लंके प्रतिष्ठानच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे

Nilesh Lanke

पारनेर :- शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके प्रतिष्ठानचा राज्य पातळीवर विस्तार करण्यात आला असून प्रदेशाध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, राहुल झावरे सचिव, तर दादा शिंदे यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा नीलेश लंके यांनी बुधवारी केली आहे. …लंके यांच्या समाजभिमुख कार्यावर तरुणाई प्रभावित. संघटना उभारणीसंदर्भात माहिती देताना सचिव अँड.राहुल झावरे यांनी … Read more

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक २०१९

प्रभाग क्र. उमेदवाराचे नाव उमेदवाराचे नाव पक्ष अध्यक्ष सौ. शुभांगी मनोहर पोटे सौ. रुख्मिणी विनोद पोटे कॉंग्रेस १ अ सौ. संगीता सतीष मखरे श्री. राजू बाळासाहेब लोखंडे राष्ट्रवादी कॉंग्रेस १ ब श्री. पांडुरंग कैलास पोटे सौ. शालिनी कालीचरण मखरे राष्ट्रवादी कॉंग्रेस २ अ सौ. साधना भानुदास राऊत सौ. गौरी गणेश भोस कॉंग्रेस २ ब श्री. … Read more

पारनेर तालुक्यातील युवकाची आत्महत्या.

पारनेर :- तालुक्यातील वडगाव सावताळ येथील किरण छबन निवडुंगे (वय २१) या युवकाने आपल्या राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ३ रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास घडली. 

Read more

मतदारसंघात सव्वा कोटीची कामे पूर्ण : आ.मोनिका राजळे.

पाथर्डी :- विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. शेवगाव व पाथर्डी मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी विविध गावांत मिळून सव्वा कोटीची कामे पूर्ण झाली. सर्वांचे योगदान लाभल्यास कामाची गती वाढण्यास मदत होते, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. कसबा भागातील मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी अल्पसंख्याक निधीतून दहा लाख खर्चाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी राजळे बोलत होत्या.

नगर-मनमाड मार्गावर बैलगाडीला भरधाव कारची धडक.

राहुरी :- डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला स्विफ्ट कारची धडक बसल्याने ऊसतोड मजूर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. जखमींना प्रवरानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगर-मनमाड मार्गावरील जोगेश्वरी आखाडा परिसरात बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला. अपघातात कारचा झाला चक्काचूर… शिवाजी किसवे व त्यांची पत्नी राधाबाई (टाकळीमानूर, तालुका पाथर्डी) हे उसाची वाहतूक करणारे … Read more

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास सक्तमजुरी.

अहमदनगर :- ऑगस्ट २०१७ मध्ये कुरणदरा (ता. राहुरी) येथे पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.  गोपीनाथ नाथू केदार (३८, कुरंदरा शेरी चिखलठाण, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी गुरुवारी दुपारी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे … Read more