हुंड्याचे 15 हजार रूपये न दिल्याने विवाहितेला जिवंत जाळले

नगर – हुंडयाच्या पैशासाठी घटस्थापनेच्या दिवशीच विवाहित तरूणीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. औषधोपचार घेत असतांना तिचे निधन झाले. या प्रकरणी नवऱ्यासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लग्नामध्ये हुंड्याचे राहिलले पंधरा हजार रूपये दिले नाही म्हणून शुभांगी संदिप नाकाडे, वय २१, रा. रेणुकानगर, बोल्हेगाव या विवाहित तरूणीला घटस्थापनेच्या दिवशी शिवीगाळ … Read more

राष्ट्रवादीच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते: लंके

पारनेर : राज़्यातील भाज़पा- शिवसेना युतीचे सरकार शेतकरीविरोधी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते, असे प्रतिपादन पारनेर- नगर तालुका मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केले. नगर तालुक्यातील अरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, या वेळी लंके बोलत होते. या वेळी लंके … Read more

मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे काय झाले:शेख

पाथर्डी : राज्यातील फडणवीस सरकारने सर्वच घटकांना झुलविण्याचे काम केले असून मराठा आरक्षणावरून सरकारने या समाजाची फसवणूक केली. मुस्लिम समाजाला आघाडी सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण भाजप सरकारने रद्द केले. फक्त भंपकबाजी करून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, तरुण, महिला सुरक्षा, नोकर भरती यावर बोलण्या ऐवजी भाजप नेते काश्मीरचा विषय … Read more

तालुक्यात आता खरे विकासपर्व सुरू होईल : पोटे

श्रीगोंदा : बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे हे दोन्ही तालुक्यातील नेते एकत्र आल्याने गटातटाचे राजकारण संपुष्टात आले आहे. आता खरे तालुक्याचे विकासपर्व सुरु होणार आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्याच्या पाणी प्रश्नात नागवडे -पाचपुते एकत्र आल्यामुळे घोड कुकडीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. असे मत नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी व्यक्त केले. बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ शहरातून फेरी काढली … Read more

जातीपातीच्या राजकारणाला मतदार थारा देणार नाहीत : आ.राजळे

करंजी : शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, माजी खा. दिलीप गांधी, खा. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून भरीव विकास निधी आणून विविध विकासकामे मार्गी लावली. त्यामुळे सूज्ञ मतदारांनी विकासाला प्राधान्य द्यावे. विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नसल्याने शेवटची निवडणूक म्हणून जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात … Read more

पाणी न देणारेच आज पाण्याच्या घोषणा करत आहेत : ना.शिंदे

जामखेड : आजवर तालुक्याला पाणी देण्यास ज्यांनी टाळाटाळ केली तेच आता पाणी देण्याच्या घोषणा करत आहेत. आम्ही मात्र शहर व वाड्यावस्त्या टँकरमुक्त होण्यासाठी पुढील ५० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून ११७ कोटीची रुपयांची उजनी धरणातून पाणीयोजना मंजूर केली आहे. त्यामुळे आगामी काळात जामखेड शहर नव्हे तर तालुकाच टँकरमुक्त होईल.राज्यातील सहकारी सेवा संस्थेच्या सचिवांना सरकारी सेवेत सहकार विभागात … Read more

गावातील मतभेद बाजूला ठेवून नवा इतिहास घडवा…

शिर्डी गावातील मतभेद बाजूला ठेवून नवा इतिहास घडवा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजुरी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. शिर्डीतील महायुतीचे उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रचारार्थ राहाता तालुक्यातील राजुरी येथे आयोजित केली होती.  बैठकीत शालिनी विखे म्हणाल्या, विखे कुटुंबीयांनी कोणाचे वाईट केले का? एका तरी मतदाराने उभे राहून तसे सांगावे. मतभेद … Read more

‘त्यांनी’ दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली – आ. जगताप

अहमदनगर : त्यांनी २५ वर्ष नगर शहरात जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण करीत दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या … Read more

राम शिंदे म्हणतात… आता २४ तारखेनंतर मीही त्रास द्यायला सुरुवात करतो !

जामखेड दहा वर्षांत मी कोणालाही त्रास दिला नाही, त्यामुळे मला त्रास होत आहे. आता २४ तारखेनंतर मीही त्रास द्यायला सुरुवात करणार आहे, असा इशारा भाजपचे उमेदवार मंत्री राम शिंदे यांनी दिला.  जगन्नाथ राळेभात व माझी सेटिंग होती. राजकारणात देवाण-घेवाण असते. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, असेही त्यांनी सांगितले. शिंदे यांच्या प्रचारासाठी राळेभात यांच्या नेतृत्वाखाली … Read more

शिवसेना प्रत्येकाच्या मनात भिनलेली

नगर :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन सर्वांना सोबत घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. चांगला विचार करायचा, हसत – खेळत जीवन जगायचे, अनिल राठोड यांनी जसा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, तसाच शिवसेनेने सुद्धा कधी तडा जाऊ दिला नाही.  म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेना रुजली पाहिजे. शिवसेना आज … Read more

बबनराव पाचपुतेंसाठी मुस्लिम समाजही एकवटला

श्रीगोंदा : मागील पाच वर्षाच्याकाळात घोड, कुकडीच्या पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आपण ही निवडणूकच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाण्याच्या मुद्यावर लढवत आहोत. असे प्रतिपादन बबनराव पाचपुते यांनी केले. यावेळी बाजारात मुस्लिम व्यापाऱ्यांनीही पाचपुते यांचे मिठाई भरवूनस्वागत केले. दादाच आमचा पक्ष असल्याने तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी उभा … Read more

पापाची फेड करण्याची वेळ आली : खासदार डॉ. विखे

राहुरी ;- राष्ट्रवादी काँग्रेस ही व्हाॅटस् एपची लाभार्थी झाल्याने सभेला भाडोत्री माणसे आणण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली, असा टोला खासदार डाॅ. सुजय विखे यांनी लगावला. भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ रविवारी नवीपेठेत आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी शिवाजी सोनवणे होते. ईडीची चौकशी लागली त्यांना मोकाट सोडायचे, असा सवाल करत केलेल्या पापाची फेड करण्याची … Read more

पैशांसाठी विवाहितेचा छळ

नगर  – पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी पती, सासू-सासरे यांच्यासह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अभिजित ऊर्फ इनोक अरविंद मोरे, सासू जॅकलिन अरविंद मोरे ऊर्फ मॅन्यूअल, सासरा अरविंद गंगाधर मोरे ऊर्फ मॅन्यूअल दीर अनिमेश अरविंद मोरे ऊर्फ मॅन्यूअल व मार्गारेट गांगुड, नणंद सुषमा … Read more

बापानेच केले पोटच्या मुलीशी अश्लिल चाळे

नगर – पंधरा वर्षांच्या पोटच्या मुलीशी बापानेच अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. काटवन खंडोबा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.  पीडित मुलगी व तिचा बाप दोघेच घरी असताना तो अश्लिल चाळे करत असे. हा जाच वाढत चालल्याने मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.

स्वतःचा रस्ताही त्यांना दुरुस्त करता आला नाही… ते मतदारसंघाचा काय विकास करणार ?

श्रीरामपूर :- तालुक्याचे प्रश्न सोडवायला आमदार भाऊसाहेब कांबळेच हवेत, असे माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणताच कांबळे याना स्वतःच्या घरचा रस्ताही दुरूस्त करता आला नाही, अशी टीका अनिल कांबळे यांनी केली.  श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक उमेदवार भाऊसाहेब कांबळे हवेत, असे आवाहन मुरकुटे यांनी करताच स्वतःच्या घराकडे जाणारा गोंधवणी रस्तादेखील त्यांना गेल्या … Read more

आमदारांबाबत पोस्टवरून तरुणावर तलवारीने हल्ला !

नेवासे :- सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या विरोधी गटातील युवकावर तलवारीने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री सोनईजवळील शिंगवे तुकाई येथे घडली. युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सोमवारी सायंकाळपर्यंत कोणतीही फिर्याद दाखल झालेली नव्हती. ओंकार अरुण होंडे (४०, शिंगवे तुकाई) हा पांढरीपूल एमआयडीसीत नोकरीस आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त … Read more

श्रीरामपूर मतदार संघाचे भवितव्य शेतीवर अवलंबून- मुरकुटे

श्रीरामपूर – श्रीरामपूर मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी … Read more

महापौर म्हणतात प्रचारासाठी बोलावले तरच जाणार !

अहमदनगर :- शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे युतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा आहे. महापाैर वाकळे यांनी प्रदेशकडे बोट दाखवत सध्या बाहेर प्रचार सुरू असल्याचे सांगत बोलावल्यास शहरातही सक्रिय होऊ, असे स्पष्ट केले.  महापालिकेत राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन सत्तेत आलेल्या भाजपने शिवसेनेला विरोधी बाकावर बसवले होते. भाजपचे वाकळे हे … Read more