शहरात बिबट्याचा मुक्‍त संचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.

राहुरी शहरातील डुबीचा मळा परिसरातील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्या घराजवळ गुरुवारी पहाटे चार वाजेदरम्यान एक बिबट्या मुक्तसंचार करीत असल्याचे मंदाताई साठे यांच्या घरासमोरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दिसून आला.

यावेळी परिसरातील मोकाट कुत्रे जोर जोरात भुंकत होती. कुत्र्यांचा आवाज ऐकून मंदाताई साठे या घराबाहेर आल्या. यावेळी त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्या घरात पळून गेल्या आणि दरवाजा बंद करून घेतला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी राजेंद्र बोरकर यांना फोन करून बिबट्याची माहिती दिली.

बोरकर यांनी काही मित्रांना बरोबर घेऊन परिसरात पाहणी केली. मात्र बिबट्या दिसून आला नाही. यावेळी बोरकर यांनी साठे यांच्या घरासमोरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यात बिबट्या दिसून आला.

वन्यप्राणी जंगल सोडून मानवीवस्तीत शिरल्याने वनखात्याने तातडीने येथे पिंजरा बसवून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी राजेंद्र बोरकर, जावेद आतार, दिनेश कल्हापुरे, पप्पू कोरडे, शिवाजी काकुळदे, अन्वर आतार, अंकुश कोरडे, सागर खरात यांनी वनविभाग अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment