विखे-कर्डीले यांच्यामधील मैत्री संपुष्टात येणार ?

अहमदनगर :- दक्षिण लोकसभा भाजपाचे तिकीट खासदार दिलीप गांधी यांना निश्‍चित झालेले आहे. मोठा मतदार संघ असल्याने त्यांचा संपर्क कमी असला तरीही आम्ही बाकी आमदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार असल्याचे वक्तव्य आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. मोमीन आखाडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार कर्डिले यांच्या हस्ते … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासकामांसाठी भरीव निधी !

अहमदनगर :- जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १२८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये २८ कोटींचा निधी जामखेड तालुक्यासाठी दिला असुन, अनेक वर्षांपासुन रखडलेल्या खर्डा येथील अमृतलींग जोड तलावासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खर्डा येथे आज केले. खर्डा (ता. जामखेड) येथील विविध विकास कामांच्या भुमिपूजनाप्रसंगी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे … Read more

९५ लाख मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यावर गुन्हा.

पारनेर :- अतिक्रमण काढण्यासाठी तब्बल ९५ लाख मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पोपट माळी यांच्याविरोधात खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ, तसेच गावठी कट्ट्याचा धाक दाखवल्याचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. यासंदर्भात संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील रोहिदास भास्कर देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख यांची वनकुटे येथे गट क्रमांक ८५ मध्ये … Read more

..तर अण्णा ‘पद्मभूषण’ परत करणार

पारनेर :- लाेकायुक्त, लाेकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ५ दिवसांपासून राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपाेषण सुरू आहे. …केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही ! जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली व उपाेषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, जाेपर्यंत निर्णय हाेत नाही ताेपर्यंत … Read more

श्रीगोंद्यात सरपंचास गावातील तरुणांकडून मारहाण !

श्रीगोंदा :- तालुक्यातील मुंगुसगावचे सरपंच रामदास कानगुडे यांच्यावर दि.२७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील ५-६ इसमांनी जबर मारहाण केली. दि.२७ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता कानगुडे हे मुंगुसगाव शिवारातील हॉटेल मातोश्री येथे जेवणासाठी गेले होते. यावेळी गावातील सुजित सुनील इथापे, अजिंक्य विशाल धुमाळ, किरण अनिल कानगुडे, संकेत बबन कानगुडे, दीपक बोरुडे हे तरुण … Read more

…त्यांनी चार वर्षांत तालुक्यात काय कामे केली ?

श्रीगोंदे :- ‘ज्यांना तुम्ही निवडून दिले, त्यांनी चार वर्षांत तालुक्यात काय कामे केली? भाजपच्या विकासकामांचे श्रेय घेऊन राष्ट्रवादी स्वत: कार्यसम्राट म्हणून घेत आहे, हे जनता ओळखून आहे.’ ‘सध्या आमदार नसलो तरी जनतेच्या जोरावर चाळीस वर्षे राजकारणातील संपर्क कामाला येत आहेत. त्यातून तालुक्यात विकासकामे करता येत आहेत. सध्या तर राज्यात व केंद्रात आपलेच सरकार असल्याने तालुक्यासाठी … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.

शेवगाव :- कर्जाला कंटाळून तालुक्यातील सुकळी येथील बबन आसराजी भवर (वय ५८) या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा मच्छिंद्र बबन भवर याने दीड वर्षापूर्वी याच कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एकाच कुटुंबात कर्जामुळे दोघांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. भवर यांचा मुलगा हरिदास याच्याकडे सेंट्रल बँकेचे दीड लाख रुपये, तर … Read more

….आणि निलेश लंकेंनी दिला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशास नकार

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारनेर मध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेनेतून बडतर्फ झालेले निलेश लंके हे आपल्या हजारो कार्यकर्त्यासह अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने निलेश लंके यांनी ऐन सभेच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी … Read more

अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ शेवगाव मध्ये उपोषण..

शेवगाव :- गेल्या तीन दिवसांपासून अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्याच्या पाठिंब्यासाठी शेवगाव येथील कार्यकर्त्यांनीही शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल आहे. गेली अनेक वर्ष सरकारने अण्णा हजारे यांना अनेक वेळा आश्वासन देऊनही जनलोकपाल लागू केले नाही त्यामुळे अण्णा हजारे यांनी गेल्या तीन दिवसापासून राळेगणसिद्धी येथे अमरण … Read more

पारनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंकणारच.

पारनेर :- तालुक्यातील सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास पारनेर विधानसभेची जागा आपण नक्की जिंकू, असा शब्द मी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला देतो,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पक्षाची निर्धार परिवर्तनाचा संवाद यात्रा गुरुवारी (३१ जानेवारी) पारनेरला आली होती. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते.शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख … Read more

एसटी बसमधून ९ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास.

जामखेड :- एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिला डॉक्टरच्या बॅगेतून ८ लाख ८० हजार रुपयांचे २८ तोळे सोने लंपास केले. याबाबत पाटोदे (जि. बीड) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून जामखेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. डॉ. क्षितिजा श्रीकांत घनवट (२७, नवी सांगवी, पुणे, हल्ली दिल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. पुण्याहून सासरे पांडुरंग घनवट यांच्याबरोबर … Read more

…तर आमदार राहुल जगताप पुन्हा विधानसभेवर !

श्रीगोंदे :– तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते एकत्र राहिल्यास विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल जगताप पुन्हा विजय होतील, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जगताप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांच्या सत्कार समारंभात पाटील म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास काय होते याची सुरुवात श्रीगोंद्यात झाली. न खाऊंगा न खाने दूंगा … Read more

आठवडे बाजारात पैसे लांबवणाऱ्या तीन महिलांना चोप !

राहुरी :- आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांचे पैसे चोरणाऱ्या श्रीरामपूर येथील भामट्या महिलांना नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिला. फटके बसताच चोरलेले पैसे काढून देत या महिलांनी बाजारातून काढता पाय घेतला. गुरूवारी दुपारी राहुरीच्या आठवडे बाजारात ही घटना घडली. तालुक्याचा बाजार असल्याने भाजीपाला व इतर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन ३ भामट्या महिलांनी … Read more

आता ‘या’ नेत्याला लढवायचीय नगर दक्षिण लोकसभा…

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने हळूहळू प्रतिष्ठेचा होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. काँग्रेसने डॉ. सुजय विखेंसाठी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे मागितला आहे, पण राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिल्याने काँग्रेसला ही जागा सोडण्याची राष्ट्रवादीची इच्छा नसल्याचे दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून लढण्यास इच्छुकांची संख्याही वाढू लागली आहे. सुरुवातीला असलेले आमदार अरुण जगतापांचे … Read more

मुंडे साहेब यांचा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही.

अहमदनगर :- अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा घणाघात करत धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारसह पंकजा मुंडेना धारेवर धरले. … Read more

पेट्रोलियम पाईपलाईन कामासाठी जमीन अधिग्रहणाला शेतकर्‍यांचा विरोध.

अहमदनगर :- दोन ते चार हजार रुपये प्रति गुंठा या कवडीमोल भावाने इंडियन ऑइल पेट्रोलियम पाईपलाईनच्या कामासाठी चालू असलेले जमीन अधिग्रहण तातडीने थांबविण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली. जमीन अधिग्रहण कायदा 2013 प्रमाणे जास्तीत जास्त मोबदला मिळण्याबरोबर शेतकर्‍यांना विश्‍वासात घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देऊन … Read more

वांबोरी ते देहरे रस्त्याचे ‘भाग्य’ उजळले!

अहमदनगर :- दोन तालुक्यांना जोडणार्‍या वांबोरी ते देहरे रस्त्याचे ‘भाग्य’ उजळले आहे! वांबोरीतील तरुणांच्या पुढाकाराने श्रमदान करत रस्त्याची डागडुजी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले असून, त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान, या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण मंजूर झाले असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, … Read more

…म्हणून झाला आमचा पराभव : माजीमंत्री बबनराव पाचपुते.

श्रीगोंदे :- नगरपालिका निवडणुकीत झालेला भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा पराभव आम्ही स्वीकारला. विरोधकांनी प्रभाग सात व नऊमध्ये अमाप पैसा वापरल्याने आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. पालिकेत भाजपचे ११ नगरसेवक निवडून आले असल्याने मनमानी कारभार होऊ देणार नाही. गावाच्या विकासासाठी व चांगल्या कामाला सहकार्यच करू, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. … Read more