किरकोळ वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-कचरा टाकण्याच्या कारणातून झालेल्या वादात एकानं दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तोफखाना परिसरात सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडलीया जीवघेण्या हल्ल्यात महेमुद अब्दुलगनी शेख यांच्यासह सैफ महेमुद शेख, इर्शाद शेख जखमी झाले आहेत. दरम्यान फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार हल्ला करणारे फैयाज अब्दुल कादर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरचे घर फोडले अमेरिकन डॉलर्ससह साडेआठ तोळे सोने व रोख रक्कम लंपास !p

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दि. १९ जानेवारी रोजी मंगळवारी गावच्या मध्यवस्तीत पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारतीचा लोखंडी दरवाजा तोडून ५०० परकीय डॉलर चलन, साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व ८० हजार रुपये रोख लंपास केले असून सदरील घटनेतील चोरटे सी सी टीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे. याबाबत … Read more

गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीकडून एकावर तलवारीने वार

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे गुन्हेगार अमोल कर्डीले याने जयवंत मंजाबा नरवडे (वय ५५ रा. कुरुंद) यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात नरवडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात … Read more

विजयाचा गुलाल पडला महागात; पोलिसांनी दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात मोठ्या उत्साहात निवडणुका पार पडल्या. तसेच या निवडणुकांमध्ये अनेकांचा विजय झाला तर काहींना पराभवाची धूळ चाखावी लागली. निवडणुकीतील विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देखील विजयी गुलालाची उधळण केली व आपला आनंद साजरा केला. मात्र हाच गुलाल त्यांच्या चांगलाच अंगलट आला. राहुरी तालुक्यातील गणेगांव येथे विजयी मिरवणुकीत जेसीबी वरून गुलालाची … Read more

निवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा…

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जामखेडमधील दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आरोपीने ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. विजय उर्फ काकासाहेब बबन गर्जे असे त्या उमेदवाराचे नाव आहे. २०१८ मध्ये जामखेडमध्ये झालेल्या राळेभात बंधूंच्या खून प्रकरणात गर्जे सध्या तुरुंगात आहे. जामखेड तालुक्यातील नाहुली ग्रामपंचायतीत गर्जे विजयी झाला आहे. जामखेड शहरात एप्रिल २०१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

हॉटेल व्यावसायिकाचे घर फोडून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- ऐन निवडणुकीच्या धामधुमीत चोरट्यांनी देखील आपला हात साफ करण्याचा सपाटाच लावल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात पहावयास मिळत आहे. पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील हॉटेल व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर … Read more

धक्कादायक: मतदान न केल्याने चक्क डोक्यात घातला दगड

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याने तु आमच्या जागेत लावलेली टपरी काढून टाक अन्यथा तुला जीवे मारू अशी धमकी देत. डोक्यात दगड घालून काठीने जबर मारहाण केल्याने चौघेजण जखमी झालेत ही घटना पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तु आम्हाला … Read more

पराभव झाल्याने तुफान राडा; तिघेजण जखमी या आमदाराच्या तालुक्यात घडला प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पराभव झाल्याने वाद झाला. यात १० ते १२ जणांनी केलेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे मतमोजणीच्या दिवशीच म्हणजे दि.१८ रोजी दुपारी २ वाजता समाजमंदिरासमोरील चौकात घडली. या  मारहाणीत शिवाजी विलास काळे, ऋषिकेश मधुकर काळे … Read more

अहमदनगर मध्ये भंगारच्या दुकानामध्ये खून, आराेपीस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- स्वयंपाक करत नाही, याचा राग आल्याने एकाचा खून करण्यात आला. केडगाव बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळील लक्ष्मी स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकानात ही घटना घडली. पाेलिसांनी एकाला अटक केली. महेश शिवराम निसाद (२९, चिल्ला, उत्तर प्रदेश) असे आराेपीचे नाव आहे. बाबदिन झंडू निसाद (३९, चिल्ला, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव … Read more

बंद घर फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- बंद असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून गुपचूप प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५६ हजारंचा मुद्देमाल चोरल्याची घटना सुपा येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सुपा येथील सुपा हाईट्स या अपार्टमेंटमधील आदेश दीफ्क बिंगले रा. आकुर्डी पुणे हल्ली रा. सुपा … Read more

महिला प्रवाशाची छेडछाड करणाऱ्या वाहकाला दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-  महिला सक्षमीकरणासाठी देशभरातून विविध उपक्रम राबविले जात आहे. समाजातील महिलांना मान मिळवा त्यांची प्रगति व्हावी यासाठी प्रयत्न केलेले जाऊ लागले आहे. मात्र दुसरीकडे नगर जिल्ह्यात एक लज्जास्पद घटना घडली आहे. परिवहन मंडळाच्या बसमध्ये महिलेची छेडछाड झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंद्यातून नगरला जाण्यासाठी निघालेल्या … Read more

शिर्डीत सव्वा लाखाची सोन्याची चैन चोरीस

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- विजयवाडा येथून शिर्डीत साडबाबांच्या दर्शनाला आलेल्या साईभक्तांचे सव्वा लाखाची सोन्याचे चैन चोरीस गेली आहे. याबावत अभिषेक कामनागरा जयकुमार श्रीराम वय २२ रा. वाहू सेंटर, विजयवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण आणि आजी व कोटा अंजली हे साइं अन्रपूर्णछत्र, शिडी येथे झोपण्यासाठी जात असताना आजी व कोटा अंजली … Read more

जरे हत्याकांड ! पुन्हा तारीख पे तारीख

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातला ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठेच्या वकिलानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर निर्णय न देता नोटीस काढण्यात आली आहे. पोलिसांचं म्हणणं आल्यानंतरच पुढील सुनावणी करण्यात येणार असून यावर आता दि. २८ जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे. यशस्विनी महिला … Read more

कामावर ठेवलेल्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- उत्तर प्रदेशातील अल्पवयीन मुलांना बेकरीत नोकरीला ठेवुन त्यांचा छळ केला. अत्यंत अमानुष वागणूक दिली. एवढेच नव्हे तर एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना राहुरी येथे घडली आहे. सामाजिक कार्यकत्यांनी हा प्रकार उघडकीला आणला आहे. राहूरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी पवन लल्लन यादव, वय … Read more

जरे यांच्या वकिलांनी केली पोलीस संरक्षणाची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-  रेखा जरे खुन प्रकरणात बाळ बोठे याच्यासह त्याच्या हितर्चितकाकडून धमकी येण्याची शक्यता असल्याने मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी जरे यांचे वकील सचिन पटेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्याविरोधात सुपा पोलीस ठाण्यात … Read more

विटभट्टी चालकाचे घर फोडले तब्बल पावणे तिन लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून पोलिसांसमोर या चोरट्यांनी मोठे आव्हानच उभे केल्याचे चित्र दिसत आहे.दिसभरातून जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या भागात चोरीची घटना घडतेच परंतु पोलिस यंत्रणेच्या हातात हे चोरटे सापडत नाहीत. पारनेर तालुक्यातील एका विटभट्टी चालकाचे रविवार दि.१७ रोजी बंद असलेले घर फोडून तब्बल पावणेतिन लाखांचा ऐवज … Read more

स्वयंपाक येत नाही म्हणून कामगाराला जीवे मारले

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली असून याबरोबरच मानवातील क्रूरता देखील वाढू लागली आहे. किरकोळ कारणातून एकमेकांच्या जीव घेणे अशा धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडू लागल्या आहेत. नुकतेच शुल्लक कारणावरून एकास जीवे मारल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. स्वयंपाक करत नाही या क्षुल्लक कारणावरून भंगार दुकानातील कामगाराचा खून करण्यात आला. केडगाव … Read more

धक्कादायक ! कामासाठी बोलाविलेल्या महिलेला लाख रुपयात विकले

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- एका महिलेला स्वयंपाकीच्या कामासाठी बोलावून इंदूरच्या एका व्यक्तीला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या महिलेच्या पतीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील मोतीनगर भागात राहणार्‍या एका तरुणाने याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. … Read more