अहमदनगर ब्रेकिंग : साईकृपा साखर कारखान्याला भीषण आग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील मा.मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या साईकृपा शुगर अॕन्ड अलाईड इन्डस्ट्रिज लि.या साखर कारखान्याला आज दि.१७ रोजी सायंकाळी भिषण आग लागली आहे. या आगीमध्ये अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. तात्काळ कारखान्यात अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. … Read more

कर्जत-जामखेड एक ‘ब्रँड’ करण्याचा प्रयत्न : आमदार रोहित पवार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- परदेशात फिरत असताना पर्यटनविकास आणि त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेला होणारा फायदा ठळकपणे समोर आला. महाराष्ट्रात अनेक किल्ले, मंदिरे, अभयारण्ये आहेत. त्यामुळे पर्यटनाकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पहावे, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कर्जत-जामखेडचा विकास करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या … Read more

सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची घोषणा तातडीने करावी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- जरी सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले तरी हे पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने काही ठोस निर्णय घेतलेला नाही.महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने अधिकृत घोषणा तातडीने करतानाच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये या पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सध्याच्या सरकारने तातडीने केली … Read more

अकोल्याच्या विकासासाठी संगमनेर जिल्हा करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अकोले : आदिवासी अकोले तालुक्याच्या विकासासाठी संगमनेर जिल्हा करा, अशी मागणी संगमनेर जिल्हा व अकोले आदिवासी विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सतिष भांगरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, निव्वळ आदिवासी भागात छोट्या मोठ्या धरणात २०.७६ टिएमसी पाणी साठले जाते. त्याबळावर अकोले तालुक्यातील ९१ … Read more

हर्षवर्धन सदगीरची कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद- ना. थोरात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अकोले तालुक्यातील कोंभाळणेसारख्या छोट्याशा गावातून जिद्द व मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र केसरी मिळविलेला हर्षवर्धन सदगीरची कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. यशोधन संपर्क कार्यालयात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी सत्कार केला. यावेळी माजी आ. राहुल जगताप, माजी … Read more

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला तर….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा अखिल भारतीय वारकरी मंडळ, भाजप अध्यात्मिक आघाडी व धार्मिक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. संगमनेर, अकोले, राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांनी इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. इंदोरीकर महाराज यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यास … Read more

भाजप युवा मोर्चच्या शहराध्यक्षाचा काँग्रेस मध्ये प्रवेश

अहमदनगर : शहर भाजप युवा मोर्चाचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष श्री. अज्जुभाई शेख यांनी मा. नामदार श्री बाळासाहेब थोरात यांचे उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. भाजपा सरकार CAA, NRC कायद्या आणून अल्पसंख्याक समाजाविषयी तेढ निर्माण करीत आहे. केंद्रातील भाजपाच्या या भुमिकेला विरोध म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस मध्ये प्रवेश केला. काँग्रेस … Read more

शहरात बिबट्याचा मुक्‍त संचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. राहुरी शहरातील डुबीचा मळा परिसरातील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्या घराजवळ गुरुवारी पहाटे चार वाजेदरम्यान एक बिबट्या मुक्तसंचार … Read more

नामदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्रात आणि स्वताचेच गाव गेले विरोधात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- भाजप सरकारने जनतेतून सरपंच निवड करण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावातूनच विरोध करण्यात आला आहे. जोर्वे गावातील ग्रामसभेत या निर्णयाला … Read more

कुत्र्याच्या तोंडात आढळले मृत अर्भक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- निमगाव जाळी येथील उसाच्या शेतातून कुत्रे तोंडात मृत अर्भक घेऊन जात असल्याचे आढळले. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. हे अर्भक पुरुष जातीचे आहे. लोकांनी आरडाओरडा केल्यावर कुत्रे अर्भक सोडून पळून गेले. पोलिस पाटील दिलीप डेंगळे यांनी पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना या घटनेची माहिती दिली. This Story … Read more

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्ता निवृत्ती शेलार या युवकावर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शेलार याने या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने मोठ्याने आरडाओरड केला. तिच्या आईने तो एकून तिकडे धाव घेतली. … Read more

हळदही रुसली आणि कुंकूही हिरमुसले… लग्नाआधीच झाले असे काही कि लाखो रुपये गेले वाया !

16 वर्षांच्या मुलीचे लग्न ठरवण्यात आले होते. सर्व तयारी जोरदार झाली होती. वर्‍हाडी मंडळी जमा होत होती. लग्नघटीका जवळ येत होती. तोच चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते नी पोलीस तेथे आले आणि त्यांनी नवरी मुलीचे वय कमी असल्याने हा विवाह रोखला. याबाबत कुटुंबाकडे विचारणा केली असता हे लग्न रद्द केल्याचे त्यांनी पोलिसांना लिहून दिले. पारनेर तालुक्यातील एका … Read more

शिवभोजन थाळीबद्दल आनंदाची बातमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर केलेल्या पाचही केंद्रांत ७०० थाळीचे शिवभोजन सुरू आहे. दरम्यान अनेक गरजूंना थाळी संख्या पूर्ण झाल्याने माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी द्विवेदी आणखी ५ केंद्रांना मंजुरी दिली आहे. या बाबतचा अहवाल प्रशासनाकडून सरकारकडे रवाना करण्यात आला … Read more

महिलेला ट्रकने चिरडले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  दौंड महामार्गावरील अरणगाव बायपासजवळ अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने एका वृद्ध महिलेला चिरडले आहे. यामध्ये इंदुबाई सखाराम शिंदे (वय 70) ही महिला जागीच ठार झाली आहे. आरणगाव जवळील बायपास चौकातील नाटवस्ती नजीक हा अपघात पहाटे साडेसहा वाजता झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. अरणगाव परिसरात गेल्या दीड … Read more

पहा IPL 2020 चं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2020, मुंबई : आयपीएलचा पहिला सामना 29 मार्चला होणार आहे. तर 24 मे रोजी शेवटचा सामना होणार आहे. पहिल्या सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रंगणार आहे. IPL 2020 चं शेड्यूल मार्च 29 मुंबई विरुद्ध चेन्नई रात्री 8 वाजता मुंबई मार्च 30 दिल्ली विरुद्ध पंजाब रात्री 8 वाजता दिल्ली मार्च 31 बंगळुरु विरुद्ध कोलकाता रात्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वयोवृद्ध आजीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- आज सकाळी रस्ता ओलांडत असताना एका वयोवृद्ध आजीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केडगाव बायपास जवळ रस्ता ओलांडत असताना इंदुबाई सखाराम शिंदे (वय70 रा. सोनेवाडी, अरणगाव) यांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याचे पो. ना. अशोक यांनी … Read more

बसमध्ये मृत पावलेल्या वयोवृध्द व्यक्तीचा बेवारस मृतदेह टाकून बसचे चालक -वाहक पळाले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर  :- तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर आगारातील एसटी बसमध्ये मृत पावलेल्या अनोळखी वयोवृध्द नागरिकास येथील बस स्थानकावर बेवारस टाकून चालक व वाहक निघून गेल्याने माणुसकी हरवल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर आगाराची श्रीरामपूर-आश्वी ही एसटी आली होती. यावेळी वाहकाला या … Read more

राज ठाकरे यांचा अहमदनगर मध्ये काळ्या रश्शाच्या मटणावर मनसोक्त ताव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना त्यांनी केडगावमध्ये एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबून काळ्या रश्शावर मनसोक्त ताव मारला. केडगाव येथील ते हॉटेल काळ्या रश्शासाठी प्रसिध्द असून या ठिकाणी ताव मारण्याची खूप दिवसांची इच्छा होती, ती पूर्ण झाल्याची भावना ठाकरे यांनी जेवणानंतर व्यक्त केली. राज ठाकरे शनिवारी … Read more