दहा वर्षात आ. कर्डिलेंनी कोणती पाणी योजना राबविली ?

राहुरी शहर : माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तालुक्यात अनेक पाणी योजना शासनाकडून मंजूर करून त्या कार्यान्वित केल्या. आज जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई असताना राहुरी तालुक्यात अपवादात्मक ठिकाणी टँकर सुरू होते. आमदार कर्डिले १० वर्षांपासून तालुक्याचे आमदार होते. या काळात त्यांनी एक तरी पाणी योजना राबविली का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर-राहुरी … Read more

जावई विरोधात असताना सुजयला 70 हजारांचं लीड मिळवून दिलं!

अहमदनगर :  लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेकजण माझ्यावर आरोप करत होते,  तरीही अहमदनगरमधून जावई संग्राम जगताप विरोधी पक्षातील उमेदवार असतानाही माझ्या मतदारसंघातून 70 हजारांचा लीड देण्याचं काम मी केलं होतं, असा दावा कर्डिले यांनी केला आहे.  काही जणांची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी आहे. विरोधकांचा असा समाचार आ. कर्डिले यांनी घेतला.  माझ्यावर आरोप करणारे रात्री दोन … Read more

मुख्यमंत्र्याच्या आदेशाने विखे पाटील संकटात

कोपरगाव – अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राधाकृष्ण विखे यांना तुमच्या भाचीला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असा सूचक इशारा दिला आहे.  भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाची अर्थात कोपरगावमधील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आश्वासन  दिलं आहे. मात्र त्याच मतदारसंघात … Read more

वंचित बहुजन आघाडीचा हटके जाहीरनामा आणि वचननामा

नगर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी हटके जाहीरनामा आणि वचननामा प्रकाशित केला आहे. शहरातील सर्वसामान्य मतदारांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात आले असून यातील हटके असणाऱ्या वचननाम्यामुळे शहरात चौका-चौकात कुजबुज सुरु झाली असून नगरकर मतदारांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.जाहीरनामा : नगर शहराला “औद्योगिक शहर-उद्योग नगरी” म्हणून निर्माण करणार हा विषय घेत काळे … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट संगमनेर विधानसभा मतदारसंघ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर हा मतदारसंघ. या मतदारसंघातून थोरात 1985 पासून निवडून जात आहेत. त्यांच्याविरोधातील उमेदवाराला रसद पुरविण्याचं काम बाळासाहेब विखे यांच्यापासून आता डाॅ. सुजय विखे यांच्यापर्यंतच्या तीनही पिढयांनी केलं. बाळासाहेबांच्या विरोधात वेगवेगळे उमेदवार दिले; परंतु संगमनेरमध्ये थोरात यांनी केलेली विकासाची कामं, त्यांचा मतदारसंघात असलेला संपर्क आणि त्यांनी उभं केलेलं संस्थात्मक … Read more

कर्जत -जामखेड मतदारसंघात बारामतीचं अतिक्रमण होवू देऊ नका

जामखेड : ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपण या भागातील महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच मतदारसंघात मोठ मोठे उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध होईल.हे सर्व पूर्णत्वास येण्यासाठी याभागात बारामतीचे अतिक्रमण होवू देऊ नका. असे … Read more

सत्ता नसल्याने पवारांच्या डोळ्यात पाणी : ठाकरे

अहमदनगर : सत्तेच्या काळात पवारांना जनतेच्या डोळ्यातील अश्रु दिसत नव्हते परंतू आता पाच वर्षे विरोधात राहिल्यानंतर त्यांना अश्रु फुटत आहे. पण हा नादानपणा आहे. अशी परखड टिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर केली. धरण कोरडे पडल्याची व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला ते काय म्हणाले हे जनता विसरली नाही. याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. नगर … Read more

…तरच राहुरीत धक्कादायक निकाल

राहुरी विधानसभा मतदार संघात आ .शिवाजी कर्डिले यांनी मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत माजी खा. बापूसाहेब तनपुरे, नगराध्यक्षा सौ. उषाताई तनपुरे यांना पराभूत केले आहे. आता नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरेंना पराभूत करून ते राहुरीत आहे. मतदार संघाबरोबरच तनपुरे घराण्यावर विजयाची हॅट्रिक करण्याच्या कर्डिले तयारीत आहे .दरम्यान, तनपुरे , विखे यांनीही आ .कर्डिलेंची हॅट्रिक रोखण्यासाठी जोरदार व्यूहरचना केली … Read more

थोरात साहेब, आता घरी बसा; अन्यथा जनता तुम्हाला घरी बसवेल !

संगमनेर – जो बेरोजगार आहे, त्याला आम्ही संधी देणार आहोत. शेतकऱ्यांना एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणीची सुविधा देणार. शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करणार, भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची आमची मागणी असल्याची ग्वाही शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. संगमनेरमध्ये ते बोलत होते. उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, ही परिवर्तनाची लाट आहे. लोकांनी मनोमन विचार केला आहे. तेव्हा … Read more

…अन मा.आमदार मुरकुटे म्हणाले… सुजयचं आमचं ठरलं!

श्रीरामपूर – शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या सभेला माजी आमदार भानुदास मुरकटे यांनी हजेरी लावली. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे व मुरकुटे यांनी रंगत आणली. बारा विरुद्ध शुन्याची विखे यांच्या घोषणेची ठाकरे यांनी स्वागत करत कोल्हापूरकरांप्रमाणे नगरकरांनी ठरवलंय. त्यामुळे त्यांना भगवा न्याय देईल, असे सांगितले. शिवसेनेचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल ठाकरे यांच्या सभेने करण्यात … Read more

आ. कांबळेंच्या निष्क्रियतेमुळेच श्रीरामपूर दुष्काळी अनुदानापासून वंचित – करण ससाणे

श्रीरामपूर – आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या निष्क्रियतेमुळेच श्रीरामपूर तालुका दुष्काळ निधीपासून वंचित राहिला, अशी टीका उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या आमदाराला जनता कदापी माफ करणार नाही, असेही ससाणे म्हणाले. काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकांमध्ये ससाणे बोलत होते . मतदारसंघातील बोधेगाव, कान्हेगाव, लाडगाव, दिघी, नायगाव, रामपूर, गोधर्वन आणि … Read more

श्रीरामपुरात लवकरच राजकीय भूकंपाचे धक्के

श्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे राजकीय वातावरण तापत चालले असून येत्या दोन – तीन दिवसानंतर श्रीरामपुरात राजकीय भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे. ससाणे गटाने ना. विखे यांची साथ सोडून थोरातांचा हात हातात घेवून काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. मात्र ससाणे गटात मोठ्या प्रमाणावर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारे बहतेक मोठे कार्यकर्ते आहेत. … Read more

विद्यार्थिनीचा विनयभंग करुन विष पिण्याची धमकी

नगर – श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील एक १६ वर्षाची तरुणी कॉलेजला जाताना नेहमी तिचा पाठलाग करुन माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याबरोबर लग्न कर, फोटो काढ, अशी वेळोवेळी छेड काढून विद्यार्थिनी घरी एकटी असताना तिला धरुन माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यासोबत पळून चल नाहीतर मी तुझ्यादारात वीष पिवून मरुन जाईल, अशी धमकी देवून विनयभंग … Read more

पाच वर्षात त्यांनी फक्त विकासाच्या थापा मारल्या – उपनेते अनिल राठोड

नगर : नगरची जनता हुशार आणि सुज्ञ आहे. त्यांना कुणी कितीही विकासाच्या थापा मारून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्याचे उत्तर जसे लोकसभेच्या निवडणूकीत दिले तसेच उत्तर हया विधानसभेच्या निवडणूकीत देतील.  या लोकप्रतिनिधींनी आपल्या घराच्या जवळ असणारे सारसनगर भागातील नागरीकांना पिण्याचे पाणी देऊ शकले नाही आणि टँकर मुक्तही करू शकले नाही, त्यांनी विकासाच्या खोटया वल्गना करू … Read more

नादुरुस्त ट्रकला धडक, तिघांचा मृत्यू

पारनेर – नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारची रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला धडक बसून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला. चौघेही पारनेर तालुक्यातील सुपे येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये सुपे येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, उद्योजक संदीप पवार यांचा समावेश आहे.संदीप किसन पवार (४२), भरत भाऊसाहेब नन्नवरे (२२, दोघेही … Read more

काळजावर दगड ठेऊन आलोय !

नगर :- बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. अभिषेक कळमकर हे राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. शरद पवारांच्या सभेनंतर झालेल्या प्रकरणानंतर आमदार जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांवर अभिषेक कळमकर नाराज होते.  अभिषेक कळमकर म्हणाले, … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ !

अहमदनगर :- विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कळमकर यांनी हाती शिवबंधन बांधलं. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप आणि कळमकर या दोन गटांमध्ये वाद सुरू होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच … Read more

राहुल गांधी बँकॉकला गेले

धुळे : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आपल्या सत्ता काळात जनतेशी खोटारडेपणा केला. विकासाला खरी दिशा पंतप्रधान मोदींनी दिली आहे, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या … Read more