महिलेची संगमनेर न्यायालयात शिवीगाळ

१० जानेवारी २०२५ संगमनेर : एका मद्यपी महिलेने धुमाकूळ घालून शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास येथील न्यायालयात घडली.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर न्यायालयात हेड कॉन्स्टेबल सविता सोळसे या कोर्ट ऑर्डर्ली म्हणून कामकाज करत होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक एक महिला न्यायालयामध्ये मोठ-मोठ्याने आरडाओरड करत होती. महिलेचा आवाज ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी … Read more

वृध्दाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

१० जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील आरणगाव दुमाला येथील ७८ वर्षाच्या गणपत बजाबा शिंदे यांना शेतीच्या कारणातून दगडाने मारहाण करून जीवे ठार मारल्या प्रकरणी शिवराम मारुती शिंदे (वय ५५ वर्षे) याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेप तसेच ५००० रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा कापसे यांनी काम पाहिले … Read more

गुलमोहर रोडवरील कॅफेवर छापा; चालकावर गुन्हा दाखल

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : कॉफी शॉपच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या गुलमोहर रोड वरील पारिजात चौकातील कॅफेवर तोफखाना पोलिसांनी बुधवारी (दि.८ जानेवारी) दुपारी छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी कॅफेचालक ओंकार दत्तात्रय कोठुळे (रा. भूतकर वाडी, भिंगारदिवे मळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की,सावेडी उपनगरात गुलमोहर … Read more

शेवगाव येथे परप्रांतीय महिलेचा खून

१० जानेवारी २०२५ शेवगाव : एका परप्रांतीय महिलेचा तिच्या पतीने खून केल्याची घटना शेवगाव शहरात नेहरूनगर (शिवनगर) येथे बुधवारी रात्री घडली.याबाबत पोलिसांनी तिच्या पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.शहरातील नेहरूनगर (शिवनगर) येथे एका २९ वर्षांच्या महिलेचा तिचा पती इस्माईल मकसूद मालिक दोघे (रा. मनोहरपूर, मलिकपारा, दनकुनी, जि. हुगळी, पश्चिम बंगाल), याने कौटुंबिक कारणावरून तोंडावर, छातीवर … Read more

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन तरुणाकडून विनयभंग

१० जानेवारी २०२५ संगमनेर : खासगी शिकवणी संपवून बसस्थानकाकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेड काढत लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी संगमनेरात घडला.याप्रकरणी शहर पोलिसांनी आदेश राजेंद्र वाडेकर याच्यावर विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता,एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून,पीडित अल्पवयीन … Read more

घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वृद्धाचा मृतदेह

१० जानेवारी २०२५ नगर : शहरातील स्टेशन रोडवर आनंदनगर – परिसरात एका वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात बुधवारी (दि.८ जानेवारी) दुपारी ४ च्या सुमारास आढळून आला आहे.अशोक मोतीलाल मंत्री (वय ६१) असे मयताचे नाव आहे. मयत अशोक मंत्री हे अविवाहित होते.ते घरात एकटेच राहात होते. त्यांना १ भाऊ, २ विवाहित बहिणी, पुतणे, भाचे … Read more

स्वप्निल निखाडे यांचे उपचारादरम्यान निधन ; विष प्राशन करून केला होता आत्महत्येचा प्रयत्न

१० जानेवारी २०२५ कोपरगाव : माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी मंगळवारी सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आपल्या वाहनामध्ये बसून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. डॉक्टर मुळे यांनी प्राथमिक उपचार केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संजिवनीच्या … Read more

जरांगे पाटील यांच्या विरोधात पाथर्डीत गुन्हा

९ जानेवारी २०२५ पाथर्डी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसेच ओबीसी समाजाविरोधात परभणी येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते किसन महादेव आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.पाथर्डीतील आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात आंदोलकांनी गर्दी केली.अखेर … Read more

रुग्णवाहिका-ट्रॅक्टरच्या अपघातात महिला ठार ; चार जण गंभीर जखमी

९ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव फाटा परिसरात श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. रंजना सुरेश पिपाडा वय ६० रा. श्रीगोंदा असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे … Read more

मुळा नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

८ जानेवारी २०२५ राहुरी : राहुरी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच आहे.काल मंगळवारी (दि. ७) सकाळी तालुक्यातील आरडगाव परिसरात मुळा नदीपात्रात पुन्हा एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुन आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील राहुरी आरडगाव येथील स्मशानभूमी जवळील मुळा नदीपात्रात काल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान, सुमारे ३५ वर्षीय … Read more

महिलेसह प्रियकरास राहुरीत अटक

८ जानेवारी २०२५ राहुरी शहर : पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकरास राहुरी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.येथील न्यायालयाने त्या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, (दि. ४) रोजी राहुरी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्यातील आरोपींनी मयतास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली … Read more

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पकडले

७ जानेवारी २०२५ शेवगाव : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य संजय खैरे (रा. शेवगाव) याने माझ्या मुलीला (वय-१७), लग्नाचे आमिष दाखवून आरोपी ऋषिकेश दत्तात्रय थावरे (रा. शेवगाव) याच्या मदतीने फूस लवून पळवून नेले. … Read more

छत्रपती संभाजीनगर ‘ऑनर किलिंग’ने हादरले ; डोंगरावरून ढकलून बहिणीची हत्या, चुलत भावाविरुद्ध गुन्हा

७ जानेवारी २०२५ छत्रपती संभाजीनगर : कुटुंबीयांचा विरोध असतानाही १७ वर्गीय चुलत बहीण प्रेमविवाह करण्यावर ठाम असल्याने संतप्त भावाने तिला चक्क २०० फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून दिल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तिचा जागीच मृत्यू झाला. वाळूज महानगरातील तिसगाव जवळच्या खवड्या डोंगराच्या पायथ्याशी सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ … Read more

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू, दोघे अटकेत

शेवगाव : पैशांच्या व्यवहारावरून वरखेड (ता. शेवगाव) येथे मागील महिन्यात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चालकाचे नगरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. भुजंग शामराव मडके (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सोनेसांगवी (ता. शेवगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी योगीता भुजंग मडके (वय ३४) यांनी ३१ डिसेंबर … Read more

पोलिस भरतीचे स्वप्न राहीले अधुरेच : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच घडले असे अक्रीत संपूर्ण गावावर पसरली शोककळा

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पांढरीपुल येथे दुचाकी व पीकअप यांच्यात झालेल्या जोरदार अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन तरूणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दोन्ही मृत तरूण हे शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव येथील रहिवाशी होते. प्रशांत शेषराव देशमुख (वय २४ वर्ष), शुभम बबन लांडे (वय २४ वर्षे) असे या मृत तरूणांची नावे आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की, … Read more

कोपरगावच्या तलाठ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळयात

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तक्रारदार यांनी कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी या नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सदनिका दि. 28/9/2022 रोजी खरेदी केलेली आहे. सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरीता तक्रारदार यांनी त्यांचा अर्ज व खरेदी खताची सूची क्र.2 ची छायांकित प्रत तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे, (वय- 40 वर्ष, धंदा-नोकरी, तलाठी सजा कोपरगाव, वर्ग-3, … Read more

श्रीगोंदा तालुक्यात वाढला गुन्हेगारीचा आलेख ! वर्षभरात चोऱ्या, अपहरणासारखे ११२८ गुन्हे दाखल ११८ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

३ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असून, चोऱ्या व अपहरणाच्या गुन्ह्यांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात असताना बहुतांश चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.या गुन्ह्यांच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान आहे. श्रीगोंदा तालुका क्षेत्रफळाने मोठा असल्याने तालुक्यात श्रीगोंदा व बेलवंडी अशी दोन स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत. यापैकी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सन २०२४ मध्ये … Read more

टोल नाक्यावरील मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक

३ जानेवारी २०२५ संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर झालेल्या मारहाण प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने काल गुरुवारी (दि. २) नाशिक जिल्ह्यातून या आरोपींना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व तरुण उद्योजक अतुल राधावल्लभ कासट व त्यांच्या … Read more