इंडिकाची धडक बसून पाच वर्षांच्या मुलाच मृत्यू 

अहमदनगर – जामखेड तालुक्यातील साकत येथील कोमल व गोविंद चव्हाण हे रक्षाबंधनासाठी सारणी (ता. केज) येथे गेले असताना त्यांच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा इंडिका कारची धडक बसून जागीच मृत्यू झाला. अथर्व गाेविंद चव्हाण असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कोमल व तिचे पती अथर्वसह नांदूर फाट्यावरून टमटमने सारणी फाट्यावर उतरले. त्याचवेळी केजकडून येणाऱ्या इंडिकाची रस्त्याच्या कडेला असलेल्या अथर्वला … Read more

फुलसौंदर यांच्या मदतीला आ.संग्राम जगताप !

अहमदनगर  : माजी महापौर व शिवसेनेचे स्थानिक नेते भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल गुन्हा खोटा असून, याबाबत योग्य ती चौकशी करावी. फुलसौंदर यांच्यावर अन्याय होणार नाही, याची पोलिस प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार जगताप यांनी पोलिस अधीक्षक यांना दिले आहे. माजी महापौर भगवान फुलसौंदर व इतर आठ जणांवर … Read more

भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

अहमदनगर  – शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणविरोधात  अनुसूचित जाती जमाती अधिनियम व अत्याचार करणे यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून काल शनिवारी (१७) रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर, गणेश फुलसौदर, महेश … Read more

सिंधुताई बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन

नगर : दिवंगत लोकनेते पद्मभुषण खा.बाळासाहेब विखे पाटील यांच्या धर्मपत्नी व मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री प्रि श्रीमती सिंधुताई बाळासाहेब विखे पाटीलयांचे आज रविवार सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले त्या ८५ वर्षाच्या होत्या. आज प्रवरा ग्रामीण रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.  आज दुपारी १२वा. प्रवरानगर येथील पद्मश्री विखे कारखान्याच्या डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार … Read more

पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच अटलजींना श्रद्धांजली

अहमदनगर :- देशात भाजपची सत्ता आली आहे आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपची सत्ता आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांना नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.  भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहर जिल्हा … Read more

दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने प्रेमवेड्या तरुणाने केले हे कृत्य

अहमदनगर :- दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद देत नसलेल्या महिलेचा तिच्या नाेकरीच्या ठिकाणीच विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला. वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये नोकरीला असलेल्या महिलेचा दोन वर्ष पाठलाग करूनही ती प्रतिसाद देत नसल्याने आरोपीने थेट तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव अनिल सैदर असे आहे. पिडीत … Read more

जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व जनता स्वीकारेल, असे वाटत नाही !

अहमदनगर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमधून लढण्याच्या तयारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना कोणाचेही नाव न घेता राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये कोणाला कुठे उभे राहायचे, हा ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. मात्र, नगर जिल्ह्यामध्ये सक्षम मंडळी आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व येथील जनता स्वीकारेल, असे … Read more

शिवसेना नेत्याच्या पुत्रावर जीवघेणा  हल्ला

अहमदनगर – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मुलावर शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात मुलगा निशांत जखमी झाला आहे. अनिल माधव वैरागळ (टिळकनगर), शुभम दशिंग आणि दोन अनोळखी यांनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निशांत हा बसस्टँडजवळ चहा पित होता. त्या वेळी अनिल वैरागळ याने शिवीगाळ करत हुज्जत घातली. … Read more

पाटाच्या पाण्यात आढळला मृतदेह

श्रीरामपूर  – श्रीरामपूर शहरात पाटाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून तो पाण्यात पडून मयत झाला असावा, याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटलेली नाही. तो नेमका कुठला? पाण्यात कधी पडला? त्याला पोहता येत होते का? काही घातपात आहे? असे अनेक प्रश्न बघे नागरिक उपस्थित करीत होते. हेकॉ … Read more

आ. कोल्हेंकडून डेंग्यूसदृश्य साथीची गंभीर दखल

कोपरगाव : शहरात सध्या डेंग्यूसदृश्य आजार व अन्य साथींचे आजाराचे रूग्ण वाढत आहे. कोपरगाव ग्रामिण रूग्णालय व संबंधीत वैद्यकिय अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रूग्णांना खासगी दवाखान्यांत दाखल होवून उपचार घेणे असह्य होत आहे. त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेट कोपरगाव ग्रामिण रूग्णालयास मंगळवारी अचानकपणे भेट देवून सर्व परिस्थिती जाणून घेतली. … Read more

महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण लांबविले

संगमनेर : शहरातील अकोले बायपास रस्त्यावरील पेटीट हायस्कूल येथून जाणाऱ्या जयश्री पंढरीनाथ सहाणे (वय ३०, रा. गोविंदनगर, गल्ली क्र. ५, संगमनेर) या महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण चोरून अज्ञात चोरट्यांनी धूमस्टाईलने पोबारा केल्याची घटना शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.. … Read more

वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू

राहाता : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमधील एकाची ओळख पटली असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.. राहाता शहरातील कोपरगाव नाक्याजवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डेसे शंकर कमरू (वय २०, रा. निरोली, मध्यप्रदेश) त्याच्यासोबत असलेला साथीदार नाव माहीत नाही. या दोन … Read more

शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नितीन शेळकेसह ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अहमदनगर : नगर – पुणे रोडवरील वाडेगव्हाण शिवारात दरोडा टाकल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. ही घटना १४ ऑगस्टला घडली असून, १५ रोजी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. अविनाश सुभाष ढोरमले यांच्या फिर्यादीनुसार नितीन पांडुरंग शेळके, किशोर यादव, अजय शेळके, विजय शेळके, गणेश कोहोकडे, गोरख मोटे, राहुल यादव, अक्षय कचरे, संदीप चौधरी, सचिन पांडुरंग शेळके … Read more

कोयत्याचा धाक दाखवत मारहाण,दीड लाख लुटले

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे नगर पुणे रस्त्यावर हॉटेल गुरुकृपासमोर संदिप ज्ञानदेव चौधरी (रा.वाडेगव्हाण ता.पारनेर) व त्यांचे सहकारी संकेत सुरवसे या दोघांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर पिस्तूल रोखत, कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील गाडीच्या डिक्कीतील ७५ हजार रूपये रोख व ७५ हजारांची सोन्याची चैन असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना … Read more

श्रीगोंदा विधानसभेची भाजपची उमेदवारी मलाच – माजीमंत्री पाचपुते

श्रीगोंदा : सध्या तालुक्यात काही नेते भाजपमध्ये जाणार त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार अशा वावड्या उडवल्या जात आहेत. परंतु त्या सगळ्या अफवा असून, श्रीगोंदा विधानसभेची भाजपची उमेदवारी आपल्यालाच निश्चित असून मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आपल्यालाच असून, तयारीला लागण्यास सांगितल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात … Read more

राष्ट्रवादीला आघाडी न मिळाल्यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल – नितीन शेळके

पारनेर :- लोकसभा निवडणुकीत सुपे गटात राष्ट्रवादीला आघाडी न मिळाल्यामुळे त्या पक्षाचा विधानसभेचा तथाकथित उमेदवार आकसापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडत असल्याचा आरोप युवा सेनेचे तालुका अधिकारी नितीन शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये कामाच्या ठेक्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत दोन्ही गटांत … Read more

रोहित पवार यांच्या ‘सृजन तर्फे कर्जत मध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या स्पर्धा !

कर्जत :- रोहित पवार यांच्या ‘सृजन’ या संस्थेच्या वतीने कर्जत-जामखेड परिसरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.  कर्जत तालुक्यातील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात रविवारी 18 ऑगस्ट आणि सोमवार 19 ऑगस्ट रोजी कुस्तीची ही स्पर्धा होणार आहे.  18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या स्पर्धेचे उदघाटन होणार असून 18 तारखेला कर्जत आणि जामखेड … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 288 मतदारसंघांतील उमेदवार निश्चित

मुंबई – सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते तीन संभाव्य उमेदवारांच्या नावांची शिफारस लवकरच काँग्रेसच्या केंद्रीय निवड मंडळाला करण्यात येणार आहे.  प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात 54 सदस्य आहेत. मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस टिळक भवनात बैठका झाल्या. त्यामध्ये विदर्भ, … Read more