‘मी राहुरीकर, राहुरीचा आमदार कर’ च्या चर्चेने तालुका ढवळतोय

राहुरी  – तब्बल १० वर्ष राहुरी तालुक्यावर आमदार म्हणून अधिराज्य गाजवत असलेले आ. शिवाजीराव कर्डिले यांना राहुरी तालुक्याच्या गटा – तटाचा अंदाज आहे. राहुरी तालुक्याची जनता कुठे जावू शकत नाही, असे समजून यंदाच्या निवडणुकीत त्यांनी राहुरी तालुक्यातील मतदारांना ‘गृहीत’ धरल्याचे दिसत आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान दुखावल्याने नाराजीचा सूर दिसत असून ‘मी राहुरीकर’ राहुरीचा … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला !

श्रीरामपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मागील सरकारने उपाययोजना केल्या नाहीत.अशी टीका खा.इम्तीयाज जलील यांनी श्रीरामपूरमध्ये बोलताना केली. विधानसभा निवडणुकीतील एमआयएमचे उमेदवार सुरेश जगधने यांच्या प्रचार सभेत खासदार जलील बोलत होते.  विविध पक्षांमध्ये होणारे नेत्यांचे पक्षांतर खपवून घेतले जाते. मात्र एमआयएम पक्षाची मत कापणारे म्हणत बदनामी … Read more

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर निवडणूक -मा. मंत्री बबनराव पाचपुते

श्रीगोदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारात जनतेने आघाडी घेतली आहे, आज आठवडे बाजार च्या दिवशी पाचपुते यांनी प्रचार केला यावेळी बाजारकरूं शेतकऱ्यांशी पाचपुते यांनी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे काही दिवस उरले असताना प्रचारात दिवसेंदिवस रंगत वाढू लागली महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी सोमवार चा आठवडे बाजार असल्यामुळे … Read more

ना. विखेंना जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची सजावट

शिर्डी  – राहाता तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची साईबाबांच्या मंदिरात सजावट करण्याचा संकल्प साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजराव कोते यांनी केला आहे. यावेळी त्यांच्या साईनिर्माण उदयोग समुहाच्या वतीने अध्यक्ष विजयराव कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा यांनी सत्कार केला. यावेळी शिडींचे प्रथम नगराध्यक्ष केलासबापु कोते, सामाजिक कार्यकर्ते नितिन उत्तमराव … Read more

आदिवासी आरक्षणाला धोका नाही – वैभव पिचड

राजूर : आदिवासी आरक्षणाला कोणताही धोका होणार नाही. हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने व रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठीच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याचे अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगून त्यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे. राजूर येथील प्रचारसभेत आ. पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपाइं नेते भाई पवार होते. यावेळी … Read more

घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे – स्मृती इराणी

श्रीगोंदा – देशात भाजपचे सरकार आहे. ज्यांचे सरकार येणार नाही त्यांना मतदान करून घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे.सत्तेच्या माध्यमातून तिजोरी भरली त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची वेळ संपली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी श्रीगोंदा येथे जाहीर सभेत बोलताना केले आहे. श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवारच्या प्रचार सभेसाठी आयोजित सभेत इराणी बोलत होत्या. … Read more

निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फक्त प्रदेशाध्यक्ष राहतील

राहाता : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे. काँग्रेस पक्षानेदेखील धोरणापासून फारकत घेतली आहे. मोठा राष्ट्रीय पक्ष राहिलेल्या काँग्रेस पक्षाला तीन महिने अध्यक्षच नव्हता. महाराष्ट्रात या पक्षाची मोठी पडझड झाली. चांगले बाहेर पडले. आता काँग्रेस पक्षाला दिशाच राहिली नसल्याने विधानसभा निवडणुकीनंतर फक्त प्रदेशाध्यक्षच काँग्रेस पक्षात राहतील, अशी टीका गृहनिर्माण मंत्री व महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण … Read more

पवार ८० वर्षांचे तरीही तरूणासारखा प्रचार

संगमनेर – राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाला चांगले वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज्यात आघाडीच्या १५० पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.    संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आ. थोरात बोलत होते. यावेळी … Read more

कोपरगावात पतीची आत्महत्या…

कोपरगाव : पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर शैक्षणिक व महत्वाची कागदपत्रे घेण्यासाठी पत्नीच्या फ्लॅटवर गेलेला पती गिरीश अशोक अभंग (वय ३०, रा. अन्नपूर्णानगर, कोपरगाव, ह. मु. शिवाजीनगर, गल्ली नं. ५, संगमनेर) याने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना अन्नपूर्णानगर येथे रविवारी (दि. १३) सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांत पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

मुळाचे पाणी बीडला देण्याच्या हालचाली…

राहुरी शहर : मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतक­ऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नसतानाच आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, येथील शेती, उद्योग आणि व्यवसायास पूरक असलेले आपले हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत बीडला देऊ नये, यासाठी प्रसाद शुगर … Read more

आ. कोल्हेंचे काम २५ वर्षे आमदार असलेल्यांनाही सरस-ना. मुनगंटीवार

कोपरगाव : अर्थमंत्री म्हणून मी एकटाच आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्रिमहोदयांचे पाठबळ आहे. त्यांचे विधिमंडळातील गेल्या पाच वर्षाचे काम पंचवीस वर्षे आमदार असलेल्यांना सरस आहे. तेव्हा सर्वांचं चांगभलं करून विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. आमदार स्नेहलता कोल्हे यांना पुन्हा विधिमंडळात पाठवा. येथील सर्व … Read more

ही सत्ता, राज्य कशासाठी आणि कुणासाठी? शरद पवार

कोपरगाव : अटी आणि नियम यांच्याखाली ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून बाजूला ठेवले. राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एका ठिकाणी तर भाजपच्या शेतकरी कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशीच आत्महत्या करून तुमचे स्वागत करतो, अशी चिठ्ठी लिहून ठेवली. असे होत असेल तर ही सत्ता, राज्य कशासाठी आणि कुणासाठी? असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read more

अफवांवर विश्वास न ठेवता युती धर्म पाळावा : खेवरे

तांदूळवाडी : शिवसेनेविषयी वावड्या उठविणारे फार झाले आहेत. मात्र, अफवांवर विश्­वास ठेवू नका. युतीचा धर्म पाळा, शिवसेना आणि शिवसैनिक संपूर्ण ताकदीने आ. शिवाजीराव कर्डिले यांच्याच पाठीशी उभी राहणार असल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिली. दरम्यान आ. कर्डिले हे युतीच्या आगामी मंत्रिमंडळात मंत्रीच होणार असल्याचे खेवरे यांनी सांगताच शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. … Read more

बीडला पाणी गेल्याचा पुरावा दिल्यास त्यांना पाठिंबा देऊ : आ. कर्डिले

तांदूळवाडी : विरोधी उमेदवारांना बोलायला कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने आता आपली अस्मिता जपण्याचे आवाहन करत आहेत. मात्र कै. रामदास पा. धुमाळ, कै. शिवाजीराजे गाडे यांना वेळोवेळी फसविले. डॉ. तनपुरे साखर कारखाना, सूतगिरणी बंद पडली तेव्हा आपली अस्मिता कोठे होती, असा सवाल उपस्थित करत बीडला पाणी गेल्याचा पुरावा दिल्यास त्यांना पाठिंबा देऊ, असे आव्हान आ. शिवाजीराव … Read more

‘शेतकऱ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना धडा शिकवा’…!

शेवगाव / हातगाव : शेतकऱ्यांचे वाटोळे केले, भूलथापा देऊन शेतकरी व जनतेच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या महायुतीला आता धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वाCयांनी केले. खा. पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाआघाडीचे उमेदवार ॲड.प्रतापराव ढाकणे यांचे प्रचारार्थ बोधेगाव (ता.शेवगाव) येथे आयोजित प्रचार सभेत … Read more

विखेंच सर्जिकल स्टाईक सुरूच, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार मोहरे गळाला लावले !

जिल्ह्यातील तरूणवर्ग रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना भाजपा – सेनेने सुरू केलेली राजकीय मेगाभरती मात्र अजुनही कायम आहे. चालू आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पंकजा मुंडे आणि सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीचे चार मोहरे युतीने गळाला लावले. दरम्यान, विखेंचे जिल्ह्यात सर्जिकल स्टाईक सुरू असले तरी, अगोदरच हाऊसफुल्ल झालेले भाजप आताच्या जोरदार इनकमिंगमुळे आणखी तुडूंब … Read more

आशुतोष काळेंना विधानसभेत पाठवणारच !

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागील पाच वर्षापासून आशुतोष काळे यांनी केलेला झुंजार संघर्ष आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघाला पुन्हा विकासाच्या वाटेवर घेवून येण्यासाठी आशुतोष काळे यांच्या सारख्या उच्चशिक्षित नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जीवाचे रान करून कोणत्याही परिस्थितीत आशुतोष काळेंना विधानसभेत पाठवू, असा निर्धार वंचित … Read more

पिचडांची सभा उधळणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध

धामणगाव पाट येथे माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे प्रचार सभेत काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध धामणगाव पाट येथील पिचड समर्थकांनी केला आहे. या पुढे असे वागाल तर जशास तसे उत्तर देऊ, अशी संतप्त भावना व्यक्त केली. दोन दिवसांपुर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची सभा काही विघ्नसंतोषी लोकांनी उधळली होती. त्याचा निषेध धामनगाव पाटच्या … Read more