पण तसा निर्णय अण्णा कधीच घेणार नाहीत!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-आमच्या सारख्यांना संघटनेला विचारात घेऊनच उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो.त्यामुळे अण्णांनी देखील चर्चा करूनच उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला असेल, पण आंदोलनाला धक्का बसेल असा निर्णय अण्णां कधीच घेणार नाहीत, असा मला विश्वास आहे,

असे जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. अण्णा हजारे यांनी काल उपोषण करण्याचा निर्णय स्थगित केल्याच्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी मेधा पाटकर म्हणाल्या की, “उद्या केंद्र सरकार मार्फत जे बजेट मांडले जाणार आहे. त्यातून मोदी सरकारची खरी परीक्षा असणार आहे. शेतकर्‍यांच्या दृष्टीने आम्ही निर्णय घेत आहोत अस जर म्हणत असतील.

तर त्यांनी msp च्या नुसार अडीच लाख कोटीचा निधी त्यांना द्यावा लागणार आहे. तसेच स्वामीनाथन आरोग्याच्या शिफारशीवरून हमी भाव (MSP) नाही दिला जात आहे.

त्यामुळे स्वामीनाथन आयोगा नुसार निधी देणार का? हा प्रश्न आमच्या समोर आहे. तसेच ते हमी भाव कायदा आणणारा का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, त्यांनी खूप काही सांगितले होते.

त्यातील एक म्हणजे त्यांनी 15 लाख दिलेत. त्यांनी खूप काही दिले, अशा शब्दात केंद्र सरकारावर त्यांनी निशाणा साधला. त्याच बरोबर देशात ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही.

त्या राज्यांनी कृषी विधेयकास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र केव्हा असा निर्णय घेते याकडे माझ लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment