आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात चोरट्यांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील जामखेड तालुक्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. जामखेड शहरात आज पहाटे चोरट्यांनी तीन दुकाने फोडून चोरी केली. चोरटयांनी दुकानातीलच गोण्यांमध्ये किंमती वस्तू भरून नेल्याचे दिसून येते, असे … Read more

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही … Read more

तुमच्याकडे जमीन आहे ? तर मग होईल ग्यारंटेड कमाई; जाणून घ्या सरकारची नवीन योजना

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्विकारल्यापासून, त्यानंतर त्यांनी ज्या योजनांकडे जास्तीत जास्त लक्ष दिले आहे त्यातील एक सौर उर्जा योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असे उद्दिष्ट आहे की, देशात सौरऊर्जेचा वापर वाढला पाहिजे आणि त्याचा परिणामही दिसून येत आहे आणि सौर उत्पादनांचा बाजार देशात वेगाने वाढत आहे. अशा … Read more

सणासाठी सोन्याची खरेदी करण्याआधी करा ‘हे’ काम ; अन्यथा होईल नुकसान

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- उत्सवाचा हंगाम सुरू झाला आहे. उत्सवात लोक दागिन्यांच्या दुकानातं बघायला मिळतात. प्रत्येक शुभ प्रसंगी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.याशिवाय लग्नात सोन्याचे व्यवहारही झाले आहेत. आज, सोने केवळ परंपरेसाठीच नव्हे तर गुंतवणूकीच्या बाबतीत देखील खरेदी केले जाते. लोकांनी दागदागिने खरेदीचेही नियोजन सुरू केले आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे देखील महत्त्वाचे … Read more

फसवणुकीचा नवा फंडा ; मेसेजद्वारे केले जातेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  सध्याच्या टेक्निकल जमान्यात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. फोन करून एटीएम नंबर विचारून फसवणूक केली जाते. आता फसविण्याचा नवीन फंडा समोर आला आहे. आता मेसेजद्वारे वेगवेगळे प्रलोभने दाखवून लिंक डाउनलोड करण्यास सांगून लुबाडले जात आहे. सध्या लोकांना ‘तुमच्या खात्यावर पेटीएमद्वारे पैसे पाठविले आहेत. ते मिळवण्यासाठी सोबतची लिंक डाऊनलोड … Read more

कोरोना उपचारासाठी अधिक बिल घेणार्‍या हॉस्पिटलकडून पैश्याची परतफेड मिळावी

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  शहरातील खाजगी हॉस्पिटलनी कोरोना वैद्यकिय उपचारासाठी रुग्णाकडून शासकीय दरापेक्षा जास्त बिल आकारले असताना सदर हॉस्पिटलला नोटीस बजावून अधिक रकमेची परतफेड तातडीने करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे, … Read more

गॅलक्सी नॅशनल स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर पालकांची निदर्शने कोरोनाकाळात फक्त ऑलनाईन ट्युशन फी आकारण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद असून, सध्या शाळेच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र शाळेकडून इतर ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली अवाजवी फी ची मागणी केली जात असल्याच्या निषेधार्थ गॅलक्सी नॅशनल स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर पालकांनी निदर्शने केली. तर कोरोनाच्या संकटकाळात ज्या सुविधा शाळेकडून दिल्या जात नाही त्याचे शुल्क न आकारता … Read more

पंचनाम्याचा फार्स टाळून शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- कोरोना टाळेबंदीमुळे उद्भवलेले भीषण संकट आणि त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, अशा गंभीर संकटात शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत तातडीने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पंचनाम्यांचा फार्स टाळून तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व सर्व शेतकरी बांधवांना सरसकट तातडीने भरीव आर्थिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मायलेकींचा विहरीत पडून दुर्देवी मृत्यु   

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे गावातील मायलेकींचा विहरीत पडून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना सकाळी घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंगुसवाडे येथील सुनिता नारायण हिंगे (वय ४२) व मुलगी प्रतिक्षा नारायण हिंगे (वय १४) या मायलेकी सकाळी आठ वाजता शेतात कापुस वेचणीसाठी गेल्या होत्या. मुलगी प्रतिक्षा हिंगे ही शेतातील … Read more

आतापर्यंत ५१ हजार २५०रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७६ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४५६ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७४, … Read more

जिल्हा मुख्यालयात शहीद पोलिसांना मानवंदना

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- पोलीस हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली. शहीद पोलिसांच्या स्मृतींना उजाळा देत हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र वाहण्यात आले. पोलिस सेवेत कर्तव्य बजावत असताना देशातील विविध ठिकाणी वीरगती प्राप्त झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी या शहीदांना मानवंदना देत सलामी … Read more

बालविवाह लावल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- नेवासा तालुक्यातील कौठा (ता.नेवासा) येथील एका अल्पवयीन मुलीचा श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात बालविवाह लावल्याची खळबळजनक घडण उघडकीस आली आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कौठा व औरंगाबाद येथील अठरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, अल्पवयीनमुलीच्या आईने फिर्यादित म्हटले आहे की मी एक … Read more

‘पिचड साहेब तुम्ही फक्त खुर्चीवर बसा अन आशीर्वाद द्या, आम्ही आंदोलन करतो’

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर बसा व आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही आंदोलन करतो अशी भूमिका पुणे जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जुन्नर तालुक्यात आलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या संकटात आदिवासी उध्वस्त होणार असून, धनगर आरक्षण देताना आदिवासींच्या हक्काला बाधा आणू नये, खावटी अनुदान मिळावे, तर आदिवासी धरणग्रस्तांच्या … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या फेर परीक्षेचे (पुरवणी परीक्षा) वेळापत्रक राज्य मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची आणि दहावीची फेरपरीक्षा एकाच दिवशी दि. २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा १८ नोव्हेंबर ५ डिसेंबर या … Read more

धक्कादायक : जमिनीच्या घरगुती वादातून गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात जमिनीच्या वादातून दिनकर यादव वर्पे (५५) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी आश्वी बुद्रूक येथे घडली. त्यांच्या खिशात दोन चिठ्ठ्या सापडल्या. नऊ जणांवर आश्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ जणांना अटक केली. गोरख वर्पे यांची १५ गुंठे जमीन व घर दिनकर वर्पे यांनी २०१७ … Read more

माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील उद्योजक व माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांना अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात ताबडतोब अटक करा, त्यांची पत्नी जि. प. सदस्य सुषमा दराडे यांना सहआरोपी करा, या मागणीसाठी मंगळवारी अकोल्यात आदिवासी समाजाने मोर्चा काढला. शेणीत येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव आनंदा डामसे यांनी १५ आॅक्टोबरला दराडे यांच्याविरोधात तक्रार … Read more

राहुल द्विवेदी म्हणाले ‘ते’ केलेले काम कायम लक्षात राहील…

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- महामारी शंभर वर्षांतून कधीतरी येते. अशा कठीण काळात मला जिल्ह्यात काम करत आले. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील, अशी भावना मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. द्विवेदी म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित होता. तो काही प्रमाणात मार्गी लावण्यात यश आले. गेल्यावर्षी काही तालुक्यांत गंभीर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : निघोज कुंडावरून रिक्षा चालक बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- मुसळधार पावसामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने कुकडी नदीला आलेल्या पुरामध्ये मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इसाक रहेमान तांबोळी (वय ३५, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) हा रिक्षाचालक बेपत्ता झाला आहेे. रांजणगांव गणपती येथील उषा सुरेश जगदाळे यांच्यासह तिन महिला तालुक्यातील जवळे येथे इसाक तांबोळी याची रिक्षा घेउन … Read more