahmednagar News : राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महिलांना महिन्याला १५०० रुपये अनुदान देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. त्यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे उत्पन्न व रहिवासी दाखला काढण्यासाठी तलाठी व सेतू कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. महिलांना दिवसभर तलाठी कार्यालयांत ताटकळत बसावे लागत असल्याने त्या संताप … Read more

पूर्वेकडून सुरवात झालीये त्यामुळे,.. अहमदनगरसह ‘या’ पाच जिल्ह्यात ‘इतका’ पडेल पाऊस, डॉ. पंजाबराव डख यांनी स्पष्टच सांगितलं..

dukh

Ahmednagar News : सध्या अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्र चांगला बरसला. दरम्यान आता पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या नजर पुन्हा आभाळाकडे गेल्या आहेत. दरम्यान आता पाऊस कधी व कसा पडेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आता डॉ. पंजाबराव डख यांनी याबाबत अंदाज मांडला आहे. ज्या ज्या वेळी पूर्वेकडून पाऊस येतो, त्या वेळी नगरसह … Read more

राज्यातील १३ साखर कारखान्यांना करोडोंचे कर्ज मंजूर ! यातील तब्बल पाच अहमदनगरमधील, सत्ताधाऱ्यांशी निगडित..

karkhane

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) राज्य सरकारच्या थकहमीवर राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना सुमारे १ हजार ८९८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यावर ‘एनसीडीसी’च्या संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या साखर कारखान्यांच्या आगामी ऊस गाळप हंगामातील बहुतांशी आर्थिक अडचणी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातीलच जवळपास पाच कारखान्यांचा समावेश आहे. … Read more

‘लाडकी बहीण’च्या कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात महिलांची मोठी गर्दी ! तातडीने दाखले देण्याची मागणी

ladki bahin

Ahmednagar News : राज्यात महायुतीचे सरकार असून पावसाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेबरोबर विविध योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. यामुळे नगर शहरातील सर्वच तलाठी कार्यालयावर कागदपत्र गोळा करण्यासाठी नागरिकांची व महिलांची मोठी गर्दी होत आहे. तरी त्यांना तातडीने कागदपत्र मिळावे यासाठी तलाठ्यांनी पूर्ण वेळ आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून नागरिकांना तातडीने … Read more