या तालुक्यात अट्टल दोन दरोडेखोर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटमार करणारा जावेद घड्याळ्या चव्हाण (रा.सुरेगाव), बाबूश्या चिंगळ्या काळे (रा.वांगदरी) या दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. हे दोघे दरोडेखोर पकडल्यामुळे आता तालुक्यातील अनेक गुन्हे उलगडण्यास मदत होणार आहे. दि. २०ऑगस्ट रोजी जावेद व त्याच्या साथीदारांनी जळगाव जिल्ह्यातील महिला व पुरुषांना विसापूर फाटा येथे स्वस्तात … Read more

गुटखा तस्करांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा तस्करीवर पोलिसांकडून कारवाईचे धाडसत्र सुरूच आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. शहरातील जिजामाता चौक परिसरातील एका घरात अन्न व सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकाने छापा टाकून 48 हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा पकडला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-   जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. पुन्हा एकदा नगर तालुक्यातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आक्रमक कारवाई केली आहे. नगर तालुक्यातील अरणगाव येथील जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या विशेष पथकांने छापा टाकला. यावेळी 25 जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध … Read more

ब्रेकिंग : चोरटे चोरी करायला आले आणि महिलेचे कानच कापले !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी केल्या हल्ल्यात विमल महादेव जाधव ही वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे. चोरट्यांनी ५० हजार किंमतीचे दागिने शस्त्राचा धाक दाखवून लंपास केले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की महादेव विमल जाधव हे घरात झोपले असताना मध्यरात्री चोरट्यांनी घराच ककडी वाजविली आणि दरवाजा उघडण्यासाठी … Read more

एक हनी ट्रॅप असाही… उद्योजकाला मागितले ६१ लाख, पत्नीसोबत प्रेमसंबंधाचा केला बनाव

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मालकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतरही कंपनी मालकाला पुन्हा 50 लाखांची मागणी करून रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईताला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप करून बदनामी करण्याची धमकी … Read more

.. तर आम्ही सर्व शेतकरी सामूहिक गळफास घेऊ !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- शेतीसाठी सोमवारपर्यंत पुरेशा दाबाने वीज मिळाली नाही, तर काळेवाडी येथे सामूहिक गळफास लावून घेऊ, असा इशारा पाथर्डी तालुक्यातील बहिरवाडी, हाकेवाडी, रुपनरवाडी व काळेवाडी येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या पाथर्डी कार्यालयास दिला आहे. महावितरणचे उपअभियंता नीलेश मोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिबट्याच्या दहशतीमुळे दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे … Read more

मोटारसायकल आडवी लावून दाम्पत्यास लुटले जामखेडचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांना चोरांची सलामी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  मोटारसायकलवरून जामखेडकडे येत असलेल्या दाम्पत्यास अज्ञात तीन चोरट्यांनी मोटारसायकल आडवी त्यांना ढकलून देत खाली पाडले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सर्व दागिने घेवून पोबारा केला. ही घटना जामखेड खर्डा रोडवरील सतेवाडी फाट्याजवळ घडली. नुकताच जामखेड पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नुकतीच एक बैठक … Read more

संशय वाटल्याने पोलिसांनी भरधाव वेगाने जाणारी कार अडवली आणि सापडली ‘ही’ वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने कर्जत तालुक्यात पोलिस गस्त करीत असताना दि.१८ रोजी सायंकाळी साडे आठच्या सुमारास बारडगाव-राशीन रस्त्यावर टाटा सफारी (एम. एच.१२ जीके ३७७१) ही भरधाव वेगाने राशीनच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसली. याबाबत संशय वाटल्याने पोलिसांनी धुमकाई फाटा या ठिकाणी सदरचे सफारी वाहन अडवले असता या गाडीत फक्त वाहन चालवणारा … Read more

क्लासवरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  खाजगी क्लासवरून सायकलवर घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सुरज राजेंद्र गुलदगड (रा. नगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिडीत अल्पवयीन मुलगी राहत असलेल्या परिसरात आरोपी सुरज गुलदगड हा राहत … Read more

चाकूचा धाक दाखवून दोन लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- अज्ञात दोन चोरट्यांनीघरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून घरातील रोख रक्कम व दागिने असा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बेलवंडी येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात प्रीति सागर इथापे या राहतात शुक्रवारी अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या त्यांच्या किचनच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून … Read more

सोळा वर्षाच्या मुलीला पळवून नेले; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- श्रीरामपूर शहरातील बोरावके कॉलेज वार्ड नं. १ परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या विद्यार्थिनीला पळवुन नेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सदर मुलीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर महिला ही घरकाम व मेस (खानावळ) चालवते. गोंधवणी रोडवर राहणाऱ्या या महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे की, १७.१२.२०२० रोजी साडेदहाच्या सुमारास … Read more

विनायकनगरमध्ये धाडसी घरफोडी साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- अज्ञात चोरट्यांनी शहरातील विनायक नगर परिसरातील एका बंगल्यात धाडशी घरफोडी केली असून, यात तब्बल रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण साडेआठलाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हाभरासह शहरातील केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, तपोवन रोड, पाईप लाईन, विनायक नगर आदी … Read more

अहमदनगर पोलिसांची दमदार कारवाई; परराज्यात जाऊन चोरट्यांना पकडले

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- नऊ लाख रुपये किंमतीच्या कापसाची फसवणूक करणाऱ्या 3 आरोपींना नेवासा पोलिसांनी थेट गुजरात येथुन ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी यावेळी गुन्ह्यातील ट्रक व सर्व कापुस जप्त केला आहे. याबाबद अधिक माहिती अशी की,दि.9 नोव्हेंबर 2020 रोजी कापुस व्यापारी संदेश शरदलाल फिरोदीया यांनी नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती कि, … Read more

लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाकडून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  ३३ वर्षीय महिलेस लग्नाचे अमिष दाखवून तिचे इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या पोलिसाविरोधात घारगाव ता. अकोले पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह चोघांविरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुमठेगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर येथील ३३ वर्षीय घरकाम करणाऱ्या … Read more

देवस्थानच्या भक्तनिवासात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-महिला छळाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यात घडणाऱ्या या घटनांमुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. दरम्यान जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चक्क देवस्थानच्या भक्तनिवासात नेऊन एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून अशोक मोहिते याच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

बीड – अहमदनगर रोडवर अपघातात तलाठ्याचा मृत्यू,निधनाने सर्वत्र हळहळ

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-कामावरून रात्री घराकडे असताना झालेल्या अपघातात एका तलाठ्याचा मृत्यू झाला. बीड – अहमदनगर रोडवर कडा येथे शुक्रवारी (दि. 18) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोपट नारायण गोरे असे मयत झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील … Read more

मुद्देमालासह सराईत दरोडेखोर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-   श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील किराणा दुकानात चोरी करून त्याच गावातून एक दुचाकी चोरून नेणारा चोरटा चिंगळ्या टवक्या काळे (वय ४० रा.टुलेवस्ती, वांगदरी) याला श्रीगोंदा गुन्हे प्रगटीकरणं शाखेच्या पथकाने जेरबंद केले. तसेच त्याच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालातील एक तेलाचा भरलेला डबा, एक रिकामा डबा, एक युनिकॉर्न दुचाकी असा एकूण ९१ … Read more

कोट्यावधींचा गंडा घालणारी भाजपची महिला मंडळ अध्यक्ष अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  पैसे दाम दुपट्ट करून देण्याचे अमिष दाखवून गुंतवणुकदारांना तब्बल १ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या कल्याण शहर भाजपच्या महिला मंडळ अध्यक्षा आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पश्चिम परिसरात झोजवाला कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी एटीएम मल्टीट्रेड सर्व्हिसेस नावाचे कार्यलय थाटले होते. या प्रकरणी महात्मा फुले … Read more