..तर मंत्र्याना जामखेडमध्ये नो एंट्री !

जामखेड :- कला केंद्र बंदच्या आदेशानंतर सहा दिवसांपासून सुरू असलेले केंद्रचालक व कलावंतांचे उपोषण सहाव्या दिवशी जिल्हा प्रशासनाला मागण्या कळवण्याच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. दहा दिवसांत आम्हाला न्याय दिला नाही, तर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय व पालकमंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करू. जामखेडमध्ये एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही, असा इशारा कलावंतांच्या वतीने अरुण जाधव … Read more

…तर विखे पाटील लवकरच भाजपात.

शिर्डी :- राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे लवकरच भाजपात प्रवेश करण्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्यापेक्षा भाजपचे मुलायम ‘कमळ’ हाती घेतलेले बरे! या विचाराप्रत आलेले विखे पाटील पिता-पूत्र लवकरच काँग्रेस पक्ष सोडतील, अशी माहिती या वृत्तात दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी … Read more

आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला !

अहमदनगर :- शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला आहे. केडगाव हत्याकांडात त्यांच्या मुलीवरच आता आरोपी होण्याची वेळ आली आहे. नातेवाइकांमध्ये भांडणे लावणाऱ्या कर्डिले यांना येत्या विधानसभेला धूळ चारण्यासाठी मी सज्ज झालो आहे. सर्वांनी मला साथ द्यावी,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली. … Read more

लग्नाच्या पंधरा दिवस अगोदर तरुणाची आत्महत्या.

राहुरी :- तालुक्यातील गोटुंबा आखाडा येथील गवंडीकाम करणाऱ्या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. प्रवीण साळवे (२४ वर्षे) असे या तरूणाचे नाव असून पंधरा दिवसांवर त्याचे लग्न आले होते. मंगळवारी सकाळी राहुरी-शिंगणापूर रस्त्यावरील गोटुंबा आखाडा येथील विद्यापीठ प्रक्षेत्रावर आत्महत्येची ही घटना उघड झाली. गळफास लावून तरूणाने आत्महत्या केल्याची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली … Read more

सुजय विखे ‘या’ पक्षाकडून लोकसभा लढविणार !

अहमदनगर :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सुजय विखे पाटील यांचा आज किंवा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो. तसंच ते राष्ट्रवादीकडून ते अहमदनगर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये राज्यातील 48 जागांपैकी जवळपास सगळ्याच जागांवर सहमत झालं होतं. मात्र … Read more

नापिकीमुळे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या.

राहुरी :- नापिकी, मुलीच्या लग्नाचे झालेले कर्ज फेडता आले नाही, यातून आलेल्या नैराश्यातून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पटारे-पागिरे वस्तीवरील सुनील कारभारी पटारे (वय ४२) यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. काही महिन्यांपूर्वी थोरल्या मुलीचे लग्न करण्यासाठी उधारी व उसनवारीने पैशांची जुळवाजुळव केली आणि शेतीच्या उत्पन्नातून सर्व देणी देऊन टाकू, असे नियोजन पटारे यांनी केले होते. … Read more

अंधश्रद्धेतून पुतण्यानेच केली ‘त्या’ पुजाऱ्याची हत्या !

जामखेड :- तालुक्यातील खर्डा येथील शिकारेवस्तीवरील दत्त मंदिरातील कुशाबा तुळशीराम शिकारे ( वय ५० ) या पुजाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या त्यांच्याच चुलत पुतण्याने केल्याचे निष्पन्न झाले. मृताची पत्नी रेखा शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर सोपान शिकारे विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्या-मुंबईहून येणाऱ्या भाविकांचा आजार महाराज बरा करतात, परंतु आपला आजार वाढत चालला आहे, … Read more

राहुरी मतदारसंघ असेपर्यंत मीच आमदार – आ.कर्डिले.

राहुरी :- सत्तेत असताना ज्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाहीत, असे पुढारी मी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. प्रिंपी अवघड येथील २५ लाखांच्या विविध कामांचे भूमिपूजन करताना कर्डिले म्हणाले, मी दुष्काळी भागातील असल्याने पाण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. सोनई प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून प्रिंपी अवघड गावाला … Read more

धारधार शस्त्राने मंदिरातच पुजार्‍याची हत्या !

जामखेड :- तालुक्यातील खर्डा येथील दत्त देवस्थानचे प्रमुख कुशाबा तुळशीराम शिकारे (वय 50) यांचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. शनिवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता शिकारी वस्तीवर ही घटना घडली दत्त मंदिरात नेहमी प्रमाणे भजनाची तयारी करण्यासाठी गेलेल्या मंदिरातील पुजारी यांचा अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. मात्र हत्या कशामुळे झाली हे अद्याप … Read more

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना रोखण्यासाठी आता बारामतीची पॉवर !

अहमदनगर :- पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना रोखण्यासाठी आता बारामतीकर पवार घराण्यातील व्यक्तीने उमेदवारी घ्यावी, अशी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने जोरदार नियोजन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांना कर्जत-जामखेड मतदार संघाचे पक्षनिरीक्षक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.अमरसिंह मारकड यांना नगर जिल्हा राष्ट्रवादी … Read more

डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीवर संभ्रम कायम.

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, नगर दक्षिणेची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने या जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढला आहे. नगर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या मतदारसंघातून राजीव राजळे यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर राष्ट्रवादी … Read more

भाजपकडून लोकसभेसाठी माजीमंत्री बबनराव पाचपुते ?

अहमदनगर :- आगामी लोकसभा निवडणुकीत खा.दिलीप गांधी यांच्यावरील नाराजीचा फटका भाजपाला बसू नये यासाठी भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याबाबत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनाविचारणा झाल्याची माहिती समजली असून माजी मात्री पाचपुते यांनी लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नसल्याने सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खा.दिलीप गांधी यांच्यावरील नाराजीचा फटका भाजपाला बसू नये यासाठी भाजप सक्षम … Read more

सुजय विखेंसाठी शरद पवारांनी नगरची जागा सोडली !

अहमदनगर :- सुजय विखे यांच्या मिशन लोकसभेतील जागा वाटपाचा घोळ आज मिटला आहे.नगर दक्षिण ह्या जागेवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपला हक्क सोडला असून ही लोकसभेची जागा काॅंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतल्याने सुजय विखेंचा मार्ग सुकर झाला आहे. सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस नगरची जागा सोडणार !राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर लोकसभेची जागा काॅंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे … Read more

अपघातात पोलिस निरीक्षकासह पत्नीचा मृत्यू.

श्रीगोंदे :- पुण्यात राहणाऱ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेले धारूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नी सुजाता (वय ४०) यांचा नगर-पुणे रोडवर गव्हाणवाडी येथे झालेल्या कारच्या अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. अनिलकुमार जाधव हे सध्या धारूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांची ऐश्वर्या नावाची मुलगी … Read more

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या.

कर्जत :- तालुक्यातील रजपूतवाडी येथील शेतकरी लक्ष्मणसिंग विठ्ठलसिंग परदेशी (वय ४८ वर्षे) या शेतकऱ्याने दुष्काळामुळे बँकेचे कर्ज थकले असून शेत नापीक राहिले. तसेच कामाचा आतिरिक्त ताण आल्यामुळे अखेर त्यांनी राहत्या घरामध्ये फाशी घेतली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे कोरेगाव व रजपूतवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. … Read more

अनुराधा नागवडे यांचा राष्ट्रवादीत होणारा प्रवेश स्थगित !

अहमदनगर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराधा नागवडे यांचा राष्ट्रवादीत होणारा प्रवेश स्थगित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सीमेवरील सध्याच्या परिस्थितीमुळे प्रवेश सोहळा लांबणीवर टाकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पडद्याआड झालेल्या जोरदार हालीचालींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडी प्रत्यक्षात उतरल्यास दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही मतदारसंघात आघाडी जुनी … Read more

बिंगो जुगार खेळणाऱ्या चार जणांना अटक.

श्रीगोंदा :- तालुक्यातील काष्टी येथील जयभवानी चौकात बिंगो जुगार खेळणारे दत्तात्रय बाळासाहेब वाडगे (वय २६), दत्ता अशोक गायकवाड (२६), जयंत संजय आढाव (१९) आणि राजू कैलास खरात (२७, काष्टी) यांना रंगेहात पकडून पोलिस उपनिरीक्षक गजानन बोडके यांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख १० हजार ३५० रुपये हस्तगत केले. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात … Read more

महिलेचा विनयभंग करणाऱ्या एसटी चालकावर गुन्हा दाखल.

पाथर्डी :- शहरातील उपनगरात राहणाऱ्या महिलेचा एसटी चालकाने विनयंभग केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला. झालेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुझी समाजात बदनामी करील अशी धमकी देणारा बसचालक दत्तू सावळेराम खेडकर याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. संबंधित महिलेच्या पतीचे गॅरेज आहे. पती आजारी असल्याने ते दवाखान्यात गेले होते. महिला गॅरेजवर थांबली होती. … Read more