अहमदनगर ब्रेकिंग : युवकाचा खून ! संशयाची सुई मित्रांवर…

कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील नितीन अंकुश पोटरे (वय ३५) या युवकाचा खून झाला असून त्याच्या मित्रांनीच घात केल्याचा संशय आहे. आनंद बबन परहर व जावेद अरबाज शेख (रा. पिंपळवाडी) यांनी कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये बुडवून निर्घृणपणे खून केल्याचा संशय बळावत आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये महेश अंकुश पोटरे यांच्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात कलम ३०२, ३४ प्रमाणे … Read more

सत्ताधाऱ्यांची भूमिका: कामे कोणीही मंजूर करा सरकार आमचे आहे ना मग उद्घाटन आम्हीच करणार ..? आमदार राजळे यांची टीका..!

Role of the ruling party:

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- भाजपचे सरकार असताना मागील काळात शेतीच्या पाण्यासंदर्भात मोठी जलसंधारणचे कामे करण्यावर भर दिला. मोठ्या प्रमाणात बंधा-यांची कामे झाल्याने काही गावे सोडल्यास दोन्ही तालुके स्वयंपुर्ण झाले आहे. ऊसाचे क्षेत्र वाढले असुन दोन वर्षात वीजेसाठी आंदोलन करावे लागले, अतिवृष्टीचे नुकसान भरपाई अनुदान, पीक विमा या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! रुग्णसंख्येने ओलांडला धक्कादायक आकडा….

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1134 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

आतापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्या सहा हजार ६४९ जणांच्या वारसांना मिळाले ३३ कोटी..!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात एकूण ७ हजार १७० कोरोना संसर्ग बाधित रुग्ण मयत पावले असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. सानुग्रह अनुदान प्राप्तीसाठी ७ हजार ६५० प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी सहा हजार ६४९ प्रकरणांना मान्यता देण्यात आली असून वारसांच्या खात्यावर तेहतीस कोटी ३९ रुपये … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या शिरपेचात रोवला आणखी एक मानाचा तुरा ..! डॉ.भोसले उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी…!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- निवडणूक विषयक कामात जिल्हा निवडणूक शाखेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व कामाचे नेतृत्व सांभाळणारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ‘उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी’ म्हणून डॉ. भोसले … Read more

‘तुमचा खासदार’ कोणाकडून ही टक्केवारी घेत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- तुम्ही विश्वासाने जो खासदार निवडून दिला तो कोणाकडून ही टक्केवारी घेत नाही. त्यामुळेच नगर जिल्ह्यातील रस्त्याच्या कामाला यापूर्वी कधीही नव्हती एवढी गती सध्या आहे. अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. तसेच हा रस्ता कर्जत तालुक्यातील पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे त्या कामात कुणीही अडथळा आणण्याचे … Read more

‘त्या’ योजनेतुन पाणी घायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी ‘त्या’ गावकऱ्यांचा आहे..!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील १७ गावाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र सदर संयुक्त योजनेतून या गावाना पाणी हवे आहे की नाही, याबाबत त्या त्या गावांना अधिकार असून. या गावांनी ग्रामसभेत निर्णय घेऊन ठराव द्यावा असे आवाहन खा. डॉ सुजय विखे यांनी केले. पूर्वी जीवन … Read more

भरदिवसा घरफोडी: सोळा तोळे सोने आणि तीन लाखांची रोख रक्कम चोरली!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- लेकीच्या लग्नासाठी जमा केलेले तिन लाख रुपये रोख व सोळा तोळे सोन्याचे दागीने असा सात लाख ८० हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलुप तोडुन चोरुन नेल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील भालगाव येथील आंबादास रघुनाथ वारे यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यासाठी … Read more

बाजार समितीत कांदा, सोयाबिनला मिळाले ‘असे’ भाव !

soybean

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- हाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6276 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 2700 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबिनला 6135 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 6 हजार 276 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2300 ते 2700 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 … Read more

‘ती’दानपेटी पाच वर्षांनंतर उघडणार होते परंतु …..!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दररोज चोर्‍या,घरफोडी अशा घटना घडत आहेत पोलिस प्रशासन या चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरत आहेत. मात्र आता या चोरट्यांनी मंदिरे लक्ष्य केल्यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. नुकतेच अज्ञात चोरट्यांनी पाईपलाईन रोड वरील एका वस्तीवर असलेल्या पुरातन संकट मोचन … Read more

राज्यात प्रसिद्ध असलेली ‘मायंबा’ची यात्रा रद्द!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  राज्यातील अनेक भागात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने विविध निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावरगाव येथील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानची पौष अमावस्यानिमित्त दि.३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या झालेल्या … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  अल्पवयीन मुलीची छेड काढुन विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. संतोष दिगंबर भालेकर (वय 44 रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 22 जून 2021 रोजी सकाळी फिर्यादी तिच्या … Read more

जिल्हा पोलीस दलातील ‘या’ तिघांना ‘पोलीस पदक’ जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रायलय दरवर्षी पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यामध्ये यंदा जिल्ह्यातील तिघांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक भरत चितांमण नागरे यांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर नागरी हक्क संरक्षण विभाग (पीसीआर), अहमदनगर येथे कार्यरत असलेले … Read more

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  अहमदनगर- पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) शिवारात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रविण लक्ष्मण गुंजाळ (वय 38, रा.कामरगाव, ता.नगर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप रामचंद्र गुंजाळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुंजाळ … Read more

बापरे! कामगारांनी कंपनीतून चोरले एक कोटी १८ लाखांच्या प्लास्टिक वस्तू; दोघे जेरबंद, तिघे पसार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  नागापूर एमआयडीसी येथील कंपनीतील एक कोटी १८ लाख ८१ हजार १८ रूपयांच्या प्लास्टिक वस्तूंचा अपहार करणार्या दोन नोकरदारांना एमआयडीसी पोलिसांनी सांगली जिल्ह्यातून अटक केली. अनिकेत अशोक माळी (वय २३), आतिष विष्णू माळी (वय २७ दोघे रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. नागापूर … Read more

उसने घेतलेले पैसे देण्यास नकार; डॉक्‍टरांना नऊ लाखास गंडा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- शहरातील बालरोग तज्ञ डॉ. अनिलकुमार मुरलीधर कुऱ्हाडे (वय 67 रा. सावेडी) यांनी एका व्यक्तीला 14 लाख 50 हजार रूपये उसने दिले होते. त्यापैकी त्या व्यक्तीने नऊ लाख रूपये परत न देऊन त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी डॉ. कुऱ्हाडे यांनी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सागर अप्पासाहेब दिवटे … Read more

‘मध्यान्ह भोजन’ योजनेसंबंधी तक्रारी, मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा समर्पण फाउंडेशनचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  राज्यातल्या बांधकाम मुजरांना मोफत ‘मध्यान्ह भोजन’ मागील दोन महिन्यांपासून ही योजना सुरू आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असून ती बंद करण्यात यावी, अशी मागणी समर्पण फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी कामगार मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही समर्पण फाउंडेशनतर्फे देण्यात आला … Read more

Ahmednagar Breaking : जिल्ह्यातील शाळांबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला ‘हा’ निर्णय ! वाचा सविस्तर…

Ahmednagar Breaking :- राज्य सरकारने सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सध्या तरी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. … Read more