Live Updates : शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील 87054 मताधिक्याने विजयी

1.40 :- शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील 87054 मताधिक्याने विजयी राधाकृष्ण विखे सातव्यांदा आमदार झाले !शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांचा विखे यांनी पराभव केला. राधाकृष्ण विखे यांना ९६ हजार ९९५ मते मिळाली तर सुरेश थोरात यांना २८ हजार मते मिळाली. १ लाख ६९ हजार एवढे … Read more

Live Updates : राहुरीत प्राजक्त तनपुरे विजयी !

राहुरीत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे 22 हजार मतांनी विजयी झाले असून भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डीले यांचा पराभव झाला असून आमदार शिवाजी कर्डिले ह्यांची सत्ता या निकालामुळे संपुष्टात आली आहे. 2.33 :- राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत विजय मिळविला. 2.31 ;- 21 व्या फेरी अखेर प्राजक्त तनपुरे … Read more

टाइगर अभी ज़िंदा है !

मुंबई :- विधानसभा निवडणूक निकाल अखेर आज जाहीर झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीनं जोरदार पुनरागमन केलं आहे. भाजपला ‘महाजनादेश’ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात सभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर शरद पवार भारी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियातही याचं प्रतिबिंब उमटू लागलं असून शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.पवारांच्या या पॉवरचं सोशल मीडियावर … Read more

साताऱ्याला जाऊन जनतेचे आभार मानणार !

साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. पण सातारच्या छत्रपतींच्या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. साताऱ्याला जाऊन विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांची भेट घेणार आहे. तसंच तिथल्या जनतेचा आभार मानण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्याच साताऱ्याला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, असं पवार म्हणाले. साताऱ्याच्या सभेत ५० हजारांवर लोक आले होते. त्यांना निराश करणं योग्य नव्हतं. यामुळे पाच मिनिटं … Read more

Live Updates : लंके, पवार, तनपुरे, गडाख, कानडे, थोरात, विखे विजयी होणार !

11.39 :- जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डीचा अपवाद वगळता अन्य दहाही विधानसभा मतदारसंघात धक्कादायक असे निकाल लागण्याच्या मार्गावर आहेत. संगमनेरमधून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व शिर्डीतून भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाल्यात जमा आहेत. दुसरीकडे पारनेरमधून राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी सेनेचे विजय औटी यांच्या विरोधात तगडी आघाडी घेतली आहे. लंके यांची ही आघाडी आता त्यांना निर्णायक विजय … Read more

जितेंद्र आव्हाडांसारखा भाऊ कोणत्याच बहिणीला नको!

मुंबई  – जितेंद्र आव्हाडांसारखा भाऊ नको असं म्हणत शिवसेनेच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील उमेदवार दिपाली सय्यद यांनी आव्हाडांवर निशाणा साधाला आहे.  तसेच जितेंद्र आव्हाडांविरोधात आपण कमीत कमी 20 हजार मतांनी निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी,  जितेंद्र आव्हाडांनी प्रचारादरम्यान दिपाली सय्यद यांचा माहेरवाशीण असा उल्लेख केला होता.  जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाकांकडे लक्ष दिलं नाही. कारण मी माझ्या … Read more

पोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू

देशात आर्थिक मंदीचं सावट असताना तसंच ऑटो सेक्टरसह वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांना नोकऱ्या गमाविण्याची वेळ आलेली असताना देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील पोस्ट खात्यात (डाक सेवा) ५ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांना ही नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे.  आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यात ही … Read more

दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं. १८ फेब्रुवारी २०२० पासून बारावीच्या तर ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानंं  http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरवेळापत्रक उपलब्ध करून दिलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १८ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान बारावीच्या … Read more

वजन घटवायचं असेल तर आहार आणि व्यायामातील हा फरक जाणून घ्या…

ब्रिटनमध्ये हल्लीच झालेल्या एका ताज्या अध्ययनात असे आढळून आले की, न्याहारीच्या आधी व्यायाम केल्याने आरोग्याला जास्त लाभ होऊ शकतो. जेवण व व्यायामाच्या वेळेत बदल केल्याने रक्तातील साखर योग्यप्रकारे नियंत्रित केले जाऊ शकतात. त्यामुळे वजन घटविण्यात मदत मिळू शकते. ब्रिटनमधील बाथ युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ झेवियर गोंजालेज यांनी सांगितले की, न्याहारीआधी व्यायाम करणाऱ्यांमध्ये चरबी दुप्पट वेगाने नष्ट होते. … Read more

सकाळच्या चहाने मेंदूचे आरोग्य सुधारू शकते का?

सकाळी सकाळी चहाचे घोट घेण्याचा आनंद वेगळाच असतो. आपल्या देशात तर अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाचा घोट घेतल्याशिवाय होतच नाही.  चहा पिल्याने थकवा, मरगळ दूर होते, हे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. मात्र आता एका ताज्या अध्ययनातून चहाशौकिनांना मोठा दिलासा देणारी बाब समोर आली आहे.  या अध्ययनानुसार, चहा पिल्याने तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर कुशलता … Read more

मतमोजणी ठिकाणी नेटवर्क जामर बसवावेत

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२१) मतदान प्रक्रिया पार पडली आहे.दि.२४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. या दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मशिन स्ट्राँगरुम व मतमोजणी ठिकाणी नेटवर्क जामर बसविण्यात यावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ.अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते व बाळासाहेब जगताप यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.  … Read more

या मतदारसंघात उमेदवार प्रतिनिधीविनाच मतपेट्या सील…

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांचे प्रतिनिधी हजर नसताना नगर शहर मतदारसंघातील मतपेट्या व स्ट्राँगरुम सील केले. त्यामुळे याबाबत प्रशासनाने योग्य तो खुलासा करावा.अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे प्रतिनिधी गिरीष जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात जाधव यांनी नगर शहर मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले आहे. त्यात … Read more

जिल्ह्यात चित्रा नक्षत्रांच्या सरी,रब्बीला दिलासा, शेतकरी खुश

अहमदनगर : सोमवारी लोकशाहीच्या उत्सावातील मतदान संपन्न होत आल्यानंतर जिल्ह्याच्या शिवारात चित्रा नक्षत्रांच्या सरींनी बरसातीचा उत्सव साजरा केला. अंतिम चरणातील चित्रांच्या सरींनी सोमवारी सर्वदूर हजेरी लावली.  ९७ पैकी ८० महसूल मंडलांत हजेरी लागतानाच कोळगाव व पारनेर या दोन ठिकाणी अतिवृष्टी झाली. बाकी उर्वरित १७ मंडलांत पावसाचे खाते निरंक राहिले. रब्बी हंगामासाठी चित्रांच्या सरींनी दिलासा दिला. … Read more

नेवाशात ‘जयहरी’ का ‘जय क्रांतिकारी’?

नेवासा – संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या नेवासा विधानसभा मतदार संघात मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला देणार धक्का? असा सवाल मतदार संघात उपस्थित केला जात असून उद्या नेवासा मतदार संघात ‘जयहरि’ का ‘जय क्रांतिकारी’ चा जयघोष होतो याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.  नेवाशात दोन्ही उमेदवारांनी अटीतटीने निवडणूक लढवली. त्यामुळे गडाख – मुरकुटे समर्थकांकडून विजयाचा दावा … Read more

श्रीरामपुरात कांबळे की कानडे? उत्सुकता शिगेला…

श्रीरामपूर – श्रीरामपूर मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे त्यांच्या विरोधात कांग्रेसचे उमेदवार साहित्यिक लहू कानडे यांनी कडवी झुंज दिली आहे. कांबळेंच्या पाठिशी गृहनिर्माण मंत्री ना. विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे सभापती दीपक पटारे, भाजपाचे प्रकाश चित्ते आदींच्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. शिवाय २२ नगरसेवकांचा फौजफाटा होता.  दुसऱ्या बाजूला कॉग्रेसचे लहू कानडे यांच्या मागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

जिल्ह्यात युतीचे पारडे जड?

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर शिवसेना – भाजप महायुतीचे पारडे जड दिसून येत आहे. नगर जिल्ह्यामध्ये विद्यमान ११ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेने चार, भाजपने आठ, काँग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादीने आठ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.  श्रीगोंद्यामध्ये राहुल जगताप यांनी निवडणूक न लविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप युतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना … Read more

राहुरीत आ.कर्डिलेंना धाकधूक, तर तनपुरेंना उत्सुकता

राहुरी – निवडणुकीच्या सुरुवातीला आ. कर्डिले यांनी आपण १ लाख मताधिक्क्याने निवडून येवू, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. मात्र निवडणुकीदरम्यान राहुरी तालुक्याच्या मतदारांमध्ये झालेली एकी, पाथर्डी – नगर भागात गेल्या दोन निवडणुकीपेक्षा तनपुरेंची सुधारलेली परिस्थिती पहाता उद्याच्या निकालाची तनपुरे गटाला उत्सुकता आहे.  तर आ. कर्डिले गटाला धाकधूक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या प्रारंभी कर्डिले … Read more

भारत-पाक सीमेवर शत्रूशी दोन हात करताना अहमदनगरचा जवान शहीद

अहमदनगर :- भारत – पाक सिमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे.  कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती.  लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच … Read more