थकबाकीदारांना नोटिसा देणाऱ्या मनपालाच ‘जलसंपदा’चा अल्टिमेटम

अहिल्यानगर : शहरातील थकीत कर असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस देत कारवाई करणाऱ्या मनपालाच जलसंपदा विभागाने दणका दिला आहे. मुळा धरणातून शहरासाठी घेतल्या जाणाऱ्या बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीपोटी महापालिकेकडे ११ कोटी ६३ लाख ७१ हजार ८३६ रुपये थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटीसा बजावूनही थकबाकी न भरल्याने जलसंपदा विभागाने शुक्रवारपर्यंत (१५ मार्च) अल्टिमेटम दिला असून त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा … Read more

यंदा खाणाऱ्यांना नव्हे तर पिकवणाऱ्यांना कांदा रडवणार ?

अहिल्यानगर : आवक कमी असल्याने सुरुवातीला कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र, या आठवड्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोमवारी दि. ११ रोजी झालेल्या लिलावात नगरच्या नेप्ती उपबाजारसमितीत एक नंबर कांद्याला ११०० रुपये भाव मिळला असून शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघाला नाही. सद्या कांदा निर्यातीवर शासनाने २० टक्के निर्यात शुल्क लवलेले आहेत. हे त्वरीत हटविण्यात यावेत, तसेच … Read more

जल जीवनच्या कामांची चौकशी करणार जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची ग्वाही

जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची ग्वाही खा. नीलेश लंके यांनी मंत्री पाटील यांची भेट अहिल्यानगर : प्रतिनिधी        केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांची कामे निकृष्ट झाली असून या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी खा. नीलेश लंके यांना दिली. … Read more

अहिल्यानगर महापालिकेचा १६८० कोटींचा अर्थसंकल्प सादर ! कोठे किती होणार खर्च, पहा सविस्तर..

अहिल्यानगरच्या महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक राज आहे. नगरसेवकांची मुदत संपल्याने प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. यावेळचा अर्थात सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी स्थायी समितीत आज (दि.१२) सादर केला. जवळपास १ हजार ६८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. या आर्थिक वर्षात स्वउत्पन्नासह केंद्र व राज्य … Read more

महिनाभरात पाणी योजनेचा वीजपुरवठा बारा वेळा खंडित

अहिल्यानगर – शहराच्या पाणी पुरवठा योजनेवरील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. १५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत १२ वेळा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद पडून शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत गांभीर्याने दाखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे पत्र प्रशासक तथा आयुक्त यशवंत … Read more

हरेगाव मळ्यातील १२७ एकर जमीन व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न ! शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका

१२ मार्च २०२५ श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव मळ्यातील १२७ एकर जमीन नियमबाह्यपणे एका व्यावसायिकाला देण्यात आल्याचा आरोप आकारी पडीक संघर्ष समितीने केला आहे. तालुक्यातील नऊ गावांतील शेतकऱ्यांना साडेसात हजार एकर जमिनी देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. राज्य मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली आहे.असे असताना व्यावसायिकांना जमीन भाडेतत्त्वावर कशी देण्यात आली ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला … Read more

अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला आणि मृत्यू झाला ? हरेगाव प्रकरणात नवा ट्विस्ट!

हरेगाव येथील अॅट्रॉसिटी प्रकरणातील फिर्यादी शुभम माघाडे आणि त्याचे सासरे भानुदास गायकवाड यांचा झालेला अपघाती मृत्यू हा केवळ योगायोग आहे की सुनियोजित कट, याचा सखोल तपास करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आणि भीमशक्ती संघटनेने केली आहे. रविवारी संध्याकाळी एस कॉर्नर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी नोंदवले असले, तरी अपघातस्थळी कोणत्याही … Read more

शंभर फूट दरीत ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू ! धोकादायक वळणाने घेतला आणखी एक जीव

माणिकदौंडी घाटात रविवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. बारामतीवरून छत्रपती संभाजीनगरकडे पुठ्ठा घेऊन जाणारा ट्रक घाट उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने तो थेट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक प्रवीण आजिनाथ मेंगुळे (वय ३९, रा. पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे १०० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले … Read more

कोपरगावमध्ये भीषण अपघात! नशेत असलेल्या स्कॉर्पिओ चालकाने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला

कोपरगाव येथे भरधाव स्कॉर्पिओ गाडी हॉटेलमध्ये घुसून मोठा अपघात घडला आहे. या घटनेत सुनंदा साबळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर भरधाव … Read more

अकोलेच्या नऊ गावांत पंतप्रधान कृषी सिंचन योजना जोरात तब्बल १६३ शेततळी पूर्ण; आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही केले कौतुक

अहिल्यानगर : पंतप्रधान कृषी सिंचन योजना याद्वारे पाणलोट विकास घटक प्रकल्पातून अकोले तालुक्यातील तालुक्यातील नऊ गावांत जलसंधारण उपक्रम राबवले जात आहेत. मागील दोन वर्षांत तालुक्यातील नऊ गावांमध्ये १६३ शेततळी पूर्ण झाली आहेत. पुढील कालावधीत आणखी काही जलसंधारणाची कामे पूर्ण करून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक उन्नतीसाठी नक्कीच लाभ होईल असा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे … Read more

अहिल्यानगरमध्ये लग्न समारंभात हायप्रोफाईल चोरी ! सीसीटीव्हीमुळे समोर आली १९ वर्षांच्या चोरट्या तरुणीची लबाडी

अहिल्यानगरमध्ये एका लग्न समारंभात कलवरी म्हणून आलेल्या १९ वर्षीय तरुणीने तब्बल ६७ तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तिला अटक करून ५७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. चोरीला गेलेले उर्वरित १० तोळे दागिने तिने एका सराफाला विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. घटना कशी उघड … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चौकशी झाली सुरु ! ‘ती’ यादी मागविली…

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्जदारांचा समावेश झाल्याचे आढळल्यानंतर आता महसूल विभाग आणि जिल्हा परिषद यांनी त्याची सखोल पडताळणी सुरू केली आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार आहे. महिलांची यादी तपासणीसाठी महसूल विभागाच्या उप प्रादेशिक परिवहन विभागाने जिल्हा परिषदेकडे चारचाकी वाहनधारक महिलांची यादी … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : कुकडी कालवा फोडला ! शेतकऱ्यांचे अर्धनग्र आंदोलन…

कर्जत मधील रूईगव्हाण पीर फाटा परिसरामध्ये सीना धरणाकडे जाणारा कुकडीचा मुख्य कालव्याचा भराव तोडून त्यात मोठमोठे पाईप टाकून काही जणांनी फोडला. त्यामुळे सीना धरणामध्ये पाणी जाण्यास अडचण निर्माण होणार असून, भराव फोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कालव्यातील पाण्यामध्ये उतरून अर्ध नग्न आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली. अमोल खराडे, विकास शिरसागर, विकास … Read more

ऑनलाईन सिस्टीममध्ये ‘अहिल्यानगर’ नावाची अंमलबजावणी करण्याची मागणी

१२ मार्च २०२५, अहिल्यानगर – अहमदनगरचे अधिकृत नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यात आले असले तरी, अद्याप महाराष्ट्र विधानमंडळाच्या ऑनलाईन प्रणालीत हे नाव बदलले गेलेले नाही. यामुळे महायुतीच्या आमदारांनी विधानमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तत्काळ सुधारणा करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले. नामांतर निर्णय आणि अंमलबजावणी मागील काही महिन्यांपूर्वी अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर अधिकृतपणे ‘अहिल्यानगर’ असे करण्यात आले. महाराष्ट्र … Read more

अहिल्यानगर हादरले ! देवमाणूसच बनला भक्षक ;डॉक्टरनेच केला भावाचा खून!

भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या व्यसनाधीन भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील सातवड गावात घडला आहे. आई आणि स्वतःच्या मुलाला वारंवार मारहाण करणाऱ्या भावाचा अखेर डॉक्टर असलेल्या भावानेच काटा काढला. पोलिस तपासात या हत्येचा उलगडा झाला असून, डॉक्टर अशोक रामराव पाठक (३९, रा. सातवड, ता. पाथर्डी) … Read more

अहिल्यानगर मनपावर शिवसेना ठाकरे पक्षाचा भगवा फडकवणार – किरण काळे

२३ फेब्रुवारीला मी शिवबंधन बांधत शिवसेनेत शरीराने प्रवेश केला. मात्र मी सुरुवातीपासूनच मनान शिवसैनिक आहे. काँग्रेसमध्ये असताना मी माझ्या कार्यालयाच्या फलकावर शिवसेना दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचा फोटो लावला म्हणून काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. जुन्या महानगरपालिकेच्या वास्तूला मी जननायक स्व. अनिलभैय्या राठोड भवन असं नाव देण्याची मागणी करत राठोड यांचा मनपाच्या भिंतीवर फोटो चिटकवला. … Read more

मेंढेगिरी नंतर मांदाडे समितीचा अहवाल सुद्धा जिल्ह्यावर अन्यायकारक अहवालास विरोध करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या सह्यानी हरकती नोंदवणार – डाॅ.खर्डे पाटील

mendhegiri report

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर समन्यायी पाणी वाटपा संदर्भातील मांदाडे समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालातील शिफारशींनी उर्ध्व गोदावरी मधील दारणा, गंगापूर, भंडारदरा, निळवंडे, मुळा, पालखेड प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांचा पूर्णपणे अपेक्षाभंग केला आहे. परीणामी आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी संकटात सापडणार आहे. या अहवालास विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवून वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई … Read more

शिर्डीची राज्यभर चर्चा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही…महाराष्ट्रात एक नवा आदर्श ?

sai baba

Shirdi News : शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय कार्यपद्धती राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी शिर्डीच्या नागरी व्यवस्थापनात केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग आणि प्रभावी निर्णय प्रक्रिया अनेक नगरपरिषदा व महापालिकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी राज्यभरातील नगरपरिषद अधिकारी शिर्डीला भेट देत आहेत. दिघे यांचा ‘विकास पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा आदर्श … Read more