Ahmednagar Breaking : झाडाला धडकून कार उलटली, त्यानंतर घेतला पेट ! मुले मुली काचा फोडून बाहेर येत पसार..’नाजूक’ संबंधाची किनार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात ‘द बर्निंग कार’चा थरार नागरिकांनी पाहिला. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झालेली आहे.

घटनेचे गांभीर्य पाहून कारमधील तरुणांनी काच फोडून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र यानंतर त्या हे तरुण पसार झाले. यामुळे त्यांची नावे समजू शकली नाही.

अधिक माहिती अशी : भाळवणी जामगाव रस्त्यावर गावापासून एक किलो मीटर अंतरावर असलेल्या वीज उपकेंद्रानजीक विना नंबरची मारुती कार भाळवणी वरून जामगावच्या दिशेने जात होती.

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून पलटी झाली. यानंतर काही वेळातच कारने पेट घेतला. कार विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध झाली नाही व त्यांच्याजवळही यंत्रणा नसल्यामुळे कार पूर्णतः जळाली.

या कारमध्ये एकूण चारजण प्रवास करीत होते. त्यात तीन मुले व एक मुलीचा समावेश होता. आग लागल्यानंतर या चारही जणांनी काच फोडून बाहेर पडले. या सर्वांनी घटनास्थळी थांबण्याऐवजी तेथून पळून गेले.

ही कार नेमकी कोणाची होती, हे समजू शकले नाही. दरम्यान, या घटनेच्या आवाजाने नजिकच्या घरातील नागरिक भयभीत झाले तसेच घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती.

‘नाजूक’ संबंधाची किनार?
या घटनेतील मुले व मुलगी पसार झाल्यामुळे ही घटना ‘नाजूक’ संबंधातून घडली असल्याचे नागरिकांमधून बोलले जातात होते. या घटनेतील कारवर नंबर प्लेट नसल्यामुळे ती चोरीची असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. विनाक्रमांकाच्या कारने या घटनेभोवती संशयाचे वलय निर्माण झाले असल्याचे बोलले जात होते.