अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्‍हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेतांना आश्वस्त केले. राज्यस्तरीय बैठकीत मुंबई येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्ह्याच्या सन 2022-23 … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होईना ! चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण..

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1305 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

महावितरणच्या विजेने पेटवला शेतकऱ्याचा चार एकर ऊस…या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- शेतात विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन उसाला आग लागली. या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथे घडली आहे. उषाबाई करडे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, करडे यांच्या शेतात विजेच्या तारेच्या … Read more

सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांच्या सभापतीपदावर कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत राहिले आहे. तसेच या सभापतीपदासाठी अनेकदा कोर्ट कचेर्या तसेच सुनावण्या देखील झाल्या आहे. अखेर या पदावर डॉ. वंदना मुरकुटे यांची वर्णी लागली. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन सभापती पद रद्द करण्याच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली … Read more

वाहतूक कारवाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी साई भक्तांची केली जातेय हेळसांड

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- शिर्डीत वाहतूक पोलीस कारवाईचे असलेले दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साईभक्तांची वाहने अडवून बरोबर असणार्‍यांंवर सुद्धा चुकीच्या कारवाईचा बडगा उगारून पावत्या फाडत आहेत. शिर्डी वाहतूक शाखेकडून साईभक्तांना वेठीस धरून त्रास देण्याचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागला आहे. एक वाहन थांबविण्यात आल्यानंतर त्याचे विरोधात कारवाई करतेवेळी चारपाच पोलीस गोळा होतात. … Read more

नगरकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! पाणी पुरवठा होणार विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- नगरकरांनो पाण्याचा वापर जपून करा कारण कि पाणीपुरवठा होणार आहे विस्कळीत….ऐन वेळेला अडचण नको म्हणून शहरात कसे असणार आहे पाणी पुरवठ्याचे नियोजन ते आधी जाणून घ्या… गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ५.४५ ते ६.०० या वेळेत विज वितरण कंपनी कडुन नगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी … Read more

श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी त्यांनी गुरुवारी डॉक्टर दिपाली काळे यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान दीपाली काळे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे स्वाती भोर यांनी यापूर्वी जिल्ह्यातील संगमनेर येथे … Read more

‘त्यांनी’ दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले मात्र जनतेने त्यांना आस्मानच दाखवले!

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- भाजपाला सुरुवाती पासून आपल्या पराभवाचा अंदाज आला होता, त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले होते, मात्र जनतेने त्याच्या खोट्या प्रचाराला थारा दिला नाही व आम्ही जे विकासाचे स्वप्न पाहिले आहे त्यावर कर्जतकरांनी विश्वास दाखवला असे प्रतिपादन आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत … Read more

तालुक्यातील ‘या’ गावाच्या कारभारी आहेत महिला!

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील निंबळक गावात सर्वच प्रमुख प्रशासकीय पदांचा कारभार महिला अधिकारी पाहत असून गावचे सरपंच पदही एक महिलाच सांभाळत आहे. एकंदरीत निंबळक गावात महिलाराज सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नगर तालुक्यातील निंबळक गावची लोकसंख्या २० ते २२ हजार आहे. एवढी मोठी लोकसंख्या असून येथील सर्व कारभार महिला … Read more

सर्व सुरू मग फक्त शाळाच बंद का? शिक्षकांनी उपस्थित केला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  कोरोनामुळे शाळा पुर्णत: बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पन्नास टक्के विद्यार्थी क्षमतेने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी शिंदे यांना देण्यात आले. तर सर्व सुरु असताना शाळा बंद का? हा प्रश्‍न शिक्षकांनी उपस्थित केला. गेल्या … Read more

देवीची विटंबना केल्याने ग्रामस्थांनी केला रास्ता रोको !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिर येथे एका युवकाने देवीची विटंबना केल्याने राशीन मध्ये एकच खळबळ माजली सदर आरोपीवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी करत रात्री राशीन येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली आहे. काल सायंकाळी ६:५० वाचे सुमारास श्री … Read more

शिर्डी येथील ‘त्या’११ जणांना पोलिसांनी दिले त्यांच्या मातापित्यांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- पोलिसांच्या मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने गुरुवारी शिर्डी येथे बेवारस बालकांचा शोध घेण्यात आला. या शोध मोहिमेत शिर्डी परिसरात अकरा बालके बेवारस आढळून आली होती. या बालकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन ही बालके पुन्हा त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. तसेच पालकांनी यापुढे या बालकाची काळजी घेणे चुकीची कामे … Read more

सलग दुसऱ्या वर्षी अवतार मेहेरबाबांचाअमरतिथी उत्सव रद्द

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  येथील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी दरवर्षी होणारा अमरतिथी (पुण्यतिथी) सोहळा कोविडच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. तरी दि.३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात भाविकांनी समाधी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्यावतीने केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना … Read more

पारनेर नगरपंचायत निवडणूक,’ ती’ ठरली जायंट किलर

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पारनेर नगरपंचायतीच्या १७ जागांचा निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७, शिवसेनेला ६, पारनेर शहर विकास आ घाडीला २ तर भाजप व अपक्ष प्रत्येक १ नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक ९ मधून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या पत्नी, महाराष्ट्रातील पहिल्या महिला पंचायत समिती सभापती सौ.जयश्री औटी … Read more

रोकड न मिळाल्याने मेडिकल स्टोअर्स फोडून चोरट्यांनी केली ‘ही’ चोरी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  चोरीच्या घटना दररोज होतात मोठा मुद्देमाल चोरीस गेल्याचे ऐकवयास मिळते. परंतू देवळाली प्रवरात गुरवारी मध्यराञी 2 वाजता अज्ञात चोरट्यांनी जालिंदर सुदाम भांड यांचे अवधुत मेडीकल दुकानाचे शटर तोडून चोरी केली. या चोरीत चोरट्यांनी मेडीकल मधील दोन हजार रुपयांची चिल्लर व 50 ते 60 निरोध पाकीटे चोरुन नेल्याने चोरट्यांनी … Read more

पारनेर नगरपंचायतमध्ये नवीन राजकीय समीकरणांची नांदी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पारनेर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशूकं अवस्था निर्माण झाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने व्युव्हरचना आखण्यास सुरुवात केली असून शहर विकास आघाडीकडून विजयी झालेल्या उमेदवार सुरेखा भालेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादीचे नगरपंचायतमध्ये ८ सदस्य झाले आहेत. पारनेर नगरपंचायतीचे निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेने बरोबर शहर विकास आघाडीने अनेक प्रभागात आपले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग– शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून संपविली जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील ससेवाडी येथील शेतकरी कर्जाला कंटाळून दिलीप अण्णा मगर (वय 53) यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ससेवाडी येथील शेतकरी दिलीप मगर यांना ७ एकर जमीन असून त्यांच्याकडे सोसायटी व विविध बँकांचे कर्ज होते. नैसर्गिक आपत्ती व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा … Read more

चार दिवस बंदची अफवा ! अफवा पसरवणाऱ्यांवर…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे चार दिवस श्रीरामपूर शहरातील दुकाने बंद राहतील अशी अफवा कोणीतरी पसरलव्याने शहरातील व्यापारी हवालदील झाले होते मात्र मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल फोपळे यांनी याबाबत खुलासा केल्यावर व्यापाऱ्यांचा जीव भांडयात पडला. श्रीरामपूर शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता श्रीरामपूर शहरातील सर्व प्रकारच्या व्यापारी व्यावसायिकांनी आपापली दुकाने सलग … Read more