माजी आमदार अनिल राठोड पुन्हा अस्वस्थ

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली. या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता. आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय … Read more

राष्ट्रवादीने काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत !

पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली. त्यांनी (राष्ट्रवादी) काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडविली. महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की दोन्ही काँग्रेस सत्तेवर असताना त्यांची माजोरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 15 हजारांची लाच घेताना अधिकारी जाळ्यात

अहमदनगर :- जात पडताळणी समिती कार्यालयात लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचून एकाला 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले अविनाश विश्वनाथ मगर असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पत्नीचे ओ.बी.सी. कुणबी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्राचे काम करून देवून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आरोपी लोकसेवक अविनाश विश्वनाथ मगर, विधी अधिकारी,जिल्हा जाती प्रमाणपत्र … Read more

१ लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ

लोणी – राहाता तालुक्यातील दुर्गापूर चारी नं. ११ दाढ रोड परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. वैशाली गणेश पुलाटे, वय २७ हिला नवरा, सासू, सासरा व सासरच्या लोकांनी संगनमत करुन माहेरुन गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेवून ये, असे म्हणत वेळोवेळी पैशाची मागणी करून शिवीगाळ करत मारहाण केली.  तसेच तिला उपाशीपोटी ठेवून शारीरिक व … Read more

भांडणाचा जाब विचारल्याने धारदार शस्राने डोक्यात वार

नगर – नगर परिसरात वडगाव ते पिंपळगाव माळवी, शेंडी बायपास रस्त्यावर काल ९.३० च्या सुमारास स्पीडब्रेकरजवळ भांडण चालू होते.  ट्रक चालकाला पल्सरवरील आरोपी मारहाण करीत होते. तेव्हा भांडण पाहून थांबलेले शिवनाथ संपत शेवाळे, वय ३२ रा. वडगाव गुप्ता या तरुणाने तुम्ही ट्रक ड्रायव्हरला का मारता?  असा प्रश्न केला तेव्हा आरोपींना राग येवून त्यांनी धारदार शस्राने … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. कविता सागर गांगुर्डे, वय २५ वर्ष ह्या तरुणीने विषारी औषध पिवून आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी चारित्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ करायचे, कविता हिने माहेरुन मोटारसायकलचे हप्ते फेडण्यासाठी पैसे आणावेत म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करत त्रास दिला होता. … Read more

कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर : नगर मनमाड महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१८) रात्री ८ च्या सुमारास घडली. दिलीप माणिक सोनवणे (वय ४२, रा. वनराई कॉलनी, नवनागापुर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, नवनागापुरमधुन सह्याद्री चौकाकडून वनराई कॉलनीकडे जाणाऱ्या रोडने भरधाव वेगात जाणाऱ्या मारूती … Read more

छिंदमच्या नगरसेवकपदाबाबत सुनावणी पूर्ण

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या तत्कालीन उपमहापौर व विद्यमान नगरसेवक श्रीपाद छिंदमच्या नगरसेवक पदाबाबत महासभेने केलेल्या ठरावावर नगरविकास राज्यमंत्र्यासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे. यावेळी मनपासह छिंदमनेही म्हणणे सादर केले.याप्रकरणी आता नगरविकास राज्यमंत्र्याकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. मनपाच्या तत्कालीन सर्वसाधारण सभेत छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव … Read more

महापालिका कामगाराचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू

अहमदनगर : शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू झाली आहे. मागील आठवड्यात सारसनगरमधील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर वैदुवाडी येथे राहणाऱ्या मनपा कामगाराचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला. बाबाजी शिंदे असे मयत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. उपचार सुरू असताना … Read more

नगर जिल्ह्यासाठी कांदा अनुदानासाठी ७३ कोटी मंजूर

अहमदनगर :- ‘राज्यात कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी ७३ कोटी २१ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच प्रसन्ना कृषी मार्केट या खासगी बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करण्यात … Read more

महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा

संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेला जे खोट सांगत आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे या महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही आजपासून काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला अमरावती येथून सुरुवात करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. संगमनेर येथे सहकार … Read more

महाराष्ट्रातील साखर कामगारांचा पुणे साखर आयुक्त कार्यालयावर बुधवारी मोर्चा

अहमदनगर :- महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस कॉ.आनंदराव वायकर व प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे यांनी दिली. या दोन राज्यव्यापी संघटनांच्या वतीने … Read more

शिक्षकांची शासनाकडून वारंवार फसवणूक शिक्षक दिनावर घालणार बहिष्कार

नगर- शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी गौरवाचा दिवस असतो. मात्र शिक्षकाला गुरू मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात मागील पाच वर्षात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे शासन  वारंवार दुर्लक्ष करित असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, त्यामुळे शिक्षकांची वारंवार  फ़सवणुक होत असून या  मागण्यांचा तत्काळ शासन आदेश न काढल्यास येत्या शिक्षक काळ्या फिती लावून दिनावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती अहमदनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पारनेर :- तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. बाबाजी विठ्ठल बडे, कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य व धनंजय (सर्व रा. … Read more

काय होणार श्रीगोंदा मतदारसंघात ?

श्रीगोंदा :- विधानसभा मतदार संघात या वेळी पुन्हा पाचपुते विरुद्ध जगताप अशीच लढत होण्याचे चित्र दिसत आहे. मात्र, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा याही इच्छुक आहेत. आघाडी झाल्यास त्यांचा पत्ता आपोआप कट होईल.नागवडे व जगताप यांची दिलजमाई झाली तर पाचपुते विरुद्ध जगताप अशी मुख्य लढत ह्या निवडणुकीत … Read more

पावसाची पुन्हा दमदार हजेरी

नगर :- शहर व उपनगरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दीड ते दोन तास झालेल्या या पावसाने शहरातील रस्त्यांची पुन्हा दाणादाण उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित नगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेचे काही रस्त्यांचे पॅचिंग करण्यात आले होते. त्या काही रस्त्यांवरील डांबर पावसाने वाहून गेले. या पावसामुळे शहरांतर्गत रस्त्यावर चिकचिक वाढली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची … Read more

शेतकरी आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर :- नगर तालुक्यात छावण्यां अभावी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे. सहा वर्षापूर्वी ते स्वत:च अशी मागणी करत होते, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धनशाम शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किसन लोटके, बाळासाहेब पवार, अशोक … Read more

भाजपने अष्टपैलू नेता गमावला

अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात तीन बहुमोल हिरे गमावले आहेत. यातील अरुण जेटली हे अर्थतज्ज्ञ, अभ्यासू व विचार प्रगल्भ विचारवंत नेते होते. अशा महान नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने पक्षाने अष्टपैलू नेता गमावला आहे, अशा शब्दांत शहर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व.अरुण जेटली यांना श्रद्धांजली … Read more