टाकळीभान शिवारात अपघात; ३ ठार, ६ जखमी

२२ जानेवारी २०२५ टाकळीभान : दुचाकी आडवी आल्याने मोपेडस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो गाडी लिंबाच्या झाडाला धडकली.यात मोपेडचालक व दोन महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.नेवाशातील विवाह सोहळा उरकून बोलेरो टाकळीभानकडे येत असताना काल मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास टाकळीभान शिवारात हा अपघात झाला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील … Read more

गुजरातहून तामिळनाडूला जाणाऱ्या ट्रकच्या टायरची केली परस्पर विक्री ; दोघे जण ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !…

२१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : वाहतुकीदरम्यान सीएट कंपनीच्या टायरची परस्पर विक्री करणाऱ्या चालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.धुळे येथे ही कारवाई करण्यात आली. इरशाद निशार अहमद (वय ५५, रा.रामपुर कुमियान, प्रतापगड, उत्तखदेश) असे आरोपीचे नाव आहे.मोहमंद मुस्ताफा (रा.मेन रोड, श्रीवाचूर, पेरेबलोर, तामिळनाडू) यांनी परकोट मारिटिमा एजन्सी या … Read more

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

२१ जानेवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील ठाकरवाडी येथील विवाहित तरुण दत्तू जाधव याने रात्रीच्या दरम्यान साडीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेतल्याची घटना काल दि. २० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की दत्तू महादू जाधव (वय ३८ वर्षे, रा. म्हैसगाव, ठाकरवाडी, ता. राहुरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव … Read more

अहील्यानागर हादरले !अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या ! पोलिसात हजर होऊन खुनाची…

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे तरुणाने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली तर मारहाण करताना मधे पडलेल्या आईला देखील बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार दि. १८ रोजी रात्री उशिरा घडली. प्रियंका करण दिवटे (वय २२) असे मारहाणीत मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आशा नवनाथ दिवटे (वय ४५) ही महिला जखमी झाली. … Read more

Shrirampur Breaking : हवेत गोळीबार आणि चाकूचे वार; श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण ! नागरिक घाबरले

श्रीरामपूर: शहरातील वॉर्ड नं. २ मधील घासगल्ली भागात काल (शुक्रवारी) सायंकाळी दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद उफाळून तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला करत चाकूने वार केले, ज्यामुळे तिघेजण गंभीर जखमी झाले. याशिवाय, एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. वादाचं कारण काय ? घटनेची सुरुवात राहाता तालुक्यातील एका … Read more

Ahilyanagar Crime : युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime : जुन्या भांडणाचा मनात राग धरून ८ जणांनी एका युवकास दुचाकी आडवी घालून शिवीगाळ दमदाटी करीत लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने व दगडाने बेदम मारहाण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भिंगार परिसरात घडली. याप्रकरणी फिर्यादीनुसार पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय संजय हांपे (वय २९, रा. सौरभनगर, भिंगार) हा १० जानेवारीला … Read more

पैसे दिले नाही म्हणून सासरच्या लोकांकडून मारहाण ! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : मिळालेले पैसे पत्नीला दिले नाहीत, या कारणावरून राहुरी तालुक्यातील मानोरी येथे ७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास किरण कारभारी मकासरे (वय ३०) यांना सासरच्या लोकांनी शिवीगाळ करत लोखंडी टामी, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण मकासरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी ७ जानेवारी … Read more

पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…

श्रीगोंदा : विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी उपाशी ठेवत बेदम मारहाण, शिवीगाळ करत जिवंत ठार मारण्याची धमकी देत पिडीत महिलेला सासरा आणि दिर यांनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच पिडीत महिलेच्या पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरा आणि दिर या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल … Read more

बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन

१५ जानेवारी २०२५ संगमनेर : जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून तालुक्यातील साकूर येथील हॉटेलमध्ये हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी घारगाव पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने साकूरमध्ये अर्धा दिवस बंद पाळण्यात आला.याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील साकूर … Read more

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘मृत्यूचे तांडव’ सुरूच ! दहा दिवसात अपघातात पाच बळी ; मागणीकडे दुर्लक्ष; नागरिकांचा आक्रमक पवित्रा

१५ जानेवारी २०२५ जेऊर : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची मालिका थांबता थांबेना.दररोज घडत असलेल्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत.गेल्या दहा दिवसात जेऊर ते इमामपूर घाटा दरम्यान झालेल्या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जेऊर परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.याबद्दल सविस्तर … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा

१५ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी नकेश उर्फ कृष्णा उर्फ गणेश छबु माळी (वय २१ रा.शेडाळ ता. आष्टी जि. बीड) याला विविध कलमान्वये दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, तसेच ३ हजार दंड, दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा तसेच तसेच लैंगिक अपराधापासुन … Read more

लग्नाचे आमिष दाखवून व मारहाण, दमदाटी करत युवतीवर अत्याचार ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

१५ जानेवारी २०२५ नगर : लग्नाचे आमिष दाखवून व मारहाण, दमदाटी करत युवतीवर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पीडित युवतीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्या तरूणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिराज शेख (रा. घाटनांदुर अंबेजोगाई, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.पीडित युवतीने सिराजवर लग्नाचे आमिष … Read more

शिर्डीत अज्ञात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

१४ जानेवारी २०२५ शिर्डी : शहरातील नगर-मनमाड रस्त्याजवळ असलेल्या फुल मार्केट जवळील एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ असून त्याने पांढरा हाफ शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या हातावर ‘सुवर्णा’ असे … Read more

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्राचा मृत्यू

१४ जानेवारी २०२५ नगर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात रविवारी (१२ जानेवारी) रात्री आठच्या झालेल्या भीषण अपघातात वडील आणि त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेशनगर, हंडीनिमगाव येथील अनिल फिलीप दळवी (वय ४५) आणि त्यांचा १२ वर्षीय मुलगा प्रतीक हे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाले.अपघात … Read more

मित्राशी बोलून बाहेर गेला तरुण ; त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

१३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पत्नीशी भांडण झाल्यामुळे मित्राच्या रुमवर राहत असलेला एक तरुण मित्रासोबत बोलून बाहेर गेला.तो परत आलाच नाही. त्याचा दगडाने ठेचून निघूण खून झाल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आले.ही घटना नागापूर एमआयडीसी परिसरात शनिवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली. अश्विन मारुती कांबळे (वय ३२, रा. गणेशनगर, एमआयडीसी, मूळ रा. निपाणी, बेळगाव, कर्नाटक) असे … Read more

जामिनासाठी न्यायाधीश न्यायालयात ! लाचखोरी प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ; सुनावणी १५ जानेवारीला

१० जानेवारी २०२५ मुंबई : लाचखोरीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीशाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाचे धाव घेतली आहे.न्यायधीशावर एका आरोपीला जामीन देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी दाखल केलेल्या या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी १५ जानेवारी रोजी चेंबरमध्ये सुनावणी … Read more

पालवे बंधुवर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई ; पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आदेश

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे व त्यांचे चुलत बंधू शहादेव भानुदास पालवे (दोन्ही. रा. कोल्हार, ता. पाथर्डी) यांच्यावर तडीपारच्या कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी नुकताचा हा आदेश काढला असून, दोघांना नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे … Read more

पतीवरील गुन्हा रद्द करा; पत्नीचे पोलीस प्रमुखांना निवेदन

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पती जितेंद्र चव्हाण व पुतण्या रोहन चव्हाण यांच्यावर ९ डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून तो रद्द करण्यात यावा असे निवेदन पत्नी अनिता जितेंद्र चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. अनिता चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,माझे पती जितेंद्र … Read more