कांदा @ २७०० रूपये

राहुरी शहर : बाजार समितीच्या वांबोरी उपकेंद्रावर काल कांद्याची चार हजार ९४४ गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास २७०० रूपये भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : कांदा नं. १ – २१०० ते २७००, कांदा नं. २ – १५०० ते २०७५, कांदा नं. ३ – ५०० ते १४७५, गोल्टी – … Read more

आ. संग्राम जगतापांच्या प्रवेशाला विरोध

नगर : आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुरू असलेली चर्चा अजूनही सुरूच आहे. आ. जगताप हे मात्र त्याचा इन्कार करतात. पण आमदार जगताप जर शिवसेनेत आले तर त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. केडगावातील हत्याकांडात दोघा शिवसैनिकांचे प्राण … Read more

शिवसेनेची उमेदवारी मलाच- लहू कानडे

श्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी मलाच मिळेल, असा दावा ज्येष्ठ साहित्यिक व शिवसेनेचे इच्छूक उमेदवार लहु कानडे यांनी व्यक्त केली असून ते म्हणाले की , आमदार कांबळे यांनी जरी शिवसेनेत प्रवेश केला तरी उमेदवारी मलाच मिळेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्यासारख्या निष्ठावंत व जनाधार असलेल्या कार्यकर्त्यावर  अन्याय करणार नाही. सर्वशिवसैनिक व चाहते मतदार … Read more

श्रीरामपूरचा आमदार राधाकृष्ण विखेच ठरविणार!

श्रीरामपूर ;- विखे परिवार व त्यांना मानणाऱ्या संघटनेची ताकद काय आहे, हे आम्ही तीन दिवसात खा. सदाशिव लोखंडे यांना ६५ हजार मतांनी पुन्हा खासदार करून दाखवून दिले. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी श्रीरामपूरचा आमदार कोणाला करायचे, हे विखे ना. राधाकृष्ण विखेच ठरविणार आहेत, असा सूचक इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. निघोज येथील रेशनकार्ड … Read more

पक्षप्रवेशानंतरही आ. कांबळेंची वाटचाल बिकट !

श्रीरामपूर : आमदार कांबळे यांनी नुकताच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मातोश्रीवरून त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. उमेदवारी लादल्यास पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी दिला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्यापुढील समस्या वाढल्या आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद … Read more

आ.जगताप यांच्याकडून महापालिकेचा निषेध

अहमदनगर : शहरामध्ये गणेशाचे आगमन भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात झाले आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी शहरातील रस्त्याचे पॅचिंग, कचऱ्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात होता, परंतु यावर्षी महापालिका प्रशासनाच्या उदासीनपणामुळे कुठलीही उपाययोजना झाली नसल्यामुळे नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेचा निषेध व्यक्त करत २ … Read more

श्रीगोंद्यात मामा फिर्यादी तर भाचा आरोपी!

श्रीगोंदा : मामा भाच्याचं एक वेगळंच नात असतं, परंतू श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे मात्र मामा फिर्यादी तर भाचा आरोपी झाला आहे. मामानेच आपल्याच भाच्याविरोधात शेतातील विहिरीवरील स्टार्टर चोरीप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सागर निंभोरे रा. घोडेगाव, असे संशियत आरोपीचे नाव आहे. गोरख दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोडेगाव शिवारात … Read more

विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे

शेवगाव : निवडणुकीपुरते राजकारण, निवडणूक झाल्यानंतर मात्र विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे माझे धोरण असून, निधी देतानाही मी कधी कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही, शहरात सरसकट सर्व नगरसेवकांना निधी दिला. यापुढील काळातही सार्वजनिक कामांना प्राधान्याने निधी दिला जाईल, विकासाच्या मुद्यावर आपण आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असून, विकास कामांसाठी यापुढील काळातही … Read more

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही !

शेवगाव – तालुक्यातील शेतकऱ्यांची गेल्या ४ ते ५ वर्षांत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. निसर्ग साथ देत नाही, शासन मदत करत नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणी वालीच राहिलेला नसून, पूर्व भागात तर शेतकरी मोडून गेला आहे, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे … Read more

देशाची अर्थव्यवस्था अनागोंदीत आनणार्‍या हुकुमशाहीचा निषेध !

अहमदनगर :- भाजप प्रणित मोदी सरकारच्या हुकुमशाही निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था अनागोंदीत सापडल्याचा पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात निषेध नोंदविण्यात आला. तर अर्थव्यस्थेसाठी वारंवार धोक्याचा इशारा देणारे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना इंडियन लॉरिस्टर अगेन्स्ट गव्हर्नन्स इन्ट्रॉपी सन्मानची मानवंदना देण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, शाहीर … Read more

अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेवगाव :- तालुक्यातील मुरमी येथे पावसात अंगावर वीज पडल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव साहेबराव गरड (वय ७०), असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना गुरुवारी रोजी रात्री नऊ वा. घडली. तर याच दिवशी सामनगाव येथे पावसामुळे गंगाधर म्हस्के यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून एक गाय दगावली. शुक्रवारी देवराव गरड हे घराच्या पडवीत झोपले … Read more

थोरातांच्या तालुक्यात विखे पाटलांकडून विकासकामांसाठी १ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर!

संगमनेर :- तालुक्यातील १६ गावांमधील मूलभूत सुविधांकरिता युती सरकारच्या माध्यमातून १ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. सावरगाव तळ, मालुंजे, निमोण, अंभोरे, चंदनापुरी, जोर्वे, मनोली, शिबलापूर, आश्वी खुर्द व बुद्रूक, ओझर खुर्द, कोल्हेवाडी, चिंचपूर, पिंपरी लौकी, उंबरी बाळापूर या गावांचा यात समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठीचा प्रस्ताव … Read more

आमदार राहुल जगताप यांच्या निधीतील तब्बल ३ कोटी ८० लाख खड्ड्यांत…

श्रीगोंदा :- ढवळगाव ते बेलवंडीफाटा रस्त्यावर खर्च केलेले ३ कोटी ८० लाख खड्ड्यात गेले आहेत. डांबरीकरणास चार महिने उलटत नाही तोच ठिकठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी डांबरी रस्ता आहे की नाही अशी शंका येते. बऱ्याच ठिकाणी दीड मीटर रुंदीच्या साईडपट्ट्या केलेल्या नाहीत. बेलवंडीफाटा ते ढवळगाव रस्ता पुढे … Read more

आमदार मुरकुटे यांची आजपासून विकास दिंडी

नेवासा :- आमदार बाळासाहेब मुरकुटे हे विकास दिंडीच्या माध्यमातून मंगळवारपासून १२ सप्टेंबरपर्यंत नेवासे तालुक्यातील गावोगावी जनजागृती करणार करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारने गोरगरिबांसाठी राबवलेल्या योजनांसह लोकप्रतिनिधी नात्याने तालुक्यातील विकासकामांचा लेखाजोखाही ते गावोगावच्या बैठकांत जनतेसमोर ठेवणार आहेत. जिल्ह्यात विकासकामांचा सर्वाधिक ओघ नेवासे तालुक्यात आणल्याचा आमदार मुरकुटे यांचा दावा आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, सभामंडपासह अंतर्गत रस्ते, … Read more

शरद पवार यांच्या विषयी सोशल मिडीयावर बदनामी कारक मजकूर

शिर्डी : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविषयी सोशल मिडीयावर बदनामीकारक लिखाण करुन जनतेच्या भावना दुखावणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. लोणी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मिडीयावर एका व्यक्तीने माजी केंद्रीय मंत्री … Read more

प्रसिद्ध निवेदक आणि रेडिओ जॉकी आर.जे ऋषि शेलार यांना महाराष्ट्राचा युवा आयडॉल पुरस्काने सन्मान

अहमदनगर :- आपल्या सुमधुर आवाजे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे निवेदक ,युवा व्याख्याते ,लेखक, कवी, रेडिओ जॉकी, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व ऋषिकेश शेलार यांना  महाराष्ट्राचा युवा आयडॉल निवेदक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या अनोख्या आवाजाने त्यानी रसिक प्रेक्षकांना अगदी थोड्या दिवसात आपलेसे केले आणि संपूर्ण महाराष्ट्राचा साठी त्यांचे व्यक्तीमत्व एक आदर्श बनून गेले.  सर्व … Read more

विधानसभेसाठी भाजपकडून राहुल झावरे ?

पारनेर :- अहमदनगर जिल्ह्यात राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर १२-०घोषणा करुन त्यादृष्टीने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात बांधणी सुरु केली. पारनेर -नगर विधासभा मतदारसंघासाठी भाजपकडून विखे कुटूबियांशी पस्तीस वर्षापासून घनिष्ठ संबध असलेले माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे पुत्र पारनेर पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांना विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे विखेंनी आदेश देवून प्रवरेची यंत्रणा सक्रिय केल्याने … Read more

विवाहित तरुणीची आत्महत्या

राहाता : तालुक्यातील साकुरी येथे एका विवाहितेने छपराच्या बांबुला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील कविता विजय गायकवाड (वय १८) ही विवाहित महिला साकुरी येथील १३ चारीजवळ बनरोड येथे माहेरी आली होती. काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास ती तीच्या … Read more