अहमदनगर ब्रेकिंग ! अखेर नगर शहरातील ‘त्या’ ३७ ठिकाणांच्या नावात बदल, आता माळीवाडा, ख्रीस्त गल्ली नाही म्हणायचं..पहा ३७ ठिकाणांची नवीन नावे

Ahmednagar News

अहमदनगर शहरात अनेक गल्ली, रस्ते आहेत. शहराची अत्यंत प्राचीन ओळख आहे. परंतु शहरात अनेक गल्ल्या, अनेक ठिकाणे अशी आहेत की त्यांची नावे जातीच्या आधारावर दिलेली होती. उदा. माळीवाडा, भिल्ल वस्ती,ब्राह्मण कारंजा आदी. या ठिकाणांची नावे बदलाचा विचार मागील अनेक दिवसांपासून सुरु होता. परंतु आता अखेर जातीच्या आधारावर वसाहतींना दिलेली नावे बदलण्याचा निर्णय महापालिकेने शासनाच्या निर्देशानुसार … Read more

Ahmednagar News : राज्यात आदर्श ठरली होती शाळा, आज पालक म्हणतायेत या शाळेत एकही विद्यार्थी पाठवायचा नाही..नेमकं काय घडतंय ?

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दुर्गम भागात असणारी हनुमाननगर शाळा राज्यभर गाजली. लोकसहभागातून केलेला कायापालट व इतर कारणाने ही शाळा राज्यात आदर्श ठरली. परंतु आता या शाळेच्याच नशिबी शासन प्रशासनाची उदासीनता आली आहे. या हनुमाननगर आदर्श शाळेत सध्या ६० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवायला आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे पालकांनीही या शाळेतील विद्यार्थाचे … Read more

Ahmednagar News : रस्ता बांधणीसाठी खर्च केलेले पाच कोटी ‘खड्ड्यात’ ! अवघ्या सहा महिन्यात ‘या’ रस्त्याला तडे

Ahmednagar News

अहमदनगर शहर व खराब रस्ते यांचे समीकरण अजून तरी काही सुटलेले नाही. रस्त्यांची दुर्दशा ही शहराच्या पाचवीलाच जणू पुजलेली. आता शहरातील आनंदधाम ते एलआयसी ऑफिस ते स्वस्तिक चौक हा रस्ता सहा महिन्यांपूर्वी पाच कोटी रुपये खर्चुन कॉक्रिटीकरण करून तयार झाला. पण सहाच महिन्यात या रस्त्याला तडे गेलेत. ठेकेदाराने याठिकाणी डांबर टाकून हे तडे झाकण्याचा प्रयत्न … Read more

Ahmednagar Politics : आ. रोहित पवार देशद्रोही निरव मोदीच्या जागेसाठी लढतायेत !

Ahmednagar Politics

कर्जत-जामखेड येथील पाटेगाव व खंडाळा परिसरातील नियोजित एमआयडीसीवरून चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. अगदी प्रस्तावित झालेली व अवघ्या काही पावलांवर असणारी एमआयडीसी पुन्हा जागेच्या वादात अडकली. आ. रोहित पवार यांनी ज्या जागेवर एमआयडीसीसाठी प्रयत्न केले आ. राम शिंदे यांनी ती एमआयडीसी आता दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी फेरप्रस्ताव पाठवला आहे. यावरून आ. राम शिंदे व आ. रोहित … Read more

Ahmednagar Crime News : चोरी करताना पकडल्याचा राग; १० जणांकडून एकास मारहाण

Ahmednagar Crime News

कापूस चोरून नेत असताना दोघा जणांना रंगेहाथ पकडले, याचा राग मनात धरून सुमारे १० आरोपींनी मिळून अक्षय तनपुरे या तरुणाला शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडा, लोखंडी गज व लाथा बुकक्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी घडली. याबाबत सूत्रांनी सांगितले, की अक्षय अशोक तनपुरे (वय २८ वर्षे, रा. … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांच्या मतदारसंघात शिवसेना नेत्याचा एल्गार ! दूध भाव, कांदा निर्यात बंदीवरून घेरले

Ahmednagarlive

शासनाने कांदा निर्यातबंदी व इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्यानंतर राज्यातील शेतकरी आक्रमक झाला. तसेच दुधाचे भाव देखील कोसळले. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. हाच धागा पकडत अहमदनगर जिल्ह्यातील महसूलमंत्री विखे पाटील यांच्या मतदार संघात कोल्हार येथे ठाकरे गट आक्रमक झाला. महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी ठाकरे गटाचे … Read more

Ahmednagar News : खळबळ उडवून देणारे सीए विजय मर्दा कर्ज फसवूणक प्रकरण नेमके आहे तरी काय? काय झाल्या आहेत घडामोडी? पहा..

Ahmednagar News

अहमदनगर मध्ये बँकेसंदर्भात विविध प्रकरणे समोर येत आहेत. काल (दि.१४) नगर शहरात आणखी एक खळबळजनक घटना घडली. शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात प्रतिष्ठित चार्टर्ड अकाऊंटंट विजय विष्णुप्रसाद मर्दा (वय ५७, रा. रिद्धीसिद्धी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर रस्ता, नगर) याला आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. फॉरेन्सिक ऑडिटमुळे जे काही धागेदोरे मिळाले त्या आधारे कारवाई झाली.डॉ. निलेश … Read more

आ. राम शिंदे यांनी पंधरा दिवसांत कर्जतमध्ये एमआयडीसी केल्यास त्यांच्या घरी जाऊन…

MLA ram shinde

कर्जत तालुक्‍यात मंजूर होण्याच्या टप्प्यावर असलेली एमआयडीसी राजकीय आकसातून रद्द करून कर्जत -जामखेड तालुक्‍यातील जनतेचे अतोनात नुकसान करून येथील जनतेच्या जीवन मरणाशी खेळ करणाऱ्या सरकारचा, उद्योगमंत्री उदय सावंत यांचा व हे सर्व करायला लावणारे आ. राम शिंदे यांचा तीव्र शब्दांत निषेध करत कर्जत येथे रास्ता रोको करत प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. आ. रोहित पवार … Read more

निळवंडे धरणातून बंधारे भरण्यासाठी उपोषण ! शेतकरी म्हणाले…

Nilwande Dam

नेवासा येथील मध्यमेश्‍वर व पुनतगाव बंधाऱ्यामध्ये निळवंडे धरणातुन पाणी भरून देण्याच्या मागणीसाठी नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, पुनतगाव, खुपटी, चिंचबन, साईनाथनगर ग्रामस्थांनी काल गुरूवारी (दि.१४) उपोषण केले. नेवासा तालुक्‍यातील नदी काठावरील शेतकऱ्यांवर बंधारे भरुन देता, अन्याय होत असल्याने बंधारा बचाव कृती समीतीने काल गुरूवारी उपोषण सुरु केले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय कल्हापुरे यांनी कार्यकारी अभियंता … Read more

केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मुळा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात आले; मात्र ज्यांना घाई होती त्यांनी आधीच जलपूजन केले. मागील विधानसभा निवडणुकीत भावनिक होऊन पदरात मतं टाकले गेले; पण जनतेच्या पदरात काहीच पडले नाही, अशी टीका जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे. राहुरी तालुक्‍यातील मानोरी येथे मुळा … Read more

Shirdi News : साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या व्हीव्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रोटोकॉल…

Shirdi News

जागतिक कीर्तीच्या शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या व्हीव्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रोटोकॉल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी शिर्डीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रमेश गोंदकर यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. नागपूर येथे हिञाळी अधिवेशनादरम्यान रमेश गोंदकर यांच्यासह शिर्डी ग्रामस्थांनी शहरातील विविध प्रश्‍नांसंदर्भात मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी विशेष अतिथींच्या दर्शनासाठी शिर्डीत स्वतंत्र प्रोटेकॉल … Read more

शेतकरी कोलमडलाय, त्याचे पीककर्ज शासनाने भरावे ! आ. लंके यांची लक्षवेधीद्वारे मोठी मागणी

Ahmednagar News

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अधिवेशनात विविध मुद्द्यांना हात घातला. विविध गोष्टी, समस्या त्यांनी याठिकाणी मांडल्या. याचाच एक भाग म्हणजे, पारनेर व नगर तालुक्यातील ४९ गावातील शेतकऱ्यांना १५ दिवस उलटूनही एक रुपयाची मदत सरकारने दिली नसल्याची लक्षवेधी त्यांनी अधिवेशनात मांडली. पारनेर व नगर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, राज्यातील अनेक भागात गारपिटीने, अवकाळीने … Read more

ब्रिटिशकालीन अहमदनगरचा रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट ! दौंड-मनमाड दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे, पहा एक स्पेशल रिपोर्ट

Ahmednagar News

अहमदनगरमध्ये अगदी ब्रिटिश काळापासून रेल्वेची सुविधा आहे. आता दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दरम्यान येणाऱ्या अहमदनगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट ठरणार आहे. याचे कारण असे दौंड-मनमाड दुहेरीकरणाचे काम आता पुर्णत्वाकडे आले आहे. याचे जवळपास ५६ टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के काम पूर्णत्वाच्या जवळ आलाय. अहमदनगरच्या रेल्वे प्रवासात दौंड-मनमाड रेल्वे मार्ग हा अत्यंतर महत्वपूर्ण भूमिका बजावतो. दौंड-मनमाड … Read more

Ahmedanagr Breaking : किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून, आई वडिलांसमोरच घडले कृत्य

Ahmedanagr Breaking

किरकोळ वादातून एका व्यक्तीचा मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी जामखेडमध्ये बोलें ते जवळा रस्त्यावरील पठाडे वस्तीजवळ हे प्रकरण घडले. सुरेश पठाडे व आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी व्यक्ती असे आरोपीचे नावे आहेत. शिवाजी रामदास चव्हाण (रा. बोलें) असे मृताचे नाव आहे. मोबाईलवर इतर व्यक्तीला मोठ्याने … Read more

Ahmednagar Breaking : ‘या’ प्रसिद्ध देवीच्या मंदिरात चोरी, एक लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास

Ahmednagar Breaking : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तुकाई देवीच्या मंदीरात चोरट्यांनी चोरी केली. देवीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम असा एक लाख रुपयांपेक्षा जास्त ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली. एकनाथ देवराम शेळके यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार दि.१३ डिसेंबरच्या रात्री ६ नंतर व गुरुवार … Read more

आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत सगळंच सांगितलं ! मर्जीतील ठेकेदारास काम देण्यासाठी…

आमदार नीलेश लंके

जलजीवन मिशन अभियानांतर्गत नगर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत व कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत बोलताना केला. पुरवणी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेताना, हा गैरव्यवहार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी संगनमताने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आमदार लंके यांनी … Read more

आज लॉन्च होतायेत Yamaha च्या MT-03 व R3 या शानदार बाईक, जाणून घ्या सर्व माहिती

Yamaha MT-03 and R3

यामाहा ही एक दुचाकी क्षेत्रातील अत्यंत नावाजलेली कंपनी आहे. या कंपनीच्या दुचाकी त्यांच्या युनिक असण्याने नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत. या बाईकची स्टाईल, लूक, फायरिंग आदी गोष्टींचं एक वेगळीच क्रेझ आहे. आता यामाहा प्रेमींसाठी एक मोठी खुशखबर आहे. कंपनी आज 15 डिसेंबर रोजी आपल्या दोन नवीन बाइक लॉन्च करत आहे. Yamaha MT-03 आणि R3 या दोन … Read more

कोपरगावकरांची दुर्दशा ! लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांच्या संगनमताने पालिकेचा कारभार

Former MLA Snehalata Kolhe

कोपरगाव येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांच्या संगनमताने पालिकेचा कारभार करीत असून त्यांचा मनस्ताप मात्र कोपरगावकरांना भोगावा लागत असल्याचा आरोप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काल बुधवारी (दि. १३) जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याशी बोलताना केला. यावेळी बोलताना कोल्हे म्हणाल्या की, शहराचे आरोग्याचे रक्षक म्हणून नगरपालिकेकडे पाहिले जाते. परंतु गेल्या दिड-दोन वर्षांपासून मुख्याधिकारी शांताराम गोसावी … Read more