Profitable Business Idea: 50 हजाराची गुंतवणूक महिन्याला देईल 30 ते 40 हजार रुपयांची कमाई! वाचा या अनोख्या व्यवसायाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Profitable Business Idea:- व्यवसाय म्हटले म्हणजे सगळ्यात आधी त्यासाठी लागणारा पैसा व त्यातून मिळणारा नफा या दृष्टिकोनातून व्यवसायाची निवड प्रामुख्याने केली जाते. व्यवसाय म्हटले म्हणजे त्यामध्ये काही लाख रुपये गुंतवावे लागतात असे नाही.

तुम्ही बाजारपेठेतील मागणीचा विचार करून जर व्यवसायाला सुरुवात केली तर अगदी काही हजाराची गुंतवणूक करून देखील तुम्ही लाखात नफा मिळवू शकतात असे व्यवसाय देखील आहेत. फक्त यामध्ये तुम्हाला बाजारपेठेची मागणी आणि व्यवसायाची निवड करण्या संदर्भातले कौशल्य असणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये दागिन्यांचा विचार केला तर दागिने हा महिलांचा अगदी जवळचा विषय असून प्रत्येक महिलेला अंगावर दागिने घालायला खूप आवडते. परंतु सोन्याचे दर जर पाहिले तर ते खूपच जास्त असल्यामुळे प्रत्येकाला सोन्याची दागिने खरेदी करणे शक्य होत नाही.

तसेच दुसरे म्हणजे गेल्या काही वर्षांपासून जर आपण बघितले तर सोन्याच्या दागिन्यांपेक्षा महिला आर्टिफिशियल ज्वेलरीच्या वापराकडे खूप मोठ्या प्रमाणावर वळल्याचे आपल्याला दिसून येते.

या अनुषंगाने जर आर्टिफिशीयल ज्वेलरी शॉप उभारले तर या माध्यमातून तुम्ही कमी खर्चामध्ये खूप चांगला नफा मिळवू शकतात. महत्त्वाचे म्हणजे ऑफलाइन पद्धतीने हा व्यवसाय करता येतोच परंतु तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील आर्टिफिशल ज्वेलरी विक्री करून खूप पैसा मिळवू शकतात.

 ऑफलाइन पद्धतीने करायचा असेल हा व्यवसाय तर काय करावे?

आर्टिफिशियल ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुरू करू शकतात. परंतु याकरिता मात्र तुम्हाला जागेची निवड करणे खूप गरजेचे राहिल. यासाठी तुम्हाला बाजारपेठ ज्या ठिकाणी असेल किंवा ज्या ठिकाणी जास्त गर्दी किंवा लोकांची ये जा असते अशा ठिकाणी जागा शोधून दुकान उघडावे लागेल.

तसेच दुकानाची निवड करताना त्या दुकानांमध्ये चांगला प्रकाश येईल अशा ठिकाणी दुकान तुम्हाला शोधावे लागेल. कारण प्रकाशामुळे दागिन्यांची चमक अधिक खुलून दिसल्याने ग्राहकांना देखील दागिने निवडण्यासाठी मदत होते. तसेच तुम्ही यामध्ये दागिन्यांच्या विविध पर्याय उपलब्ध करून दिले तर ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध पर्याय मिळाल्यामुळे ग्राहक संख्या वाढण्यास मदत होते.

 ऑनलाइन पद्धतीने कसा कराल हा व्यवसाय?

तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी ऑनलाइन पद्धतीने देखील विकू शकतात. त्यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची मदत घेऊन या प्लॅटफॉर्मच्या मदतीने व्यवसायाला सुरुवात करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःच्या एप्लीकेशन किंवा वेबसाईट तयार करून देखील हा व्यवसाय करू शकता. सोशल मीडियाचा वापर करून देखील तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी विकू शकतात.

 आर्टिफिशियल दागिने कुठून खरेदी कराल?

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला दुकानांमध्ये आर्टिफिशल ज्वेलरी विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरिता  तुम्हाला दिल्ली तसेच मुंबई, कोलकाता मधील न्यू मार्केट आणि हैदराबाद सारख्या शहरातील चार मिनार मार्केटमधून खरेदी करू शकतात. याकरिता संपूर्ण बाजारपेठेत फिरणे गरजेचे आहे व दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला स्वस्तातल्या स्वस्तात चांगले दागिने मिळतील अशा ठिकाणी खरेदी करा व व्यवसायाला सुरुवात करा.

 आर्टिफिशियल ज्वेलरी व्यवसायातून किती नफा मिळू शकतो?

या व्यवसायाचे सगळ्यात महत्त्वाचे गमक म्हणजे तुम्ही या दागिन्यांच्या किरकोळ किमतीच्या 10 पट जास्त किमतीने त्यांची विक्री करू शकतात. म्हणजे साधारणपणे अशा प्रकारच्या आर्टिफिशियल ज्वेलरीची किमतीपेक्षा हे दागिने अधिकच्या दरात विकले जातात. समजा तुम्ही दररोज पाच हजार रुपयांची विक्री केली तरी तुम्हाला यामध्ये दोन ते तीन हजार रुपयांचा सहजपणे नफा मिळू शकतो व अशाप्रकारे तुम्ही महिन्यात 50000 पर्यंत नफा मिळवू शकतात.