गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.

पाथर्डी :- तालुक्यातील मिरी येथील सोमनाथ चंद्रभान झाडे (वय ३७) या तरुणाने कर्जाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.सोमनाथच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

उसाच्या ट्रॅक्टरला धडकून शिक्षिका ठार

राहुरी :- उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर धडकून गुंजाळे येथील प्राथमिक शिक्षिका जागीच ठार झाली.वांबोरीजवळ कात्रडफाट्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, वांबोरी केंद्राच्या गुंजाळे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनंदा महेश कोकणे (वय ३२) या आपल्या स्कुटीवर गुंजाळेकडून वांबोरीच्या दिशेला जात होत्या. ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला (एमएच २८ एजे ४७८१) … Read more

घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी अधिकारी व खा.गांधी यांनी केली जागेची पाहणी.

अहमदनगर :- पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लॅण्ड पुलिंगद्वारे संयुक्त भागीदारी तत्वावर घरकुल वंचितांचा प्रकल्प साकारण्यासाठी म्हाडाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश श्रेष्ठ, घनश्याम सोनार व खासदार दिलीप गांधी यांनी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळासह सोमवारी निंबळक, इसळक शिवारातील खडकाळ पड जमीनीची पहाणी केली. यावेळी कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, … Read more

मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाचा खून.

अहमदनगर :- तालुक्यातील वाकोडी येथे मागील भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून तलवार, कटावणी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने विजय पवार या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, याप्रकरणी सोनू … Read more

उसाच्या ट्रकखाली दबून मामा-भाच्याचा मृत्यू.

राहुरी :- तालुक्यातील वांबोरी येथील पांढरीपुल रस्त्यावरील डाक बंगल्याजवळ शनिवारी रात्री उसाचा ट्रक पलटी होऊन त्याच्याखाली दबून मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला. बाबासाहेब बाजीराव ससे (वय ४५) व रवींद्र तुकाराम उर्फ बाळासाहेब दांगट (वय ३०, दोघे रा. कात्रड, ता. राहुरी) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. याबाबत वांबोरी दूरक्षेत्र येथे दीपक तुकाराम ऊर्फ बाळासाहेब दांगट यांनी अज्ञात … Read more

घनश्याम शेलार यांनी पक्ष सोडल्याने शिवसेना संपली असे समजू नये !

श्रीगोंदे :- घनश्याम शेलार शिवसेनेत आले , ते केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी. शिवसेना-भाजपची युती झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी सेना सोडली. ते गेल्याने तालुक्यातील शिवसेना संपली, असे शेलारांनी समजू नये. असे मुंगूसगावचे सरपंच आणि आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाप्रमुख रामदास कानगुडे यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आपल्याबरोबर तालुक्यातून अनेक कार्येकर्ते गेल्याचे शेलार भासवत आहेत. … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

पारनेर :- तालुक्यात एका 17 वर्षिय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. फसवणूक झाल्याने मुलीने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रविण पोपट खरात (वय 24, रा. कारेगाव,ता.पारनेर) याच्याविरूध्द सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला जेरबंद केले आहे. पारनेर तालुक्यातील कारेगाव येथील … Read more

विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह.

राहुरी :- तालुक्यातील ब्राह्मणी येथील मंगल पोपट भिसे या २९ वर्षांच्या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी रात्री गावातील एका विहिरीत दगडाला बांधलेल्या स्थितीत आढळला. मंगल ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची फिर्याद पती पोपट भिसे याने राहुरी पोलिस ठाण्यात दिली होती. मंगलचा सासरा धोंडिराम सवाजी भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीत अमोल चंद्रकांत साठे (३०, ब्राह्मणी) व भागोजी तुळशीराम वीरकर (३८, … Read more

माझी लोकसभेची हौस फिटली – आ.शिवाजी कर्डिले

अहमदनगर :- माझी लोकसभेची हौस फिटली आहे. त्यामुळे मी कधीही लोकसभा लढवणार नाही. औटी अभ्यासू आहेत. त्यांचे हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. त्यांनी लोकसभा लढवावी. मी त्यांचे काम करेन, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगताच कर्डिले मुरब्बी आहेत. मला पुढे काढून दिले म्हणजे मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांना वाटत असेल. पण मी लोकसभा लढणार नाही, … Read more

हकालपट्टी होण्याअगोदरच घनश्याम शेलार यांनी शिवसेना सोडली !

श्रीगोंदा :- घनश्याम शेलार यांनी पक्षात येऊन संघटना खिळखिळी केली. स्वतः बरोबर पक्ष बदलत फिरणाऱ्यांना त्यांनी प्रमुख पदे दिली. पक्षाचा मनमानी वापर केला. बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना एकही जागा निवडून आणता आली नाही. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा जाणीवपूर्वक लंगडा पॅनेल उभा केला. नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार माघारी घेतले. त्याचे योग्य उत्तर त्यांना पक्षश्रेष्ठींना … Read more

शरद पवार हेच खरे जाणते नेते -घनश्याम शेलार.

श्रीगोंदा :- लोकसभेसाठी तिकीट मिळणार नसल्याचे सेना-भाजपचा युतीमुळे स्पष्ट झाल्याने घनश्याम शेलार यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असल्याचे गुरूवारी पत्रकार परिषेदत जाहीर केले. त्यांचे समर्थक असलेले तालुकाप्रमुख संजय आनंदकर, बाळासाहेब पवार, राजाराम जठार आदींनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेनेने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले, स्वबळाचा नारा दिला, मात्र ऐनवेळी युती केल्याने शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाल्याचे शेलार यावेळी … Read more

लोकसभा विकासाच्या मुद्यावर लढविणार :- डॉ. सुजय विखे

राहुरी :- सत्तेतून संधी मिळण्यासाठी विखे कुटुंबाने लाचारी कधीही पत्करली नाही, असे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. प्रभागनिहाय बैठकीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची अनेकजण वाट पहात आहेत. मात्र, राजकीय पक्षांचे आज काही खरे राहिले नाही. काल शिवसेनेची उमेदवारी करणारे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. राजकारणात संघर्ष अटळ असला, तरी … Read more

‘त्या’ माजी सरपंचाची एटीएसकडून चौकशी.

श्रीगोंदा :- पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत देशविरोधी वक्तव्य करणारा विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यद याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर त्याची नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे हुतात्म्यांच्या श्रद्धांजली सभेत सय्यद याने देशविरोधी वक्तव्य केले होते. … Read more

टँकरची धडक बसल्याने वृद्धाचा मृत्यू.

शेवगाव :- पैठणकडे चाललेल्या टँकरची धडक बसल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. येथील क्रांतिचौकात बुधवारी सकाळी हा अपघात झाला. पोलिसांनी टँकरचालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत गणेश राम दारकुंडे यांनी फिर्याद दिली आहे. टँकर क्रमांक एमएच १७ ए जी ३५१३ पैठणकडे जात असताना उजव्या बाजूचे चाक उत्तमराव काशिनाथ दारकुंडे (वय ८५, दादेगाव) यांच्या दोन्ही … Read more

आ.शिवाजी कार्डिलेंकडून आ.राहुल जगतापांचे कौतुक !

अहमदनगर :- मागील ५ वर्षाच्या कालावधीतील अनुशेष भरुन काढण्याचे काम चालू आहे. मतदार संघातील सर्व रस्ते उत्कृष्ट करण्याचा माझा निर्धार आहे. कामांचा दर्जा चांगल्या ठेवण्यावर माझा भर आहे.चालू वर्षी दुष्काळ फार मोठा आहे, सर्वांनी ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी, लवकरच टँकर व छावण्या देखील सुरु करणार आहे. साकळाई योजनेचा देखील पाठपुरावा चालू आहे.राळेगण म्हसोबा येथे धनगरवाडी … Read more

रोहित पवार म्हणतात आदेश दिला तरच विधानसभा लढवू,अन्यथा….

जामखेड :- तालुक्यातील युवकाच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वरिष्ठांनी आदेश दिला तरच विधानसभा लढवू, अन्यथा पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे युवा नेते रोहित पवार यांनी सांगितले. आरणगाव येथे नागरी सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा … Read more

चारा छावण्या सुरू होण्यासाठी शिवसेनेचा रास्तारोको

अहमदनगर :- दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत दि. २५ जानेवारी २०१६ रोजी परिपत्रक जारी केले. मात्र, त्यातील प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तात्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात अन्यथा मंगळवारी ( दि.१९) जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत … Read more

शिवसेना – भाजप युती झाल्यास शिवसैनिक खा. गांधीचे काम करणार नाही !

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मानणारा असून १९९८ पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता. बाळासाहेब विखे याच मतदार संघातून खासदार झाले होते. नंतर ही जागा भाजपकडे गेली. शिवसेनेने प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच भाजपचे दिलीप गांधी या मतदार संघातून खासदार झाले. परंतु गांधी यांच्याविषयी नाराजी असल्याचे पत्रात नमूद करून ही जागा शिवसेनेकडे घ्यावी अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव … Read more