कांदा @ ३२००

राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंडयावर काल २७,१०० गोण्यांची आवक होऊन कांद्यास ३२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.  कांद्याच्या भावात ४०० ते ५०० रुपये वाढ झाली आहे. प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : एक नंबर कांद्यास २५०० ते ३२०० रुपये भाव मिळाला. तसेच दोन नंबर कांद्यास १६०० ते २४९५, तीन नंबर कांद्यास ५०० … Read more

मुळा धरणातून ३ हजार क्युसेकने पाणी सोडले

राहुरी शहर : मुळा धरणातून नदी पात्रात तीन हजार क्यूसेकने काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली. मुळा धरणाचा पाणी साठा २५ हजार ७३८ टीएमसी असून धरणात ३ हजार ४०० क्यूसेकने आवक सुरु असून धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरु आहे. धरण ९८ टक्के भरले आहे. मुळा उजवा … Read more

राज्यात पुन्हा युतीचे सरकार !

राहुरी : पाच वर्षात सत्तेवर असताना आम्ही केलेल्या विविध लोककल्याणकारी कामांमुळेच राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे महाजनादेश यात्रेनिमित्त लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अधोरेखित झाले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात राहुरी फॅक्टरी येथे मुख्यमंत्री बोलत होते. राहुरी फॅक्टरी येथे देवळाली प्रवरा शहरवासियांच्या वतीने आमदार चंद्रशेखर कदम … Read more

मुलीची छेडछाड करणाऱ्यास सक्तमजुरी

अहमदनगर : पिडीत मुलीच्या छेडछाड प्रकरणी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत एल.आणेकर यांनी आरोपी रोहन उर्फ राहुल दिगंबर फलके, रा.मठ पिंपरी, ता.जि. अहमदनगर यास सत्र खटल्याच्या निकालाविरूध्द न्यायालयात दाखल केलेल्या अपीलामध्ये भा.द.वि.का.क. ३५४ नुसार दोषी धरून त्यास १ महिना सक्त मजुरी व ५०हजार रू. दंडाची शिक्षा ठोठावली.  सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील ॲड. एम.व्हि दिवाणे यांनी काम … Read more

कर्जत – जामखेडमध्ये बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही !

जामखेड : ज्या बारामतीकरांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील बळीराजाच्या हक्काचे पाणी येऊ दिले नाही ते पाणी ना.राम शिंदे यांनी आणले. ज्यांनी पाणी आवडले त्यांना थारा देऊ नका. जिल्ह्यासह कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बाहेरचे उसनं नको, आमचं ते आमचचं असत.  कर्जत-जामखेड मतदार संघात बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही. पार्थ पवार पेक्षाही रोहित पवार यांची वाईट परिस्थिती … Read more

राधाकृष्ण विखे-पाटलांना दिलासा

मुंबई : राज्यात नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणारे नवनिर्वाचित मंत्री काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपच्या गोटात सामील झालेले राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले जयदत्त क्षीरसागर आणि रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला.  त्याच्या मंत्रीपदाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. बहुचर्चित … Read more

ही फक्त सुरूवात आहे : प्रशांत गडाख

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या पाच वर्षांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना नागाची उपमा देऊन तोंड ठेचण्याची भाषा केली. गडाख तालुक्याला लागलेली कीड आहे, यशवंतरावानी ७५ वर्षांत नेवाशात एकही कुटुंब सोडल नाही, ज्यांना आऱ्या टोचल्या नाही, चिमटा काढला नाही असे अनेक गलिच्छ आरोप केले. मी फक्त त्यांची जी प्रकरणे त्यांच्याच जुन्या मित्रांना माहीत … Read more

संगमनेरची निवडणूक लक्षवेधी ठरणार आ.थोरांताविरोधात इंदुरीकर महाराज निवडणूक लढविणार ?

संगमनेर – येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज निवडणूक रिंगणात उतरणार अशी दबक्या आवाज चर्चा होती. मात्र आज शुक्रवारी संगमनेर येथील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने इंदुरीकर महाराज थोरातांविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज रिंगणात उतरणार या दबक्या … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर महिलेकडून शाईफेक !

अहमदनगर : अकोले तालुक्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शाईफेकीची घटना घडली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ता शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिशय शाई फेकून निषेध केला. शासनाने महापोर्टल बंद केले, अकोले तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. अकोले येथे सुगाव शिवारात … Read more

यशवंतराव गडाख धृतराष्ट्र झालेत !

सोनई :- पुत्र प्रेमापोटी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख धृतराष्ट्र झाले आहेत.त्यांची ही धृतराष्ट्रनीती झुगारून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ द्या असे आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. सोनई येथील आदर्श विद्यालयाच्या मैदानावर मुरकुटे यांच्या विकास दिंडीची सांगता झाली.त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शैनेश्‍वर देवस्थानाचे विश्‍वस्त बापूसाहेब शेटे अध्यक्षस्थानी होते. … Read more

विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार : आ. राहुल जगताप

ढवळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार आहोत, असे प्रतिपादन आ. राहुल ज़गताप पाटील यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथे पाच लाख रुपये खर्चाच्या स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाच्या उद्घाटनप्रसंगी आ. जगताप बोलत होते. आ. ज़गताप पुढे म्हणाले, आम्ही जनतेला जी आश्वासने दिली, ती पूर्ण करणार असून, ज़नतेने विकासकामे करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिज़े. … Read more

आ. मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या !

पाथर्डी :- राज्यात या वेळी पुन्हा भाजप व मित्र पक्षांचे सरकार येणार असून, विरोधकांत अवमेळ सुरू असून, त्यांच्यात मेळ होईपर्यंत विधानसभेचा निकाल लागलेला असेल, त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका, शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. तालुक्यात … Read more

आ. संग्राम जगताप यांच्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता !

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात चितळे रोडवर गळ्यात भगवा पंचा घालून मानाच्या विशाल गणपतीसमोर ढोलवर रिदम धरण्याबरोबरच ते भगवा ध्वज घेऊन देखील नाचले. आमदार जगताप यांचा हा भगवा रिदम नगर शहरातील आगामी विधानसभा निवडणुकीची वेगळी नांदी ठरू शकते. असे राजकीय धुरींचे बोलबाल आहे. आमदार जगताप यांच्या गळ्यातील भगवा पंचा आणि … Read more

मुलीची छेड काढणारा ‘तो’ तरुण पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर – शहरातील हॉटेल उदय पॅलेससमोर मुलीची छेड काढणाऱ्यास पोलिसांनी काकडी (ता. राहाता) येथून पकडून आणले. तरुण तालुक्यातील खानापूर येथील आहे. मात्र, ज्या मुलीची छेड काढली तिने तक्रार दिलेली नसल्याने पोलिसांना पुढील कारवाईस अडचणी येत आहे. त्यामुळे तक्रारीसाठी पुढे येण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. ही घटना सिद्धीविनायक गणपती मंदिराजवळ घडली. यावेळी मुलीने हिमत दाखवित सदर … Read more

स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अहमदनगर :- स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन 11 सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक निवासी शाळा घारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी शालेय परिसरात श्रमदान केले तेथील विद्यार्थ्यांच्या समवेत आनंदाचा क्षण साजरा केला, यावेळी विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.  … Read more

भाजपाला अँड प्रताप ढाकणे का चालत नाहीत?

पाथर्डी – येथील काही ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपच्या नेत्या व भावी मुख्यमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी ना.मुंडे यांच्या कडे अँड प्रताप ढाकणे यांना भाजपात घ्या असा आग्रह त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी धरला होता परंतु ढाकणे हे राष्ट्रवादीत आहेत, त्यांना भाजपात कसे घ्याचे असे उत्तर ना.मुंडे यांच्याकडून आले. हे उत्तर वंजारी समाजाच्या राजकीयदष्ट्या योग्य नव्हते. … Read more

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

संगमनेर : शहरातील एका रस्त्यावर विजय अण्णासाहेब दिघे (वय २४, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) याने एका एकवीस वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.  याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास विजय अण्णासाहेब दिघे याने तरुणीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कोपरगाव : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पुणतांबा चौफुली ते इगडेफाटा दरम्यान गुरसळ वस्ती, डाऊच खुर्द (ता. कोपरगाव) येथे शनिवारी (दि. ७) रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  याबाबत अधिक माहिती अशी, रवींद्र सर्जेराव जानराव (वय ४२, रा. अंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक) हे दुचाकी (क्र. एमएच १५, बीएस ८३८०) वरून जात … Read more