आरोपी बाळ बोठेच्या घरातून पोलिसांनी जप्त केल्या ‘ह्या’ वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. आरोपी बाळ ज. बोठे व सागर भिंगारदिवे या दोघांनी मिळून जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या … Read more

सात लाखांची दूध भुकटी चोरीस; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे. चोरी, लुटमारी अशा घटनांना आळा घालण्यात अद्यापही पोलिसांना यश येत नसल्याचेच या घटनांमधून दिसून येत आहे. नुकतीच अशीच एक चोरीची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शेटे यांचे पेट्रोल पंप आवारात उभ्या केलेल्या मालट्रक मधून 7 लाखांच्या दूध भुकटी … Read more

बाळ बोठेला तात्काळ अटक करून त्याच्या अवैद्य धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी करा !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी नगर शहरातील पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी दिली असून बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी मिळून जरे यांना मारण्याची सुपारी दिली होती, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत … Read more

भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- अंबड शहराजवळ असलेल्या सोमाणी जिनिंग व सदगुरु हाँटेलनजीक ट्रक आणि टेम्पोंची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात टेम्पो चालकासह इतर एक जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार  (दि.४) डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या दरम्यान घडली.  याबाबत अधिक माहिती अशी कि अंबडहून जालन्या कडे जाणारा मालवाहू (ट्रक क्रमांक) (टि.एन् २३ … Read more

रेखा जरे हत्याकांड : पत्रकार बाळ बोठे अडचणीत , पोलिसांनी केले असे काही…

pअहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी तथा दैनिक सकाळचा संपादक आरोपी बाळ बोठे चांगलाच अडचणीत आला आहे. मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी विमान प्राधिकरणला तसे कळवले आहे. त्यामुळे बोठे आता विदेशात पळून जावू शकणार नाहीय. … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. मारहाण, छेडछाड, विनयभंग अशा घननामुळे महिला अस्तित्वाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. नुकताच अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील येसगाव मध्ये 16 वर्षीय मुलीचे मारहाण करून विनयभंग … Read more

पत्रकार बोठे याच्या अटकेनंतरच उलगडणार रेखा जरे यांच्या हत्याकांडमागील कारण !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली … Read more

अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या तरुणास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळवून घेऊन जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पालकवर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकताच असाच काहीसा प्रकार संगमनेर मध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून घेऊन जाणाऱ्या तरुणाला संगमनेर येथील पोलिसांनी नगर शहरातील माळीवाडा बस स्थानकावर … Read more

पोलिसांच्या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यात पोलीस पथकाने वाळू तस्कारांवर धडाकेबाज कारवाई केली आहे, यामुळे वाळू तस्करांची चांगलेच धाबे दणाणले आहे. वाळू वाहतुकीचे कोणतेही परवाने नसताना अवैध वाळू उपसा प्रकार हा भीमा नदी पात्रात सुरु असल्याने पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी कडक कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील कौठा … Read more

नगरपरिषदेकडून त्या पाणी जर प्रकल्पांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अवैध शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली असलेले पाण्याचे प्रकल्प बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने कोपरगाव शहरात अवैधपणे सुरू असलेल्या पाणी जार केंद्रांना नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी अचानक धाड टाकून ते सीलबंद करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान नगरपरिषदेच्या … Read more

… तेव्हापासूनच पत्रकार बाळ बोठेबद्दल शंका निर्माण झाली होती !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. तीनच दिवसांत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे हे या हत्याप्रकरणात सूत्रधार आहेत व यातील आणखी एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनी ही हत्या … Read more

रेखा जरे पाटील खून प्रकरण मनोज पाटलांनी उलगडले आणि बोठे पाटील अडकले !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-रेखा जरे पाटील हत्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या टीमने केलेल्या … Read more

रेखा जरे हत्याकांड : मुख्य आरोपी पत्रकार बाळासाहेब बोठे फरार !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणात एका प्रतिष्ठित वृत्तपत्राचा निवासी संपादक बाळ बोठे हा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट झाले आहे. पत्रकार बोठे यानेच सुपारी देऊन रेखा जरे यांचे हत्याकांड केल्याची माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जरे हत्या प्रकरणात आता पर्यंत पाच … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींची नाव उघडकीस, घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ?

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांची सोमवारी जातेगाव फाट्याजवळ हत्या करण्यात आली होती. या आधी तीन जणांना अटक करण्यात आली होती. आता आणखी दोघांना अटक झाल्याने अटक केलेल्याची संख्या पाच झाली आहे. घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ … Read more

वाळूतस्करांना ठोठावला १९ लाखांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रवरा नदीपात्रात महसूलच्या पथकाने कारवाई करत जेसीबी आणि डंपर ताब्यात घेतला. तहसीलदार अमोल निकम यांनी तिघांना १९ लाख ११ हजार ९६० रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई बुधवारी सकाळी ६.३० वाजता करण्यात आली. तलाठी योगिता शिंदे (खांडगाव), संग्राम देशमुख (आश्वी), संजय शितोळे (उंबरी बाळापूर) यांच्या पथकाने … Read more

रेखा जरे यांच्या मुलाने काढलेल्या एका फोटोमुळे आरोपी सापडले !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी रेखा भाऊसाहेब जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 18 तासांत तिघांना अटक केली आहे. जरे यांच्या हत्येनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 18 तासांत आरोपी जेरबंद केले. विशेषत: जरे यांच्या मुलाने मोटारीतूनच मोबाईलमध्ये आरोपीचा … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिसांकडून आणखी दोघे ताब्यात, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपासा दरम्यान दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, या … Read more

नगर-औरंगाबाद महामार्गावर कंटनेर चालकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर परिसरात भारत पेट्रोल पंपासमोर बुधवारी कंटेनर चालकाला लुटण्यात आले. औरंगाबादकडून मुंबईला जाणारा कंटेनर (एमएच ४६ बीई ६३५४) बिघडल्याने चालक अमिरऊल विश्वास (कोलकाता) याने भारत कंपनीच्या सागर कन्स्ट्रक्शन पेट्रोल पंपासमोर कंटेनर उभा केला व केबिनमध्ये तो झोपला. पहाटे ४ च्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून आलेल्या तिघांनी कंटेनरमधील … Read more