विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

राहुरी :- तालुक्यातील मोमीन आखाडा येथील शशीकांत दत्तात्रय कोहकडे, वय २७ हा तरुण शेतक-याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान मोमीन आखाडा येथील शशीकांत कोहकडे हा संध्याकाळी २८ आपल्या शेतातील विद्युत मोटार चालु करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का लागल्याने तो खाली पडला. त्याला नातेवाईकांनी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी … Read more

नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्यास अटक

पारनेर :- लग्नाचे आमिष दाखवून, सोबत काढलेले फोटो आई-वडिलांना दाखवण्याची तसेच नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील संदीप बन्सी करंजेकर या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पारनेर पोलिसांनी आरोपी संदीप यास अटक केली आहे. मजुरी करणाऱ्या आदिवासी तरुणीची सन २०१७ मध्ये संदीप करंजेकर याच्याशी ओळख … Read more

सेवानिवृत्त शिक्षकाकडून मुख्याध्यापिकेचा विनयभंग

पारनेर :- तालुक्यातील जामगाव येथील हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेस सेवानिवृत्त शिक्षक हरिभाऊ धोंडिबा मेहेर याने अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना शक्रवारी सकाळी घडली. मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीवरून मेहेर याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जामगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एम. लंके हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे संस्थेचे सचिव महादू बाबू मेहेर यांनी पीडित मुख्याध्यापिकेची त्या … Read more

पालकमंत्र्याच्या नावाचा गैरवापर करुन ४ लाखाची फसवणूक

नगर :- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे आरोपी अक्षय अविनाश शिंदे याने पालकमंत्री श्री. राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करुन श्रीकांत आनंदा मांढरे, धंदा शेती, रा. बेलगाव, ता. कर्जत यांची व त्यांचे मावस माऊ जयवंत रामचंद्र गायकवाड यांना शासकीय नोकरीला लावतो, असे म्हणून दोघांकडून प्रत्येकी २ – २ लाख रुपये रोख रक्कम असे एकूण ४ … Read more

पैशाची मागणी करते म्हणून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकरास अटक

पारनेर :- वारंवार पैशाची मागणी करणार्या आपल्या प्रेयसीचा खुन करुन पसार झालेल्या प्रियकराला मुंबईहुन अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश मिळाले आहे. पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे काल ता.28 रोजी सायंकाळी ही घटना घडली. मात्र गुन्हा दाखल होताच पारनेर पोलिसांनी आरोपी गोविंद सुरेश ढवण रा .कोहकडी ता. पारनेर यास अवघ्या बारा तासात जेरबंद केले. … Read more

विवाहबाह्य संबंधातून विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या

पारनेर :- तालुक्यातील कोहकडी येथे विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. संध्या सुभाष गव्हाणे (२२) असे या तिचे नाव असून विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. गव्हाणे कुटुंबीय भटक्या समाजातील असून गेल्या काही वर्षांपासून ते कोहकडी येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले आहेत. मृत संध्याचे चार वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या … Read more

बियरबारमध्ये झालेल्या भांडणात मॅनेजरचा मृत्यू

राहुरी :- तालुक्यातील राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात महिन्याभरापूर्वी बियरबार हॉटेलातील प्राणघातक हल्ल्यात गंभिर जखमी झालेले मॅनेजर नरेद्र सदानंद शेटे यांचे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने पोलिस ठाण्यात आरोपींवर भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा वाढीव गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गुन्हेचे गांभिर्य ओळखुन पोलिस निरिक्षक हनुमंतराव गाढे यांनी तत्काळ ३०७, ३२६ चा गुन्हा दाखल केला होता. तर … Read more

महिलेच्या अंगावरील कपडे फाडत जिवे ठार मारण्याची धमकी

संगमनेर  – संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे राहणा-या ३४ वर्ष वयाच्या महिलेने माझ्या सासूला शिवीगाळ का केली? असा जाब विचारल्याने दोघा आरोपींनी तुम्ही सामाईक रस्ता वापरायचा नाही, असे म्हणत महिलेची गचांडी धरुन धक्का बक्की करुन अंगावरील कपडे फाडून लजा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला. शिवीगाळ करत जिवे ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली. पिडीत … Read more

भररस्त्यात महिलेस शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी

अहमदनगर :- भररस्त्यात महिलेस शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात उघडकीस आली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरात सिव्हील हडको कॉलनी गणेश चौक, तपोवन रोड साईनगर भागात राहणारी एक तरुण महिला मिस्कीन मळा रोडने मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना तेथे येवून आरोपी प्रशांत प्रभाकर सराईवार, रा. सिव्हील हडको कॉलनी, … Read more

तरुणीचा खून करून मृतदेह फेकला

नेवासा – तालुक्यात तरुणीचा खून करून मृतदेह रस्त्यावर टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि महालक्ष्मी हिवरे परिसरात राहणारी तरुणी ज्योती सर्जेराव उर्फ बाळासाहेब गायके (वय २७) हिला अज्ञात आरोपीने कशानेतरी मारहाण करुन जखमी केले, तिला अज्ञात कारणावरुन मारहाण करुन कशाने तरी ज्योती गायके हिचा गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील एकाच गावातून पळून गेलेले सैराट जोडपे ताब्यात

श्रीगोंदा : तालुक्यातील एकाच गावातून पळून गेलेले सैराट ज़ोडपे श्रीगोंदा पोलिसांनी मुंबई येथे ज़ाऊन ताब्यात घेतले असून, या दोघांना श्रीगोंदा पोलिस स्टेशनला आणले आहे. एक दुसऱ्याविषयी असलेल्या आकर्षणातून अल्पवयातच अनेक मुले व मुली घरच्यांचा विचार न करता पळून जात आहेत. याबाबत पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर या सैराट जोड्या पकडण्याचा ताण पोलीस यंत्रणेवर पडत आहे. तालुक्यातून … Read more

गळफास घेत दोघांनी केली आत्महत्या

कोपरगाव :- शहरातील दोघांनी स्वतंत्र घटनांमध्ये आपल्या राहत्या घरी बुधवारी गळफास घेत आत्महत्या केली. गांधीनगर भागात इनडोअर गेम हॉलजवळ राहणाऱ्या नीलेश किसन दरंदले (वय ३७, महादेवनगर) यांनी राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेतला. शहरातील औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या किरण विजय चव्हाण (वय १३) या शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. दोन्ही घटनांबाबत संतोष … Read more

विजेचा धक्का बसल्याने मायलेकाचा दुर्दैवी अंत

अकोले :- विजेचा धक्का बसल्याने मायलेकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गर्दनी शिवारात काल सायंकाळी घडली. संगीता दिलीप झोळेकर (वय-40) व आविष्कार दिलीप झोळेकर (वय-16) दोघे मूळ रा. गर्दनी, हल्ली- अमृतनगर, नवीन नवलेवाडी, अकोले असे यातील मृत्यू झालेल्या मायलेकाची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे अकोले शहरासह गर्दनी गावावर शोककळा पसरली आहे. अकोले येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये क्रीडा … Read more

रिक्षाचालकाकडून विवाहितेचा चालत्या रिक्षात विनयभंग,त्यांनतर महिलेने केले हे धक्कादायक कृत्य….

जामखेड :- तालुक्यातील राजेवाडी परिसरात माहेरी निघालेल्या विवाहितेचा चालत्या रिक्षातच चालकाने विनयभंग केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने चालत्या रिक्षातूनच बाहेर उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.रिक्षातून उडी मारल्याने पिडीत महिला जखमी झाली आहे. दरम्यान या घटने नंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करीत आरोपीला चोवीस तासांच्या आत गजांआड केले. बाळु भारत आजबे असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे … Read more

विवाहितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

राहुरी :- तालुक्यातील कानडगाव येथील विवाहित महिलेला पती, सासू व दोन जावांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना 26 जून रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे घडली. याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेत शबाना मेहमूद शेख, राणी मुक्तार देशमुख, अमिन … Read more

शेतकर्‍यांना न्याय द्या खा.डॉ.सुजय विखे पा. यांची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली – देशातील कांदा उत्पदकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून  निर्यात अनुदानाची मुदत आणखी सहा महीन्यांकरिता वाढवून  द्यावी आशी मागणी खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केली. संसदेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात खा.डाॅ सुजय विखे पाटील यांनी शून्य प्रहरात कांदा उत्पादकांच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि  अर्थिक  संकटाला तोंड … Read more

हॉटेलमध्ये बेवारस मृतदेह आढळला

शेवगाव :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोधेगाव उपबाजार आवारातील हॉटेलमध्ये सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास बेवारस सडलेल्या स्थितीतील मृतदेह आढळला. उपबाजार समितीच्या आवारात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारच्या दिवशी जनावरांचा मोठा बाजार भरतो. तेथील मच्छिंद्र पवार यांच्या पोते, ताडपत्री असलेल्या हॉटेलमध्ये हा मृतदेह होता. मृतदेहाची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सुटली होती. याबाबतची खबर पवार यांनी बोधेगाव पोलिस … Read more

सर्वांना बरोबर घेऊन विकासाची गुढी उभी करायची आहे – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर :- बोल्हेगाव हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. या भागाला विकासकामातून शहरीकरणाचे रूप देण्याचे काम केले. निवडणूका या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. माझ्या गेल्या साडे चार वर्षांत शहरात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर आहे. ज्यांनी विकासकामे केली नाहीत, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागाच्या विकासकामासाठी पाठपुरावा केल्यामुळे प्रभागाचा विकास झाला … Read more