समाजकारणालाच जास्त महत्त्व देतो : सुजित झावरे

पारनेर :- विकासनिधीच्या माध्यमातून विकासाभिमुख कामे करणे हेच आपले उद्दिष्ट असून राजकारणापेक्षा आपण समाजकारणाला महत्त्व देत असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील देवीभोयरे गावठाण ते तुकाईवाडी मगरदरा रस्ता डांबरीकरण १५ लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. या वेळी त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात … Read more

निवडून आणण्यापेक्षा पाडण्यात मजा असते – खा.डॉ सुजय विखे

कर्जत :- भाजप उमेदवार पाडण्याचे पाप मला करायचे नाही. आपली ताकद या वेळी दाखवून देऊ, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. तथापि, खासदार सुजय विखे यांनी मध्यस्थी करत आपला मान ठेवण्याची जबाबदारी घेतल्यामुळे आपण भाजपत काम करणार आहोत, असे महासंग्रामचे संस्थापक नामदेव राऊत यांनी सांगितले. महासंग्राम युवा मंचाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ. विखे … Read more

राज्यात कर्जत- जामखेड मतदारसंघ आदर्श करू : ना. शिंदे

कर्जत : आगामी पाच वर्षांत मतदारसंघाचा असा विकास करून दाखविल की, संपूर्ण महाराष्ट्र येथील विकास पाहायला आला पाहिजे, आपण अगोदर करतो व नंतर सांगतो आणि काम करण्यावर जास्त भर देतो. मतदारसंघात जे होत नव्हते ते काम तुमच्या विश्वासामुळे करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. वालवड (ता. कर्जत) येथे संत सद्गुरू श्री … Read more

ट्रक चालकास भरदिवसा लुटले

अहमदनगर : नगर पाथर्डी रोडवरील पाथर्डी तालुक्यातील वाळुंज शिवारात महिंद्रा ट्रॅक्टर शोरूमजवळ पुण्याकडे जाणाऱ्या ट्रक चालकास रस्त्यात अडवून त्याच्याकडील ४५ हजार ५०० रूपये व ट्रकमधील ३०० लिटर डीझेल असा ऐवज लुटला आहे. ही घटना मंगळवार दि.१७ सप्टेबर रोजी घडली. याप्रकरणी ट्रकचालक बबन मधुकर सोनवणे रा.बाभळगाव ता.माजलगाव याच्या फियादीवरून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात पाच चोरट्याविरोधात दरोड्याचा गुन्हा … Read more

‘सत्ताधाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल’

टाकळीमानूर :- विकासकामांना मंजुरी असो नसो. गावागावात नारळ फोडण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. नारळं फोडलेली विकासकामे होणे गर्जेची होती. निवडणूक जवळ आल्याने विकासकामांची आमिषे दाखविली ज़ात आहेत, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे प्रतिपादन केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्रा. … Read more

भाच्याकडून मामीचा विनयभंग

कोपरगाव : शहरातील येवला रोडवरील भाच्याने साडीचा पदर ओढून विवाहित मामीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मामीने भाच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता पती व दोन मुलांसह राहते. तिच्या घराशेजारी भावजय तिच्या मुलासह राहते. बुधवारी (दि. १८) रात्री १०.३० वाजता भाचा दारू पिऊन घरासमोर … Read more

शेतकऱ्यांवर कालवा फोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील ताजू येथील १९ शेतकऱ्यांवर कालवा फोडल्याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाटबंधारे विभागात काम करणारे अंबादास निवृत्ती गिरमे यांच्या यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी ताजू येथील बापू खेत्रू हाके,बाबा कोंडीबा चोरमले,रामदास किसन दराडे,संपत लक्ष्मण दराडे,लक्ष्मण खेत्रू हाके, बारकू सोनू चोरमले,पर्वतराव खेत्रू हाके,भिवा रावा चोरमले,अजित फिरंगु कोळपे,भिवा चोरमले,शिवाजी … Read more

कर्जत-जामखेडच्या विकासासाठी ‘रोहित पॅटर्न !

‘कर्जत-जामखेड परिसरातील मतदारांचा केवळ निवडणुकीत मतदानापुरताच वापर करण्यात आला. मात्र, आपण परिसरातील विकासासाठी दृष्टिकोन विकसित करीत आहोत. त्यादृष्टीनेच शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित केले जात आहेत. कमी पाण्यामध्ये शेती, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन यांसारखे प्रयोग शेतकऱ्यांना माहीत व्हावेत, तसेच लोकांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या नवीन संधी, हेच आपले विकासाचे व्हिजन आहे. परिसरातील तलावांमध्ये साठलेला गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल. तुकाई … Read more

आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात ?

राहुरी :- मागील पाच वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झाले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सेनाच सत्तेवर येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येत आहेत. असे आ. कर्डिले म्हणाले. त्यामुळे आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नगर तालुक्‍यातील पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती … Read more

मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही – प्रा.राम शिंदे

कर्जत :- विरोधक म्हणतात, सूत गिरणीची चर्चा कुठेच झाली नाही. मग भूमिपूजन कसे? आपण सध्या चर्चा कमी करतो आणि काम करण्यावर जास्त भर देत आहोत. मतदारसंघात जे होत नव्हते, ते करून दाखवले, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी सांगितले. वालवड येथे संत सद्गुरु गोदड महाराज सहकारी सूत गिरणीच्या भूमिपूजनप्रसंगी शिंदे बोलत होते. व्यासपीठावर एच. यू. … Read more

शिर्डी मतदारसंघात सेनेकडून चार जण इच्छुक

शिर्डी-: विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याची चिन्हे दिसू लागल्याने पक्षांकडून मतदार संघनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत सेना भवनावर पार पडल्या. यावेळी शिर्डी मतदार संघातून विधानसभेसाठी शिवसेना नेते कमलाकर कोते, राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, जिल्हा संघटक विजय काळे यांनी मुलाखती दिल्या आहेत. राज्यात शिवसेना व भाजप … Read more

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिल्या राष्ट्रीय परिषदचे उद्घाटन संपन्न

प्रवरानगर लोणी :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा आज लोणी येथे पद्मश्री डॉक्टर अभय बंग , पद्मश्री डॉक्टर एच सुदर्शन, कुलगुरू डॉ वाय. एम. जयराज, प्र-कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे-पाटील यांच्या … Read more

सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा – डॉक्टर अभय बंग

अहमदनगर :- आदिवासींच्या आरोग्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन अहवालाच्या आधारे सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित ट्रायबेकॉन या परिषदेत ते बोलत होते. प्रवरा मेडिकल ट्रस्ट ने आदिवासी विकास मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि आदिवासी संशोधन व … Read more

सासरच्या मंडळीकडून जावयास बेदम मारहाण

अहमदनगर : तु तुझ्या पत्नीला चांगले वागवत नाहीस. त्यामुळे आम्हाला आमची मुलगी घरी घेवून जायची आहे.त्यास पतीने विरोध केल्याने सासरच्या मंडळींनी लक्ष्मण रामचंद्र ताकवाले (रा. खेंडे, ता. पाथर्डी) यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी आई अलका या मध्ये आल्या असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगळ केली. तसेच जीवे मारण्याची … Read more

मुलींचे फोटो काढल्याची बतावणी करून चोरी

अहमदनगर :’तू मुलींचे फोटो काढले आहेत. राजाभाऊंनी बघितले आहे’, अशी बतावणी करून दोघांनी यश पॅलेस चौकात चल, असे म्हणून एकाला फसवून मोबाईल चोरून नेला. कायनेटीक चौकाजवळील इलाक्षी शोरूम समोर ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. . याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोरख दत्तात्रय चव्हाण (रा.राणी लक्ष्मीबाई चौक, … Read more

श्रीरामपूर विधानसभेसाठी कॉग्रेसकडून १९ जण इच्छुक

श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राज्यभरात कॉँग्रेस पक्षाच्या मुलाखती सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल श्रीरामपुरात विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यावेळी १९ उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली शहरातील संगमनेर रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये या मुलाखती झाल्या. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा संघटक बाबासाहेब कोळसे, … Read more

बद्रीनाथ महाराजांच्या हस्ते आदर्श अभियंता व आदर्श कर्मचारी पुरस्काराचे वितरण

अहमदनगर : बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी सेवा संस्था, अहमदनगर यांच्यातर्फे आदर्श अभियंता व आदर्श कर्मचारी पूरसाकाराचे मा. बद्रीनाथ महाराज तनपुरे व जंगले महाराज यांच्या हस्ते नुकतेच  दि. १७/०९/२०१९ रोजी सावेडीतील माउली संकुलामध्ये  वितरण करण्यात आले. यावेळी आदर्श अभियंता म्हणून श्री. अंकुश अशोकराव पालवे व श्री श्रीनिवास वर्पे यांचेसह श्री अनिल लाटणे,  श्री. पी. जे. … Read more

शेतकरी महिलेने मागितले इच्छामरण !

नेवासा : खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने मिळावा यासाठी गेली अडीच ते तीन महिने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, सबंधित मंत्रालय, जिल्हा व तालुका प्रशासनासह संबंधित महावितरण तालुका व जिल्हा कार्यालय यांच्याकडे एकूण आठ वेळा मेल, रजिस्टर्ड पत्रव्यवहार, प्रत्यक्ष कार्यालयात पाठपुरावा, विनंत्या केल्या. मात्र, अद्यापही वीजपुरठा सुरळीत न झाल्याने अखेर हताश होवून नेवासा बुद्रुक येथील प्रयोगशील … Read more