राहुल गांधी बँकॉकला गेले

धुळे : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आपल्या सत्ता काळात जनतेशी खोटारडेपणा केला. विकासाला खरी दिशा पंतप्रधान मोदींनी दिली आहे, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या … Read more

वैभवशाली अहमदनगरच्या विकासासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष हाच सक्षम पर्याय – डॉ.कॉ.भालचंद्र कांगो

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वैयक्तिक दोषी नसताना ईडी मार्फत चौकशी लावून त्यांना गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी वेळप्रसंगी कायद्याची व्याख्या बदलली गेली. मुख्यमंत्री, अमित शहा, पंतप्रधान यांनी जर घोटाळे केले असतील तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांना दोषी धरणार का असा सवालही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी आज नगर येथे पत्रकारांशी … Read more

संग्राम जगताप यांना मोठा धक्का अभिषेक कळमकर शिवसेनेत !

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू माजी आमदार दादा कळमकर यांचे पुतणे, नगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले. रात्री उशिरा झालेल्या या नाट्यमय प्रवेशामुळे नगर शहराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अभिषेक कळमकर राष्ट्रवादीपासून … Read more

विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका

जामखेड : लंकेत सोन्याच्या विटा आहेत. पण त्या तुमच्या कामाच्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला रामाचे राज्य पाहिजे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे विकासकामे करून मते मागत आहेत. विरोधकांनी काय काम केले? विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ नान्नज (ता. … Read more

सुजय यांनी उलगडले विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्य !

अहमदनगर: आमदारकीसाठी इच्छुक असणा-या सगळ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करत भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्यच बुधवारी नगर येथे उलगडले. विखे यांच्या या विधानाने व्यासपीठावरील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते. … Read more

पाच वर्षांत नगर शहराचा बिहार झाला….

अहमदनगर :- गेल्या  ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेचे विचार घेऊन काम केले. प्लॉट, खंडणी, दहशत २५ वर्षे बंद होती, पण मागील पाच वर्षांत शहराचा चेहरा बदलून त्याचा बिहार झाला आहे.अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.   नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत राठोड बोलत होते, शहराला संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विकास हा … Read more

नगर शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही !

नगर :- शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही. कसले गुंड, कोण गुंड? या गुंडांची तुमच्या पायाशी उभे राहण्याचीही लायकी नाही. एका बाजूला आपले अनिल राठोड व दुसऱ्या बाजूला जो गुंड असेल त्याने याद राखावे, यापुढे गुंडागर्दी केली, तर बोलून दाखवणार नाही, करून दाखवेन, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरचा रस्ता दाखवण्याची योग्य वेळ आली आहे !

राहुरी :- विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघात भेटी – गाठी तसेच प्रचार दौरा सुरू करुन त्यात तालुक्यातील प्रश्नांवर उजेड टाकतानाच विकासावर भर देवून त्याबाबत मतदारांना जागृत करत असल्याने त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तनपुरेंनी काल देसवंडी, तमनर आखाडा, गोटुंबे आखाडा, उंबरे, ब्राम्हणी आदी ठिकाणच्या गावात जावून बैठका घेतल्या. … Read more

अहमदनगर जिल्हयातुन हे ५३ अपक्ष उमेदवार ठरणार डोकेदुखी ?

नगर  – विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत. नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या अपक्षांचे आव्हान राहणार आहे. या वेळी तब्बल ५३ अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चार मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. दोन मतदारसंघांत एमआयएम पक्षाचे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएम … Read more

शरद पवारांचे हेलिकॉप्टर बिघडते तेव्हा…

पारनेर :- मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस – कॉग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (८ ऑक्टोबर) पारनेर येथे आले होते. पारनेरमधील सभा संपल्यानंतर जळगावला उड्डाण घेण्याण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. बिघाड झालेल्या हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ न शकल्याने दुसरे हेलिकॉप्टर पारनेर येथील हेलिपॅडवर मागविण्यात आले. त्यानंतर पवार … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार

अहमदनगर :- राज्याचे लक्ष वेधले गेलेल्या कर्जत -जामखेड मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप,आर पी आय, व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री ना प्रा राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सिद्धटेक येथे शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी ११वाजता होणार आहे अशी माहिती पालकमंत्री ना राम शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी … Read more

लंकेत सोन्याच्या विटा आहेत त्या तुमच्या काय कामाच्या ?

जामखेड : लंकेत सोन्याच्या विटा आहेत. त्या तुमच्या कामाच्या नाहीत. असा खोचक सवाल भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या, तुम्हाला रामाचे राज्य पाहिजे. विरोधकांनी काय काम केले? यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती आशा शिंदे, सरपंच विद्या मोहळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, बाजार समितीच्या … Read more

संगमनेर मतदारसंघात परिवर्तन होणार

अहमदनगर: महायुतीच्या प्रचाराच्या संगमनेरमधील सभेत भाजपचे तरुण खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली. सुजय विखे म्हणाले, “मी संगमनेरमध्ये जास्त येऊ शकणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांना 24 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रात फिरायला नक्की मोकळं करू.” शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील महायुतीच्या या सभेला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे … Read more

बाळासाहेब थोरातांच्या करामती साऱ्यांनाच माहीत आहेत !

संगमनेर :- स्वत:ला वीर बाजीप्रभूंची उपमा देणाऱ्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चागलेच झोडपून काढले आहे. नवले यांच्या प्रचारासभेसाठी संगमनेरमध्ये दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. ‘ते’ थोरात तर आम्ही जोरात असे म्हणत त्यांनी संगमनेरसह संपूर्ण नगर जिल्हा भगवा करणारच असा विश्वास बोलून … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट शिर्डी विधानसभा मतदारसंघ

शिर्डी :- विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून चंद्रभान घोगरे यांचा एकमेव अपवाद वगळता या मतदारसंघावर विखे कुटुंबीयाचंच वर्चस्व आहे. अगोदर बाळासाहेब विखे यांचे मावसभाऊ अण्णासाहेब म्हस्के आमदार होते. त्यांच्याकडं राज्याच्या जलसंधारण मंत्रिपदाची धुरा होती. 1995 पासून राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघातून निवडून जातात. त्यांना आतापर्यंत आव्हान दिलं गेलं; परंतु आव्हान देणारेच काळाच्या ओघात कुठं गडप झाले, … Read more

जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त भव्य मॅरेथॉन उपक्रमाचे आयोजन

अहमदनगर :- जागतिक मानसिक  स्वास्थ्य दिनाचे औचित्य साधुन सकारत्मक विचारसरणी साठी भव्य मैराथन उपक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व वयोगटातिल लोक या उपक्रमात सहभागी होउ शकतात.मानसिक आजारा विषयी समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. साधारण ताण-तणावापासून निद्रानाश उदासीनता नैराश्य आत्महत्येचे विचार येणे असंबद्ध तर येणे वेडेपणाचे आजार होणे अशा विविध स्वरूपामध्ये समाजामध्ये मानसिक आजारा दिसून येतात. मानसिक … Read more

केडगावचा विकास करून या भागातील दहशत कायमची संपवणार – किरण काळे

नगर : केडगावचा अजूनही विकास झालेला नाही. अनेक वर्षांपूर्वी केडगावचा नगरच्या हद्दीमध्ये समावेश झाला. परंतु योग्य नेतृत्वा अभावी आजही केडगाव मधील पाणी, रस्ते, गटारी यासारख्या मूलभूत सुविधा केडगावकरांना उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे निवडून आल्यानंतर आपण स्मार्ट केडगावची निर्मिती करणारा असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी केले आहे. केडगाव मधील प्रचाराचा शुभारंभ करत … Read more

एकाचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नेवासा : तालुक्यातील देडगावला शेषराव पांडुरंग मोरे (वय ५८) यांचा खून करण्यात आला. सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध नेवासा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या वादातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संभाजी शिवाजी थोरात, लक्ष्मण एकनाथ ऐडके (दोघे रा. देडगाव, ता. नेवासा) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत गणेश शेषराव … Read more