विहिरीत पडून दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू

पाथर्डी :- तालुक्यातील तिसगाव परिसरातील तुकाराम नामदेव कर्पे यांच्या विहिरीत पडून दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय यांनी गुरूवारी दिली.पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या रात्री या विहिरीत पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी माहिती देताच सहायक वनसंरक्षक किशोर सोनवणे, वनपाल महेबूब शेख, वनरक्षक मुबारक शेख , वनकर्मचारी के. बी. वांढेकर, गणेश … Read more

शिवाजीराव नागवडेंच्या जयंतीनिमित्त उद्या अभिवादन सभा.

श्रीगोंदा :- राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीदिनानिमित्त नागवडे कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (१९ जानेवारी) अभिवादन सभा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी गुरुवारी दिली. राज्य साखर संघाचे दिवगंत अध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचा १९ जानेवारी हा जन्मदिवस. त्यांचा वाढदिवस … Read more

दोन अपघातांमध्ये दोन महिला ठार.

शेवगाव :- तालुक्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला जबर जखमी झाली. सकाळच्या दरम्यान गेवराई रस्त्यावर फिरण्यासाठी गेलेल्या हिराबाई सोमनाथ उदावंत (वय ५०) व सरला शेषराव औटी (वय५५)) यांना अज्ञात वाहनाची पाठीमागून जोराची धडक बसली. त्यात उदावंत यांचा जागीच मृत्यू झाला, तर औटी जबर जखमी झाल्या. त्यांना खासगी रूग्णालयात … Read more

पारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार !

पारेनर :- विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून पारनेर तालुक्‍यात लवकर राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सेनेतून हकालपट्टी झालेले निलेश लंके माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. सुपा येथील सफलता लॉन्समध्ये सोमवारी निलेश लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद गट प्रमुख, गण प्रमुख, शाखा प्रमुखांची गोपणीय बैठक झाली. या … Read more

श्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.

श्रीगोंदे :- तालुक्यातील मढेवडगाव येथे ऊसवाहक ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन मोटर सायकलींची बुधवारी दुपारी धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. नगर-दौंड महामार्गाचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चौरंगेनाथ विठोबा शिर्के (वय ५५, रा. बाबुर्डी, ता. श्रीगोंदा), त्यांची मुलगी कल्पना संतोष कदम (वय ३०, रा. पिंपळगाव पिसा, … Read more

खा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची लायकीच नाही !

अहमदनगर :- डॉ. सुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खासदार दिलीप गांधी समाजकारण, राजकारण करत आहेत. खासदार दिलीप गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची पात्रताच नसून आमच्या नादाला लागायचे नाही, नाद केलाच तर तो महागात पडेल.असा हल्लाबोल नरेंद्र मोदी आर्मीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पोटघन यांनी केला आहे. डॉ. सुजय विखे हे नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक … Read more

नगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.

मिरजगाव :- नगर-सोलापूर रस्त्यावर मांदळी शिवारात झालेल्या अपघातात दोन ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले. जुन्या शिवानी हाॅटेलसमोर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास मालवाहू ट्रेलर व महिंद्रा टीयुव्हीची धडक झाली. कर्नाटक राज्यातील बाकुट जिल्ह्य़ातील हे भाविक शिर्डीकडे देवदर्शनासाठी निघाले होते. नगरकडून आलेला राजस्थान पासिंगचा ट्रेलर व कर्नाटक पासिंगची महिंद्रा टीयुव्हीची समोरासमोर धडक झाली. संक्रांतीच्या दिवशीच काळाने … Read more

जामखेड मध्ये अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार

जामखेड :- मधील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून बालाजी अंबादास डाडर (४० वर्षे) याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि. १२ रोजी मुलीचे वडील जामखेडला व आई वीटभट्टीवर कामाला गेले होते. सायंकाळी या नराधमाने मुलीला आपल्या घरी बोलवत मारहाण करुन बलत्कार केला. दुसऱ्या दिवशी … Read more

खा.दिलीप गांधींची सटकली,शेतकऱ्यास भर सभेत दमबाजी !

अहमदनगर :- महागाई वाढल्याबाबत प्रश्न विचारल्यामुळे भाजप खासदार दिलीप गांधी वृद्ध व्यक्तीवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुरी तालुक्यातील केंदळ येथे एक भूमीपूजन समारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. गावातील एका मंदिराजवळ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.खा. दिलीप गांधी यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी केंद्राच्या विविध योजना … Read more

शेतकऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला.

पारनेर :- तालुक्यातील करंदी येथे रावजी कारभारी चौधरी (वय ५१) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात सोमवारी दुपारी संशयास्पद स्थितीत आढळला असून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. ते सकाळी त्यांच्या वस्तीमागील शेरी येथे लसूण व कांद्यास पाणी देण्यासाठी गेले होते. थोडेच पीक असल्याने ते बराच वेळ का थांबले, म्हणून त्यांची पत्नी दुपारी साडेतीनच्या सुमारास … Read more

संत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये सूरु असलेल्या संत भगवानबाबा यांच्या मूर्तीच्या काही भागांची अज्ञात इसमाने स्टुडिओ तुन बाहेर शेतात आणून जाळल्याची घटना घडली होती. यासंदर्भात शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती त्या अनुषंगाने पारनेर पोलिसांनी या जागेचा मालक असलेला स्वप्निल सुरेश शिंदे, वय ३५ … Read more

संक्रातीला ठरणार नगर लोकसभेचा उमेदवार.

अहमदनगर :- नगर लोकसभेचा उमेदवार फायनल करण्यासाठी आता १५ जानेवारीचा मुहूर्त मिळाला आहे,उद्या १५ जानेवारीला दिल्लीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या दोन्ही काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. नंदुरबार, नगर, औरंगाबाद या तीन जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरु असून चर्चेच्या … Read more

लोकसभा मतदारसंघातील २५ रस्त्यांसाठी ५३ कोटींचा निधी : खा. गांधी

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघातील वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्याबाबत पाठपुरावा केल्यामुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण ८०.३२ किमीच्या एकूण २५ रस्त्यांच्या कामासाठी ५३ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली. ग्रामीण भागातील या प्रलंबित रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी नागरिकांची … Read more

वाळूच्या डंपरने चिरडले,तिघांचा मृत्यू.

पारनेर :- तालुक्यातील खडकवाडीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने मायलेकासह तिघांना जोरदार धडक दिली. यात तिघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकारामुळे वाळू तस्करांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. डम्परने चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू एमएच 16 वाय 1914 या क्रमांकाच्या मोटारसायकल वरून जात असलेल्या … Read more

कर्जत जामखेड मधून रोहित पवार निवडणूक लढवणार ?

जामखेड :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात आता खासदार शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी कर्जत – जामखेडच्या दौर्यात केले आहेत. पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करत असलेले पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे जामखेड तालुक्‍यातील चोंडी दौऱ्यावर आले होते. कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवाल का असे … Read more

शेतातील विद्युत तारेचा झटका बसून तरुणाचा मृत्यू.

अहमदनगर :- नगर तालुक्यातील नांदगाव येथे एका शेतातील विद्युत तारेचा झटका बसून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शिवाजी वसंत जगधने (वय ३१ रा. पिंप्री अवघड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. विद्युत प्रवाहाचा झटका बसून मृत्यू याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नांदगाव येथील … Read more

शुल्लक कारणातून राडा,माजी उपसरपंचाला मारहाण.

शेवगाव :- तालुक्यातील माजी उपसरपंच रवींद्र माणिक घायतडक यांना धारदार शस्त्राने भोसकून जखमी करण्यात आले. ही घटना राक्षी येथील सुमनताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निकच्या आवारात बुधवारी घडली आहे.  पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.अनिल गंगाधर गर्जे, महेश बंडू गर्जे, ऋषिकेश भारत गर्जे, ऋषिकेश नानासाहेब गर्जे, सचिन बारगजे व एक व्यक्ती अशा … Read more

जनतेच्या आशीर्वादाने मी नक्की खासदार होईन – सुजय विखे.

राहुरी :- लोकसंपर्क असल्याशिवाय कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही. लोकसभा निवडणूक लढवायचीच हा माझा निर्णय पक्का असून त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून माझी तयारी सुरू आहे. मतदारसंघातील बहुतांशी जनतेने खासदार कोण हे निवडणुकीनंतर बघितलेले नाही, हे दुर्दैव आहे. जनतेच्या आशीर्वादाने मी नक्की खासदार होईन. काही राजकारण्यांना मी नको आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने मी … Read more