आठव्या वेतन आयोगाचे नियम निश्चित झाले आहेत का ? मोदी सरकारची संसदेत मोठी माहिती

8th Pay Commission : गेल्या काही महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. याच्या चर्चा गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरू आहेत. दरम्यान 17 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आला आहे. आठवा वेतन आयोग फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चर्चेचा विषय आहे असे नाही तर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील या गावात होणार बॉम्ब शेल्सची निर्मिती ! 4500 कोटींचा प्रकल्प, 2000 तरुणांना मिळणार नोकरी

शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेला डिफेन्‍स क्‍लस्‍टरचा प्रकल्‍प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या आत्‍मनिर्भर भारत संकल्‍पनेचे प्रतिक आहे. ‘मेक ईन इंडिया’ च्‍या माध्‍यमातून संरक्षण सामुग्री देशातच निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने शेल फोर्जींगचा प्रकल्‍प महत्‍वपूर्ण ठरणार असून, जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक विकासाला मोठ्या संधी या माध्‍यमातून निर्माण होतील असा विश्‍वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. सावळीविहीर … Read more

अहिल्यानगरकरांसाठी यंदाचा गुढीपाडवा असणार खास! शहरात प्रथमच ग्रंथगुढी, शोभायात्रा आणि रसिकोत्सव!

अहिल्यानगर- गुढीपाडव्यानिमित्त यंदा शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम पाहायला मिळणार आहे. मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी रविवारी पहिल्यांदाच ग्रंथगुढीचा अनोखा उपक्रम होणार आहे. त्याचबरोबर स्वस्वरूप संप्रदायातर्फे सकाळी स्वागत शोभायात्रा निघणार आहे. केडगावात कीर्तन महोत्सव होणार आहे, तर सायंकाळी सावेडीत रसिकोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा सणाचा उत्साह कायम आहे. स्वस्वरूप संप्रदायातर्फे रविवारी सकाळी ७ … Read more

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील ‘हे’देवस्थान देणार भाविकांना प्रसाद म्हणून ‘आमरसाची मेजवानी’

अहिल्यानगर: जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर तालुक्यातील आगडगाव येथील कालभैरवनाथ देवस्थान कडून दर रविवारी भाविकांना आमटी भाकरीचा प्रसाद देण्यात येतो. या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात. मात्र येत्या रविवारी केल्या जाणाऱ्या अन्नदानात चक्क आंब्याच्या रसाची मेजवाणी भाविकांना मिळणार आहे. यासाठी दीड हजार किलो आंब्यांची खरेदी करण्यात आली … Read more

दारूच्या नशेत मित्राने केलेली चेष्टा भोवली, दारूची बाटली डोक्यात फोडल्यामुळे एकजण जखमी

अहिल्यानगर- दारूच्या नशेत मित्रांमध्ये चेष्टा-मस्करी सुरू होती, पण ती वादात बदलली आणि एका तरुणावर हल्ला झाला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहित लक्ष्मण अडागळे (वय २६, रा. रेल्वे स्टेशन, पंचशीलनगर) असं या जखमी तरुणाचं नाव आहे. त्याने रुग्णालयातून दिलेल्या जबाबानुसार, कोतवाली पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला … Read more

अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा रंगला महाराष्ट्र केसरीचा थरार, शरद पवारांच्या उपस्थितीत होणार अंतिम सामना

कर्जत- शहरात बुधवारपासून ६६ व्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी कुस्ती स्पर्धा सुरू झाली आहे. संत सदगुरू गोदड महाराज क्रीडानगरीत राज्यभरातले नामवंत पैलवान दाखल झालेत. संध्याकाळी कुस्तीप्रेमी आणि कुस्तीगीर परिषदेच्या बड्या मंडळींनी हातात फुलं घेऊन आखाड्याचं पूजन केलं आणि स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ५७, ६५ आणि ७४ किलो वजनी गटातल्या चित्तथरारक कुस्त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. ही … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं ! जावयाचा निर्घृण खून, सासू अन पतीनेच गळा दाबला..

अहिल्यानगरमधील गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. आता एक खळबळजनक वृत्त हाती आले आहे. पत्नीला व सासूनेच आपल्या जावयाचा खून केला आहे. किरकोळ कारणावरून जावयाचा मारहाण करत खून करण्याचा प्रकार श्रीरामपुरात घडला आहे. याप्रकरणी कमल गोटीराम शिंदे (वय ४८) रा. सोनई, ता. नेवासा, हल्ली रा. बोनशेगाव, एमआयडीसी, नगर यांनी फिर्यादीने दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे … Read more

उद्योगी दृष्टिकोनाला द्या व्यावसायिकतेची जोड उद्योगीनामा पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात उद्योजक दीपक लांडगे यांचे मत

अहिल्यानगर : टपरी, वडापावची गाडी किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करूनही व्यवसाय करता येतो. त्यासाठी काही कौशल्ये आणि मुख्य म्हणजे सकारात्मक विचार ठेऊन धडपड करणे आवश्यक असते. उद्योगी माणूसच काहीतरी उद्योग करू शकतो. असाच विचार मांडताना आपल्यामधील उद्योगी दृष्टिकोनाला व्यावसायिकतेची जोड देण्यासाठीचे मार्गदर्शन करण्याचे काम उद्योगीनामा या पुस्तकातून केलेले आहे, असे मत वाघेश्वरी डेअरीचे … Read more

कंटेनर-कार धडकेत अहिल्यानगर जिल्ह्यातील तिघांचा जागीच मृत्यू

न्हावरा-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवार, २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. न्हावरा (ता. शिरूर, जि. पुणे) परिसरात मालवाहू कंटेनर (एन. एल. ०५ जी २३९६) आणि कार (एम. एच. १६ सी. व्ही. ४१७६) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. … Read more

१५०० रुपये येणार खात्यात… फक्त ‘हे’ कागदपत्र आहे महत्वाचे

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निराधार व्यक्तींसाठी राज्य सरकारच्या विशेष साहाय्य योजनांअंतर्गत मिळणारे मासिक अनुदान आता थेट डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या सुविधेसाठी आधारकार्ड अपडेट करणे आणि मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याने या कामात आघाडी घेतली असून ९९ टक्के लाभार्थ्यांचे आधार अपडेट पूर्ण … Read more

लाडकी बहीण’नंतर आता ‘लाडका फोटोग्राफर’? गायकवाडांची शासनाकडे मागणी

कर्जत तालुक्यातील फोटोग्राफर असोसिएशनने शासनाकडे एक अनोखी मागणी केली आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय झालेली असताना, आता फोटोग्राफी क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीही अशीच एक योजना सुरू करावी, अशी विनंती पुणे जिल्ह्यातील दौंड येथील फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केली आहे. कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे रेहकुरी येथे आयोजित स्नेहमेळाव्यात ही मागणी जोरकसपणे मांडण्यात आली. … Read more

Ahilyanagar Breaking : मोठी बातमी ! विखे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे ‘सर्वोच्च’ आदेश, धक्कादायक प्रकरण समोर

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधून एक मोठी बातमीसमोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारखाना संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले. नेमके काय घडले ? काय आहे प्रकरण? पाहुयात सविस्तर.. पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब केरूणात विखे पाटील व दादासाहेब पवार, एकनाथ घोगरे, अरुण कडू यांनी … Read more

एकाच वेळी तीन मोबाईल स्विच ऑफ ! माऊलीच्या हत्येवेळी काय झालं ?

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी गावात १९ वर्षीय माऊली सतीश गव्हाणे याचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी त्याचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तलवारीने तुकडे करून विहिरीत फेकले. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात सागर दादाभाऊ गव्हाणे (२०) आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. पोलिस तपासात समोर आले की, … Read more

Numerology Love : ह्या तारखेला जन्म झालेल्या लोकांचे होते लव्ह मॅरेज ! तुमची जन्मतारीख सांगेल…

अंकशास्त्रानुसार, जन्म तारखेला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि याचा व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावरही प्रभाव पडतो. विवाह हे दोन प्रकारचे असतात – प्रेम विवाह आणि अरेंज मॅरेज. काही लोक प्रियकर किंवा प्रेयसीसोबत प्रेम विवाह करण्यास प्राधान्य देतात, परंतु काही वेळा परिस्थितीमुळे तसे घडत नाही. अंकशास्त्रानुसार, मूलांक ३, ५, ६ आणि ९ असणारे लोक प्रेम विवाह करण्याची जास्त शक्यता … Read more

Nagpur News : दगाबाज प्रियकराकडून अल्पवयीन प्रेयसी गर्भवती न्यायालयात गर्भपातासाठी अर्ज,प्रियकरावर फसवणुकीचा आरोप

नागपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीने गर्भपात करण्याची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. १७ वर्षीय प्रेयसीने तिच्या प्रियकरावर फसवणुकीचा आरोप केला असून, त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिचे शारीरिक शोषण केल्याचे तिने सांगितले आहे. परिणामी, ती गर्भवती झाली. तिच्या पालकांनीही गर्भपातासाठी संमती दिली आहे, मात्र कायदेशीर अडचणींमुळे न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक ठरला आहे. … Read more

वंशपरंपरागत विश्वस्त यांना पदमुक्त करताना न्यायिक मार्गाचा अवलंब करा

परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज स्थापित अहिल्यानगर येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, सावेडी येथील वंशपरंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी मिलिंद गोविंद क्षीरसागर यांना विश्वस्त पदावरून काढताना विश्वस्त मंडळाने अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांची बडतर्फी केल्याचा ट्रस्टने दाखल केलेला बदल अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्य आहे असे स्पष्ट प्रतिपादन पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त – २ राहुल मामू … Read more

Samsung Galaxy S24 Ultra वर मोठी ऑफर ! तब्बल 34,458 ने स्वस्त, किंमत 1 लाखांच्या खाली

Samsung Galaxy S24 Ultra हा Samsung च्या S-सिरीजमधील सर्वात अॅडव्हान्स्ड आणि पॉवरफुल स्मार्टफोन आहे. अत्याधुनिक AI फीचर्स, शक्तिशाली Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 200MP कॅमेरा आणि जबरदस्त QHD+ AMOLED डिस्प्ले यांसारख्या वैशिष्ट्यांसह हा फोन मोबाईल टेक्नोलॉजीमध्ये आघाडीवर आहे हा स्मार्टफोन प्रोफेशनल ग्रेड फोटोग्राफी, गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्याचा One UI 7 सह … Read more

ज्यांचं घड्याळ नेहमी हातात असतं, त्यांचं भविष्य ठरलेलं असतं – जाणून घ्या तुमच्या हातातील घड्याळ काय सांगतं!

प्रत्येक व्यक्तीचे आवडीनिवडी वेगळ्या असतात आणि त्याचप्रमाणे त्यांची जीवनशैलीही वेगळी असते. काही लोकांना घड्याळ घालायला आवडते, तर काहींना त्याची गरज वाटत नाही. मात्र, तुम्ही घड्याळ घालता की नाही यावरून तुमच्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू स्पष्ट होऊ शकतात. घड्याळ हा केवळ वेळ दाखवणारा उपकरण नाही, तर तो तुमच्या शिस्तप्रियतेचे, व्यक्तिमत्त्वाचे आणि मानसिकतेचे प्रतीक देखील असतो. … Read more