‘त्या’ टोळीवर खंडणीचाही गुन्हा

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : तपोवन रोडवरून वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता) याचे अपहरण करून त्याचा खून करणाऱ्या टोळीनेच आणखी एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करत त्याच्या आई-वडिलांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी ) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या … Read more

वैभव नायकोडी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर… एकाच दिवशी दोघांचे

अहिल्यानगरमध्ये झालेल्या वैभव नायकोडी हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला असून, आरोपींनी एका दिवसात दोन तरुणांचे अपहरण केले होते, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींवर आता अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संदेश भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, … Read more

एक कोटी सोळा लाखांची फसवणूक! शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा आरोपी अखेर अटकेत!

५ फेब्रुवारी २०२५ शेवगाव : पोलिसांनी सात महिन्यांपासून फरार असलेल्या शेअर मार्केट ट्रेडिंग घोटाळ्यातील आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने निव्वळ शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता आणि त्याचा शोध घेत असलेल्या पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले. पळून जाण्याच्या … Read more

अवघ्या २५ मिनिटांत भंडारदरा धरण पोहून पार : शाळकरी मुलांची कमाल !

५ फेब्रुवारी २०२५ भंडारदरा : अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक भंडारदरा धरण अवघ्या २५ मिनिटांत पोहून पार करण्याची किमया शाळकरी मुलांनी केली आहे. या अपूर्व कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.भंडारदरा धरण हे ब्रिटिशकालीन असून, उन्हाळ्यात येथे पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शेंडी गावातील चार शाळकरी मुले सार्थक विनोद आरणे, आर्यन संजय मदने, मेघराज पप्पू पवार आणि निशांत … Read more

करंजी, तिसगावमधील अतिक्रमणे हटवली

५ फेब्रुवारी २०२५ करंजी : करंजी ते भोसे रोडवरील अतिक्रमणे मंगळवारी आठवडे बाजारच्या दिवशीच हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकांची तारांबळ झाली; परंतु बहुतांश व्यापाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच स्वतः अतिक्रमण काढून घेतल्याने अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत पार पडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंतराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी भोसे रोडवरील दुतर्फा बाजूने मोठ्या … Read more

अपहरणाच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करणारा पोलिस कर्मचारी रडारवर ; चौकशी होणार

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : वैभव नायकोडी याच्या अपहरण व खून प्रकरणातील आरोपींवर संदेश भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राट नगर, चेतना कॉलनी, नवनागापूर) याचे अपहरण करून मारहाण केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याने घटनेची माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याची व हलगर्जीपणा केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याची … Read more

BH Number Plate : फक्त ‘या’ लोकांना मिळणार BH नंबर प्लेट ! तुमचं नाव आहे का यामध्ये?

BH Number Plate : भारतातील वाहन नोंदणी प्रणालीत विविध राज्यनिहाय क्रमांक असतात, जे वाहनाचे मूळ स्थान दर्शवतात. मात्र, सतत प्रवास करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थलांतर करणाऱ्या सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी BH सिरीज नंबर प्लेट विशेषतः तयार करण्यात आली आहे. या नंबर प्लेटमुळे वाहनचालकांना संपूर्ण भारतभर कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करण्याची मुभा मिळते. ही सिरीज 2021 मध्ये सुरू … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

अहिल्यानगरः घरासमोरील हौदात पाय घसरून पडल्याने महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे २ मार्च रोजी दुपारी घडली. सुमन गोरखनाथ लोखंडे (वय ४०, रा. शाहूनगर, केडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. सुमन लोखंडे या त्यांच्या घरासमोर असलेल्या हौदात पाणी घेण्याकरिता गेल्या असता त्यांचा पाय घसरून पडल्याने त्या पाण्यात बुडून बेशुद्ध झाल्या. त्यांच्या … Read more

७०० कोटींचा हिशोब गुलदस्त्यात ! १४ वर्षांचा हिशोब कुठे ? मुळा-प्रवरा वीज संस्थेतील पैशांवर प्रश्नचिन्ह

मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेला गेल्या १४ वर्षांत ७०० कोटी रुपयांहून अधिक निधी प्राप्त झाला आहे, मात्र या निधीचा हिशोब गुलदस्त्यात राहिलेला आहे. संस्थेचे ऑडिट अनेक वर्षांपासून झालेले नाही, त्यामुळे या निधीचा योग्य वापर झाला की गैरव्यवहार झाला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात संस्थेच्या कामकाजाची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी विधिज्ञ अजित काळे … Read more

श्रीरामपूर-पुणे बसेस नफ्यात, तरीही नवीन बसेस नाहीत ! प्रवाशांची गैरसोय कधी संपणार?

श्रीरामपूर आगाराला नवीन बसेस मिळण्याची अपेक्षा असतानाही अद्याप कोणतीही गाडी दाखल झालेली नाही. जिल्ह्यातील तारकपूर, शेवगाव आणि पाथर्डी या आगारांना नवीन बसेस मिळाल्या असताना श्रीरामपूर आगार मात्र उपेक्षित राहिले आहे. येथील आगारप्रमुखांनी २० नवीन बसेसची गरज असल्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जुन्या बसेस, वारंवार बिघाड आणि प्रवाशांचा … Read more

अहिल्यानगरमध्ये मस्साजोग ! अपहरण केलं ,फ्लॅटवर डांबलं,चेंबरमध्ये मारहाण, व्हिडीओ आणि डोंगरावर जाळलं…

Ahilyanagar Breaking : मस्साजोग घटनेची धक्कादायक आठवण ताजी असतानाच, अहिल्यानगरमध्ये एक थरारक गुन्हा उघडकीस आला आहे. दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुष मारहाण करण्यात आली. यात वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह नगर-मनमाड रोडवरील विळदघाट परिसरात डोंगरावर नेऊन जाळून टाकला. या घटनेने … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून पाण्याची होतेय गळती, सुरक्षेचा प्रश्नही गंभीर

Bhandardara Dam : महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या भंडारदरा धरणातून पाण्याची गळती होत असून, लाखो रुपये खर्चुनही ही समस्या अद्याप सुटलेली नाही. शासनाच्या विविध प्रयत्नांनंतरही रोज पाणी वाया जात आहे, ज्यामुळे पाणी टंचाईच्या झळा बसणाऱ्या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ब्रिटिश कालखंडात उभारलेल्या या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याला समृद्ध केले असून, शेती ओलिताखाली आली आहे. … Read more

छत्रपती संभाजी नगर महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात

Ahilyanagar News : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर इमामपूर परिसरात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठ्या स्वरुपाचे अपघात घडत घडत आहेत. परिसरातील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी गणेश आवारे यांच्यासह इमामपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, छत्रपती संभाजी नगर महामार्गावर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. … Read more

महिलांना एसटीची सवलत चोरांना ठरतेय आयती संधी ! बस प्रवासात महिलांचे दागिने चोरीच्या घटनांत मोठी वाढ

Ahilyanagar News : चिचोंडी पाटील सध्या शासनाने महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे एसटीला काही प्रमाणात का होईना दिलास मिळला आहे.मात्र दुसरीकडे एसटीबसने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरीचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे. त्यामुळे एसटीच्या सवलतीचा फायदा प्रवाशी महिलांपेक्षा भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांचाच अधिक होत आहे. कोरोनामुळे … Read more

चास शिवारातील खुनाचा उलगडा ! पोलिसांनी आरोपीस आग्रा येथे जाऊन केली अटक

crime

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर तालुक्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. 17 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल स्वामी समर्थ, अहिल्यानगर-पुणे महामार्गावर, भोयरे पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा मृतदेह आढळला. पोलिसांनी सुरुवातीला याला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, वैद्यकीय अहवालातून हा खून असल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात इसमाने गळा आवळून हत्या … Read more

रक्तरंजित कट! ९ आरोपींनी मिळून केली थरारक हत्या,केस कापायला गेलेला तरुण घरी परतलाच नाही…

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका 19 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याचा अमानुषपणे खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह केकताई येथील डोंगराळ भागात जाळून विल्हेवाट लावण्यात आली. वैभव शिवाजी नायकोडी असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणात तोफखाना पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 9 आरोपींना अटक केली … Read more

अहिल्यानगर हादरले ! अपहरणानंतर युवकाचा निर्घृण खून, डोंगरात जाळल्याची कबुली

तपोवन रस्ता परिसरातून अपहरण झालेल्या युवकाचा खून करून त्याला डोंगरात जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय 19, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड, सावेडी) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी त्याला जाळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ही घटना 22 फेब्रुवारी 2025 … Read more

अहिल्यानगर करांनो, सावध व्हा ! आपल्या बसस्थानकांची स्थिती ‘स्वारगेट’ होणार नाही ना ?

Ahilyanagar Special Report : स्वारगेट बसस्थानकात तीन दिवसांपापूर्वी तरुणीवर अत्याचार होण्याची घटना घडली. त्यानंतर बसस्थानके महिलांसाठी असुरक्षित असल्याचे चर्चा अचानक वाढल्या. स्वारगेटच्या एका घटनेने सरकारची यंत्रणा खडबडून जागी झाली. स्वारगेट बसस्थानकातील गॉर्डचे निलंबन, अधिकाऱ्यांची चौकशी असे सगळे सोपस्कार पूर्ण झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बसस्थानके, तेथील सीसीटीव्ही, पथदिवे, महिला शौचालय, गार्ड, वाँचमेन, अधिकारी यांची चर्चा … Read more