आतापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्या सहा हजार ६४९ जणांच्या वारसांना मिळाले ३३ कोटी..!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात एकूण ७ हजार १७० कोरोना संसर्ग बाधित रुग्ण मयत पावले असल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

सानुग्रह अनुदान प्राप्तीसाठी ७ हजार ६५० प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी सहा हजार ६४९ प्रकरणांना मान्यता देण्यात आली असून वारसांच्या खात्यावर तेहतीस कोटी ३९ रुपये अनुदान स्वरूपात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री म्हणाले, मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये कोरोना बाधितांची सर्वात कमी रुग्ण संख्या होती. मात्र, गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात प्रति दिवस कोरोनाचे बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

राज्यातील कोरोना बळींच्या निकटतम नातेवाईकांना रिलिफ फंडाच्या माध्यमातून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जात आहे.

याविषयी माहिती देताना मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात एकूण ७ हजार १७० कोरोना संसर्ग बाधित रुग्ण मयत पावले असल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

सानुग्रह अनुदान प्राप्तीसाठी ७ हजार ६५० प्रकरणे प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा पिक अर्थात संसर्गाचा वेग ओसरल्यानंतर परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.

असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात जर बाधित रुग्ण संख्येतील बदल शाळा बंद की सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल.