२५ वर्षे व्यापार, उद्योग बुडवला ते आता पोकळ गप्पा मारताहेत!

नगर : पक्षीय राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण मी गेल्या पाच वर्षापासून केले आहे. शहरात आयटीपार्क सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मात्र ज्यांनी २५ वर्ष व्यापार, उद्योग बुडवण्याचे उद्योग केले ते आता निवडणुकीच्या निमित्त पोकळ गप्पा मारत आहेत, अशी टिका आमदार संग्राम जगताप … Read more

येत्या २४ तारखेला घड्याळ कायमचे बंद पडणार!

कुकाणे : ३७० कलम रद्द हा प्रचाराचा मुद्या नाही, असे विरोधक म्हणत असतील, तर तो मुद्दा आमच्या संस्काराचा व तिरंग्यावर प्रेम असलेल्या स्वाभीमानाचा आहे. राष्ट्रवादीने राज्याचेच बारा वाजवल्याने येत्या २४ तारखेला घड्याळ कायमचे बंद पडणार आहे आणि हेच घड्याळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व पंकजा यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र हिच आमची घोषणा असून … Read more

नगराध्यक्षांसह सात नगरसेवक भाजपत दाखल

श्रीगोंदे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राजेंद्र नागवडे भाजपवासी झाल्यानंतर त्याचा परिणाम शहराच्या राजकारणात झाला. काँग्रेस आघाडीच्या सात नगरसेवकांनी व नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. बबनराव पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी सर्व नगरसेवकांचे बबनराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, सदाशिव पाचपुते यांनी स्वागत केले. सदाशिव पाचपुते म्हणाले, मागे काय … Read more

काँग्रेस उमेदवाराचा मंदिरात मुक्काम!

शिर्डी :- मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश थोरात यांनी प्रचार दरम्यान नवीन प्रचाराची शक्कल लढवत कार्यकर्त्यांसह रांजणगांव देशमुख गावात मंदिरातच मुक्काम केला. रांजणगाव देशमुख येथील हनुमान मंदिरात रात्री नागरिकांच्या भेटीगाठी झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार थोरात यांनी तिथेच अंग टाकले. रात्री गावकऱ्यांनी उमेदवारासर सर्वांना पिठलं भाकरी जेवण दिले. यावेळी नवनाथ महाराज आंधळे, गबाजी खेमनर,अण्णासाहेब थोरात,रामदास काकड … Read more

नगर शहराच्या विकासासाठी हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवा – वसंत लोढा

नगर :- शहराच्या विकासासाठी केंद्रातील व राज्यातील नेतृत्वावाने गेल्या पाच वर्षात भरीव निधीच्या माध्यमातून विकासाला चालना दिली आहे. नगरचा विकास हा युतीच्या माध्यमातूनच होऊ शकतो. आज केंद्रात भाजप-सेनेची सत्ता आहे आणि आता विधानसभेतही युतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे नगरच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून नगरचा विकास होऊ शकतो. आज नगर शहरातील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. … Read more

जनहिताच्या कामामुळेच जनतेने २५ वर्ष अनिल राठोड यांना आमदार केल !

अहमदनगर :-  विरोधक उमेदवार म्हणतात २५ वर्षाचा हिशोब द्या. पण हे त्यांना माहित नाही कि त्यांचे वडील ७ वर्ष नगरअध्यक्ष होते. दहा वर्ष विधानपरिषद आमदार. उमेदवार स्वता ४ वर्ष महापौर आणि पाच वर्ष आमदार होते मग २६ वर्ष त्यांनी नगरकरांसाठी काय केले याचा हिशोब द्यावा.  राज्यात २० वर्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता होती त्यावेळी यांनी नगरच्या … Read more

शरद पवारांची जीभ घसरली, म्हणाले, ४० वर्षे गवत उपटत होते का?

अहमदनगर : –अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली.  यावेळी त्यांनी मधुकर पिचडांवर जहरी टिका नाव न घेता केली.  म्हणाले, अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत … Read more

जनतेलाच पिचड नको …. अकोल्यात शिवसेनेत फूट !

अकोले : पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ व माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांनी युती धर्माला तिलांजली देत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांना समर्थन देत पिचडांच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. पत्रकार परिषदेत मेंगाळ व दराडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बंड … Read more

विरोधकांनी धमकावू नये, आम्हीही कारखाना काढू…

नेवासे :- नेवाशात आघाडीचे चिन्हच गोठवले गेले. त्यामुळे लढाई कोणाशी हेच समजत नाही. पराभूत मानसिकतेतून उभ्या राहिलेले विरोधकांनी धमक्यांचे राजकारण करू नये. आम्ही धमक असलेले नेते आहोत. ठरवले तर साखर कारखाना काढू शकतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नम्रतेने जो जय हरी म्हणेल त्यालाच साथ द्या, असे आवाहन शुक्रवारी केले. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे … Read more

नेता बाहेर असल्याने किल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर!

संगमनेर :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी काँग्रेसच्या ‘बाजीप्रभू’वर तोफ डागत निवडणुकीत जान आणली, पण हे वातावरण कायम राखण्यात महायुती यशस्वी होताना दिसत नाही. महायुतीतील रुसवेफुगवे सुरुच असल्याने काही नेते प्रचारापासून चार हात लांब आहेत. दुसरीकडे संगमनेरची निवडणूक सोपी झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आघाडीच्या उमेदवारांसाठी चार दिवसांपासून राज्यात सभा घेत आहेत. नेता बाहेर असल्याने किल्ला शाबूत ठेवण्याची … Read more

परजणे, काळेंच्या विनापरवाना प्रचार करणाऱ्या गाड्यांवर गुन्हा

कोपरगाव :- आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे, अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांचे पोस्टर चिकटवलेल्या अॅपेरिक्षा व टाटा छोटा हत्ती ही वाहने विनापरवाना प्रचार करताना आढळल्याने संबंधित गाड्यांच्या चालक-मालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार काळे यांचे पोस्टर लावलेली टाटा एस छोटा हत्तीचा (एमएच १७ बी वाय १९५७) चालक कैलास धनवटे व अपक्ष … Read more

पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन – प्रताप ढाकणे

पाथर्डी :- तुम्ही सर्वांना संधी दिली, एक वेळ मला संधी द्या. पाथर्डी-शेवगावच्या पूर्व भागात पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन. कारण ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता खाली ठेवायचा असेल, तर पाण्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी आल्याशिवाय कोयता जाणार नाही, असे पाथर्डी-शेवगावमधील राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे यांनी खरवंडी कासार येथे बोलताना सांगितले. भाऊ बाबा मंगल कार्यालयात … Read more

कारमधून रिव्हॉल्व्हर जप्त

नेवासे :- खडकेफाटा टोलनाक्यावर गुरुवारी रात्री फॉर्च्युनर कारमधून एक लाख रुपये व रिव्हॉल्व्हर आचारसंहिता कक्षाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जप्त केले. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या फॉर्चूनरची (एमएच ४३ एआय ००१३) तपासणी एस. डी. कराळे यांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल चांगदेव कांबळे, जी. एस. चव्हाण, नितीन भताने यांनी केली असता एक लाखाची रक्कम आढळली. एकाकडे रिव्हॉल्व्हर सापडले. पथकाने लगेच निवडणूक … Read more

विकासकामांत खोडा घालण्याचे पाप विरोधकांचे

नगर – महापौर असताना राज्य सरकारकडून सिना नदीच्या सुशोभिकरणासाठी मोठा निधी मंजूर करुन आणला. परंतु विरोधी उमेदवारांनी सुशोभिकरणाचा हा प्रकल्प बंद करण्याचे काम केले. त्यामुळे तो निधी परत शासनाकडे वर्ग झाला.  तपोवन रोडसाठी शासनाकडून 3.5 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर त्यांनी हाही रस्ता बंद पाडण्याचे काम केले. शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम मी करीत असतांना त्यांनी … Read more

रोहित पवारांनी साधला मंत्री राम शिंदेंवर निशाणा

जामखेड – मंत्री असुन शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देऊ शकले नाहीत.कुकडीमधून कर्जतसाठी नमुद केले गेलेले पाणी आपल्याला आणायचे आहे.तुम्हाला जेवढी भूक लागली आहे तेवढीच विकासाची भूक मलाही लागलेली आहे.जनता अडचणीत असताना त्यांना ते आठवत नाहीत निवडणुक आली की लगेच आठवण होते. आता गावागावातील उत्तुंग प्रतिसाद पाहता माझी जबाबदारी वाढली आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी … Read more

अनिल राठोड यांच्या प्रचारातील सहभागाबाबत अद्याप निर्णय नाही

नगर – केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक शहराला व जिल्ह्याला भरीव निधी दिला आहे. नगर शहरालाही तो दिला.मात्र येथील त्यावेळचे महानगरपालिकेचे सत्ताधारी अर्थात शिवसेना कमी पडली. शहराच्या उड्डाणपुलाच्या कामात तर शिवसेनेने अडथळे आणत मला वारंवार त्रास दिला असा आरोप भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे नाव न घेता केला.  राठोड … Read more

राम शिंदे, रोहित पवारांसह सहा उमेदवारांच्या हिशेबात त्रुटी !

कर्जत – राशीन भाजपचे राम शिंदे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, मनसेचे अप्पासाहेब पालवे यांच्यासह अपक्ष बजरंग सरडे, ज्ञानदेव सुपेकर यांच्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात त्रुटी व अनियमितता आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी त्यांना नोटीस बजावली.  विहित नमुन्यात खर्चाचा सर्व हिशेब ठेवणे बंधनकारक आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी शुक्रवारी खर्च निरीक्षक नागेंद्र … Read more

पाचपुते आणि नागवडे आता एकाच पक्षात !

श्रीगोंदे ;- एकमेकांच्या विरोधात राजकीय लढत देणारे पाचपुते आणि नागवडे आता एकाच पक्षात म्हणजे भाजपत आले आहेत. सिद्धटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांचे बंधू दीपक यांनी कमळ हातात घेतले.  शिवाजीराव नागवडे विरुद्ध बबनराव पाचपुते असा संघर्ष तालुक्याने अनेक वर्षे पाहिला. घोड नदीकाठच्या गावांत नागवडे परिवाराला मानणारे … Read more