धनंजय मुंडे अहमदनगर जिल्ह्यात येताच झाले असे स्वागत !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल रात्री शनी शिंगणापुरच्या मंदीरात शनी देवाचा अभिषेक केला. करुणा शर्मा यांच्यासोबतचा लिव्ह इनचा वाद परस्पर सहमतीनं मिटवण्यासाठी एका मध्यस्थाची नेमणूक करण्यात आली आहे. तो वाद मिटेल अशी आशा केली जात असतानाच धनंजय मुंडे आज शनी शिंगणापुरात पोहोचले. शिंगणापुरात शनी देवाला अभिषेक केल्यानंतर … Read more

पण तसा निर्णय अण्णा कधीच घेणार नाहीत!

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-आमच्या सारख्यांना संघटनेला विचारात घेऊनच उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो.त्यामुळे अण्णांनी देखील चर्चा करूनच उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला असेल, पण आंदोलनाला धक्का बसेल असा निर्णय अण्णां कधीच घेणार नाहीत, असा मला विश्वास आहे, असे जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. अण्णा हजारे यांनी काल … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले फक्त एवढे कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७ ने … Read more

शिवसेनेचे मंत्री घरी पाठवले विसरले काय ? अण्णा हजारे गरजले!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-समाज्याच्या प्रश्नासाठी जगत असून ज्या वेळी  समाजात अन्याय, अत्याचार होतो;  त्या वेळी त्या विरोधात समाज, राज्य व राष्ट्र हितासाठी मी आंदोलने करत आलोय. पक्ष, पाट्या मी कधी पाहत नाही. तुमच्या काळात तुमच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत होतात तेव्हाही मी आंदोलने केले. त्यावेळी तुमचे मंत्री घरी गेले ना, … Read more

अजित पवार म्हणाले नाही तर माझाच मामा व्हायचा…

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-आज अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून राहुरीतील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं.यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले. … Read more

महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह हुतात्मा दिनी केंद्रातील भाजप सरकारचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित्त वाडियापार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनास बदनाम करून आंदोलन दडपून टाकत असल्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. शेतकरी नेत्यांवरील खोटे … Read more

चावट आमदार…विधानपरिषदेत पाहत होते अश्लील व्हिडीओ

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड यांच्यावर विधान परिषदेच्या सभागृहामध्ये पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचा आरोप होत आहे. राठोड हे आपल्या मोबाईलवर स्क्रोल करत असताना त्यांच्या फोनमध्ये अश्लिल व्हिडीओ असल्याचे दृष्य कॅमेरात कैद झाली आहे. राठोड यांनी यासंर्भात प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिले. इंटरनेटवर मी काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ … Read more

आण्णा हजारे म्हणतात ‘विश्वासार्हतेवर परिणाम झाला तरी मला फरक पडत नाही’ !

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनापासून दिल्लीतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी धुमश्चक्री झाल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही केला आहे. दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल … Read more

आदर्श सरपंच रविवारी जामखेडमध्ये

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह आयोजित निवारा महोत्सवाचे रविवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. निवारा बालगृह समता भुमी, मोहा फाटा, बीड रोड, जामखेड येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक डॉ. अरुण जाधव यांनी दिली. यावेळी निर्मलग्राम पाटोदा (जिल्हा औरंगाबाद) चे माजी … Read more

दिलासादायक’ बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. यातच उत्तरेकडील भागांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याने अनेक दिवसांपासून मानवी वस्तीवर हल्ले चढवत अनेकांचे प्राण घेतले आहे तर काहीना गंभीर जखमी केले आहे. दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. … Read more

कोरोनाची लढाई अंतिम टप्प्यात; आता केवळ काही पाऊले दूर

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे काही पाऊले दूर राहिलेला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी 95 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 70 हजार 4 इतकी झाली आहे. … Read more

महावितरणच्या मोहिमे अंतर्गत 22 कोटींची वसुली

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज जोड तोडणी मोहीम हाती घेताच नगर शहरातून 22 कोटी रुपयांचे थकत वीजबिले जमा झाली आहे. महावितरणच्या नगर शहर विभागांर्तगत नगर शहर, पारनेर व नगर तालुका असा भाग आहे. नगर शहरातील वीज ग्राहकांकडे ४२ कोटी, पारनेर 11 कोटी 51 लाख आणि नगर तालुक्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; हॉटेलमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीपमधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात दोन पिडीत परप्रांतीय महिलेची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी एक आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी केली, शुक्रवारी ( दि.२९) रोजी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप … Read more

ब्रेकिंग न्यूज ! अखेर अण्णा हजारेंचे उपोषण मागे

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे 30 जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, आज अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चाैधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली व ही भेट यशस्वी ठरली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९३ ने वाढ … Read more

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन वाढला!!

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. लॉकडाउन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला असून, आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना … Read more

पत्रकार राजदीप सरदेसाईंवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडे चे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्यावर चॅनलने मोठी कारवाई केली आहे. सरदेसाई यांनी प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात खोटी बातमी पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या कारणामुळे त्यांच्यावर कारवाई केली प्रजासत्ताक दिनाला राजदीप सरदेसाई यांनी नवनीत नावाच्या एका आंदोलकाचा फोटो टाकला होता. आणि … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! लोकल सेवा या दिवशी पासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- सर्वसामान्य लोकांसाठी मुंबई लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न लाखो मुंबईकरांना पडला आहे. मात्र नुकतेच मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील लोकल सेवा 01 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. गर्दीच्या वेळा टाळून इतर सर्वांसाठी लोकल प्रवास करता येणार आहे. कोरोनाने राज्यासह देशभरात कहर माजवण्यास सुरुवात केल्यानंतर … Read more