श्रीगोंदा तालुक्यात ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार.

श्रीगोंदे :- तालुक्यातील अजनुज गावात अकरा वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी राहुल दत्तू रोकडे याच्यावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दुपारी एकच्या सुमारास ही मुलगी जेवणाच्या सुटीत घरी आली होती. जेवण करून पुन्हा शाळेत जात असताना जुन्या इंग्लिश शाळेजवळ रोकडे ऊर्फ बोंबल्या (२२) याने तिला अडवले. बळजबरीने मोटारसायकलीवरून शाळेच्या आवारात … Read more

‘या’ गावाने घेतला खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय !

राहुरी :- तालुक्यातील देसवंडी येथील ग्रामसभेत खा. दिलीप गांधी यांनी 15 वर्ष गावाकडे केलेल्या दुर्लक्षित भूमिकेमुळे संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. देसवंडी गावामध्ये सरपंच दीपक खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसेवक व्ही. आर. जगताप यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करीत प्रास्ताविक … Read more

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.

अहमदनगर :- निंबळककडून सनफार्मा चौकाकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरुन वेगात येणाऱ्या टेम्पोने जोरात धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार राजेंद्र लक्ष्मण निकम (वय ३५, रा.विळद) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मनमाड रोडवरील दादा पाटील पेट्रोल पंपासमोर, सनफार्मा चौक, निंबळक रोड येथे मंगळवारी दि.२२ सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, राजेंद्र लक्ष्मण निकम … Read more

डायल 100 कार्यप्रणालीचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्‍ते उदघाटन

अहमदनगर :- जनतेला तात्‍काळ पोलिस सेवा देण्‍यासाठी नियंत्रण कक्ष डिजिटल करुन डायल 100 ही सेवा अत्‍याधुनिक पध्‍दतीने कार्यान्वित करण्‍यात आली आहे. या यंत्रणेला मोबाईल App जोडण्‍यात आले असून या सेवेचे उदघाटन आज जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. जिल्‍हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला खासदार दिलीप गांधी, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्‍हा पोलिस अधीक्षक … Read more

चाकूहल्ला करून सव्वादोन लाख रुपये लंपास.

जामखेड :- तालुक्यातील राजुरी येथील ओम साई संगमनेश्वर पेट्रोल पंपावर दोघांना चाकूने मारहाण करून सव्वादोन लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड-खर्डा रस्त्यावर दहा कि.मी अंतरावर राजुरी या ठिकाणी ओम साई संगमनेश्वर … Read more

निलेश लंके राष्ट्रवादीत, आता सुजित झावरे पाटलांचे काय होणार ?

पारनेर :- शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले निलेश लंके कोणत्या पक्षात जाणार याबाबत ब-याच दिवस चर्चेला उधाण आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने डाव टाकून लंके यांना आपलेसे करून घेतले आणि पोकळ उठणा-या वावड्यांना पूर्णविराम दिला. तालुकाध्यक्ष निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार … Read more

शरद पवारांचा विखे पाटलांना ‘धक्का’ !

अहमदनगर :- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील महासंचालक व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी डॉ. निमसे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यानंतर निमसे यांनीही यासाठी तयारी दर्शविली होती. शिक्षण क्षेत्रातील गाढा अनुभव असलेला डॉ. निमसे … Read more

भाजपच्या नगरसेवकांसह ५४ जण श्रीगोंद्यातून तडीपार.

श्रीगोंदा :- नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरातून भाजपचे दोन नगरसेवक व पक्षाचे उमेदवार नाना कोथिंबिरे आणि सुनील वाळके यांच्यासह तब्बल ५४ जणांची शहरातून हद्दपारी करण्यात आली आहे. प्रातांधिकारी गोविंद दाणेज यांनी ही माहिती दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १४२ जणांना शहरातून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. त्या प्रकरणांची प्रांताधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊन ५६ जणांना हद्दपार करण्याचा आदेश देण्यात … Read more

श्रीगोंद्यात अंगणवाडी सेविकेला मारहाण.

श्रीगोंदा :- तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेला तिने पाच महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीचा राग येऊन, ज्या व्यक्तिविरोधात तिने तक्रार दिली होती. त्याच्यासह नऊ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुण तिच्या दुचाकीची मोडतोड करून नुकसान केल्याची घटना दि.१६ रोजी सायंकाळी घडली होती. यावेळी वाद सोडवण्यासाठी मधे पडलेल्या अंगणवाडी सेविकेचा मुलगा व मैत्रिणीला देखील मारहाण करण्यात आली. सदर अंगणवाडी … Read more

खासदार.दिलीप गांधीनाच भाजपची उमेदवारी.

अहमदनगर :- आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून खासदार दिलीप गांधी हेच भाजपचे उमेदवार राहतील, असे स्पष्ट संकेत पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे तीन वेळा निवडून आलेले खासदार दिलीप गांधी यांच्यासारखे अनुभवी, सिनिअर उमेदवार आहेत. त्यांचे नाव अंतिम झालेले नसले तरी बाहेरून भाजपमध्ये डोकावणार्‍यांना थारा नाही. त्यांनी भाजपमध्ये डोकावू नये, असा … Read more

विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणार्‍या महिलेचा होणार भंडाफोड !

अहमदनगर :- शेत जमीनीच्या वादातून झालेल्या भांडणापोटी सख्खा दीर व भाच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार्‍या महिलेचा खोटारडेपणा जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजने उघडकीस येणार आहे. सदर फुटेज मिळण्याची मागणी प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे या गुन्ह्यात आरोपी ठरलेले रविंद्र भिसे व संतोष पारखे यांनी केली आहे. तर खोटा गुन्हा दाखल करणार्‍या सदर महिलेवर व खोटी … Read more

पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसह चेअरमन विरोधात गुन्हा दाखल

पारनेर :- परस्पर खात्यातून ३८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसह चेअरमन व सहा जणांविरुद्ध पारनेर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  चेअरमन व अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा चंद्रकांत पाचारणे यांची पत्नी व त्यांच्या नावावर पारनेर शाखेत संयुक्त खाते होते. या खात्यातून २०१४ मध्ये दोन वेळा अज्ञात व्यक्तीने ३८ हजार … Read more

सख्ख्या भावांत झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू.

श्रीगोंदे :- तालुक्यातील हिरडेवाडी येथे सख्ख्या भावांत किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून रावसाहेब कापसे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुनीता रावसाहेब कापसे यांच्या फिर्यादी वरून दत्तात्रय कापसे व सुशिला कापसे यांच्या विरोधात श्रीगोंदे पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरडेवाडी येथे गुरुवारी रात्री १२ वाजे दरम्यान फिर्यादीचे कांदे घेऊन जाण्यासाठी टेम्पो आला होता. तो … Read more

ऊस जळून दीड लाखांचे नुकसान.

नगर :- तालुक्यातील हिवरे झरे येथील शेतकरी अशोक नाथा खेंगट यांचा गट नंबर ३२० मध्ये एक एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. गुरुवारी (१७ जानेवारी) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या शेतावरून गेलेली विद्युतवाहिनी तुटून उसाच्या शेतात पडल्याने हा ऊस जळून खाक झाला. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर … Read more

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

कर्जत :- तालुक्यातील रवळगाव येथे तीन वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. हा प्रकार दि.१७ रोजी सायं. साडेसहाच्या सुमारास घडला. याबाबतची माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे दि.१७ जाने रोजी सायं साडेसहाच्या दरम्यान गावात असलेल्या एका किराणा दुकानाज़वळील रस्त्याच्या कडेला असलेल्या पडक्या … Read more

लोकसभेसाठी भाजपकडून आ.शिवाजी कर्डिलेंचे नाव चर्चेत.

पाथर्डी :- नगर दक्षिण लोकसभा निवडणूक काही महिन्यावंर येऊन ठेपली असल्याने भाजपाकडून नेमके कोणाला निवडणूक रिंगणात उतरवले जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. राहुरी- नगर -पाथर्डीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडून पुढे येऊ लागल्याने मतदारसंघात आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. नगर दक्षिणमधून जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे हे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी … Read more

पत्नीला जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

राहुरी :- पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन जिवे ठार मारल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी आरोपी अमोल संभाजी शेलार रा. केसापूर, ता- राहुरी,यास दोषी धरून जन्मठेप व ६,५००रू.दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील केसापूर येथे अमोल संभाजी शेलार व त्याची पत्नी जयश्री हे एकत्र राहत होते. … Read more

डॉन बॉस्को शाळेच्या सहल बसला अपघात,दोघांचा मृत्यू

अहमदनगर :- सावेडी परिसरातील डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणार्‍या खाजगी ट्रॅव्हल बस व पिकअप व्हॅनचा आळेफाट्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअप चालकाचा होरपळून मृत्यू झाला. तसेच आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. एक शिक्षक अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. 27 मुले जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.ओतुरमधील आळेफाटा पासून दहा किलोमीटर … Read more