सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांच्या सभापतीपदावर कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत राहिले आहे. तसेच या सभापतीपदासाठी अनेकदा कोर्ट कचेर्या तसेच सुनावण्या देखील झाल्या आहे.

अखेर या पदावर डॉ. वंदना मुरकुटे यांची वर्णी लागली. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन सभापती पद रद्द करण्याच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली असता सर्वोच्च न्यायालयाने पंचायत समिती श्रीरामपूरची मुदत संपेपर्यंत सभापती पद कायम राहील, असा निर्णय दिला आहे.

या निर्णयामुळे सभापती वंदना मुरकुटे यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान श्रीरामपूर पंचायत समिती सदस्या संगीता नाना शिंदे यांनी पक्षांतर केल्यामुळे न्यायालयीन लढ्यात अपात्र ठरल्याने सभापतिपदी डॉ.वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांना निवड प्रक्रियेतून संधी मिळालेली असताना

माजी सभापती दीपक पटारे यांनी सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा आधार घेऊन सभापती पद रद्द होण्याच्या हेतूने याचिका दाखल केली होती,

यात सर्वोच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी अहमदनगर यांना नोटीस काढून सविस्तर म्हणणे मांडण्यास सांगण्यात आलेले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुनावणी होऊन पंचायत समिती श्रीरामपूरची मुदत संपेपर्यंत सभापती पद कायम राहील, असा निकाल जाहीर करण्यात आला,.