अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील कर्मचाऱ्यांना आता वेतनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडता येणार आहे. तसा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेने राज्यसचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी शिक्षकांचे पगार हे राष्ट्रीयीकृत बँकेतच होत होते. परंतु, मध्यंतरी हे … Read more

Ahmednagar Breaking : कोणावरही येवू नये अशी वेळ ! अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू,सहा महिन्यापू्वीच झालं होत लग्न…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : समोरून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात जामखेड येथील व्यापारी अतिष भागवत पवार यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता घडली. संथ गतीने सुरू असलेल्या व एकेरी वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याची नागरिकांत चर्चा आहे. परीणामी आतातरी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदार यांना जाग … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार ! मुलीने दिला बाळाला जन्म,पोलिसांनी केला…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यात नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी येथील पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित मुलगी ही एका आश्रम शाळेत शिक्षण घेत होती. ती इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना तिची ओळख इयत्ता ८वीच्या वर्गात शिकणाऱ्या … Read more

स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी उभी होणार अक्कलकोट स्वामींची 108 फूट उंचीची मूर्ती, 42 एकर जागेवर साकारला जाणार भव्य-दिव्य प्रकल्प

Swami Samarth

Swami Samarth : दत्त संप्रदायाचा महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसार करणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरे तर अक्कलकोट स्वामींनी अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले आहे. अक्कलकोट स्वामी श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जातात. अशी मान्यता आहे की गाणगापूरचे … Read more

मुले सांभाळा ! बालकांची सर्दी, खोकला, ताप व उलट्यांमुळे दवाखान्यात गर्दी, ‘अशी’ घ्या काळजी

Health News

Health News : जिल्ह्यातील बालरुग्णालये असो किंवा खासगी इतर ओपीडी असो येथे सर्वत्र बालरुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. लहान मुले सध्या हवामानात मोठा बदल जाणवत आहे. सर्दी, खोकला, ताप व उलट्यांमुळे आजारी पडत असून जवळपास ८० टक्के बालरुग्णांत सारखीच लक्षणे आढळून येत आहेत. सध्या वातावरण विषम आहे. कधी थंडी तर कधी आभाळ येत असल्याने, या … Read more

Ahmednagar Politics News : विखे – कर्डिले यांच्या अंतर्गत किरकोळ वादाचा फायदा घेत तनपुरे यांनी आमदारकी मिळविली

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना, मुळा सूतगिरणी कुणी बंद पाडली. राहुरी नगरपालिका हद्दीत विरोधकांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचे हे काम कोण करतो. कवडीमोल भावाने साखर कारखाने विकत घ्यायचे, असे अनेक कारनामे करण्यात कोण आघाडीवर आहे हे तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे सध्या कोण चोरीच्या भोवऱ्यात आहे हे तालुक्याला नाही तर राज्याला माहिती … Read more

Ahmednagar Politics : सुजित झावरे पाटील कोणत्या पदावर नसताना कामाच्या बढाया कशाला मारता ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : टाकळी ढोकेश्वर येथील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाठपुरावा केला, निधी आणला. असे असताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आपणच रस्त्यासाठी निधी आणल्याचा वल्गना करीत आहेत. तुम्ही कोणत्याही पदावर नाहीत, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत. मग निधी आणल्याचा बढाया कशाला मारता, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भाऊसाहेब खिलारी … Read more

Ahmednagar City News : दाखल्यासाठी २ लाख रुपये मागतात, नगरसेवकांकडे गेले तर जास्त पैसे लागतील, असा दम !

Ahmednagar City News

Ahmednagar City News : अहमदनगर महानगर पालिकेची महासभा महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २०) पार पडली. या महासभेत मनपाच्या नगररचना विभागाच्या कारभारावरुन नगरसेवकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत, नगर रचना विभागाचे पुरते वाभाडे काढले. विविध मुद्यावर महासभा चांगलीच गाजली. विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांची ही महासभा शेवटची ठरणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनपा आयुक्त पंकज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चौकातून युवकाचे अपहरण; कोयत्याने मारहाण

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : प्रोफेसर चौकात मैत्रिणीबरोबर कॅफेतून बाहेर आल्यावर अज्ञात चौघांनी युवकाचे अपहरण करून त्याला कल्याण महामार्गावर नेऊन दांडक्याने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सलमान फारुक शेख (वय २२, रा. सर्जेपुरा) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान हा तिच्या मैत्रिणीबरोबर … Read more

Ahmednagar News : मुलीला मॅसेज, गावातील पालकांनी शिक्षकाला उचलून नेत यथेच्छ चोपले ! शिक्षणक्षेत्रात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चित्र विचित्र घटना घडण्याचे प्रमाण काही कमी होईना. आता शिक्षणक्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील नामांकित माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाचा महाप्रताप उघडकीस आला आहे. या महाशयाने इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीला चित्रविचित्र मॅसेज पाठवले. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी विद्यालयातून उचलून नेत बेदम चोप … Read more

Ahmednagar News : व्हायरल व्हिडिओतील ‘त्या’ संतप्त आजीबाईंना अखेर विखे पाटलांची साखर मिळाली!आजी म्हणतात आधी खोटी माहिती दिली…

Ahmednagar News

Ahmednagar News : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सध्या दक्षिणेतील विविध मतदार संघातील गावात साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. परंतु या साखर पेरणीत अनेक ‘कडू’ विघ्न आले. सुरवातीला उत्तरेत साखर वाटप झाली. राजकीय टीकेनंतर दक्षिणेतही साखर वाटप सुरूझाली. परंतु दोन दिवसांपूर्वी शेवगाव मधील बोधेगाव येतघील एक व्हिडीओ व्हायरल होत होता. यात एक … Read more

Ahmednagar Breaking : नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात ! पोलीस ठार, दोन गंभीर

Accident

नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात झाडाला स्विफ्ट कार आदळल्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई महेश तुकाराम काठमोरे यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. स्विफ्ट कारचा चालक साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे (दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) गंभीर जखमी आहेत. पोलीस कॉन्स्टेबल महेश काठमोरे पाथर्डी तालुक्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ९ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मातंग समाजातील अजय विष्णू जोगदंड यांनी बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ९ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जोगदंड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मी रविवार, (दि.१७) डिसेंबर रोजी रात्री १० वा.च्या सुमारास बोधेगाव येथील पाकीजा पान स्टॉल येथे मावा सुपारी आणण्यासाठी … Read more

अतिक्रमणांचा प्रश्न आता माजीमंत्री शिवाजीराव कर्डिलेंच्या दरबारात

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील मिरी रोडवरील ग्रामपंचायतच्या गटनंबर २९६ मध्ये झालेल्या तीनशेहून अधिक अतिक्रमणधारकांची धाकधूक वाढली असून, न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर या प्रकरणात काहीतरी तडजोड करावी, यासाठी तिसगाव येथील सर्वच राजकीय नेते मंडळींनी माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे धाव घेत या प्रकरणात लक्ष घालून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तिसगाव येथील … Read more

Breaking : माझ्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट,मढी देवस्थानच्या विश्वतांनी सगळंच स्पष्ट सांगितलं !

Breaking

Breaking : माझ्यावरील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. भाजपाच्या लोकप्रतिनिधी यांच्या घरी मढी देवस्थानच्या विश्वतांची मिटींग झालेली आहे. माझ्यावर जिवघेणा हल्ला झाला, पोलिसही दबावाखाली काम करीत आहेत. वाढीव कलम लागण्यासाठी मी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मढीदेवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मरकड बोलत होते. या वेळी भाजपाचे ओबीसी … Read more

केटीएमचा स्पीड ठरला जीवघेणा ! दुचाकी घरावर जाऊन आदळली तरुणाचा जागीच मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : भरधाव वेगाने दुचाकीवर जाणाऱ्या पवन रोहिदास पवार (वय १९, आंबी खालसा, ता. संगमनेर) याने एका घराला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. बुधवारी सकाळी ८ वाजता तालुक्यातील घारगाव येथे ही घटना घडली. पवन पवार केटीएम दुचाकी (एम.एच. १७, ओ. झेड ८३४२) वरून भरधाव वेगाने चालला होता. त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो थेट … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महामार्ग बनलेत अपघाताचे केंद्र, वर्षभरात ७७९ मृत्यू, नेमकं काय घडतंय? पहा स्पेशल रिपोर्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध महामार्गांचे जाळे पसरले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असले तरी हे महामार्ग विविध कारणांमुळे मृत्यूचे केंद्र बनले आहेत. या एकाच वर्षात अहमदनगर जिल्ह्यात विविध भागांत झालेल्या अपघातात ७७९ मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक पुणे, मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रीय महामार्गावर यातील सर्वाधिक अपघात झाले आहेत. ऊसतोड हंगाम सुरु असल्याने … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? महसूल मंत्र्यांच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी तहसीलदारांची अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी आली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी व याच्या आयोजनासाठी तहसीलदार सौंदाणे यांनी तालुक्यातील प्रत्येक विभागाच्या प्रमुखाकडून पैसे जमा केल्याचे वृत्त आले आहे. तशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय विभागात खळबळ उडाली … Read more