धनंजय मुंडेंचे मंत्रीपद कायम राहणार ? अजित पवार-मुंडेंमध्ये तासभर खलबते; दोषी आढळले तरच कारवाईचे संकेत

७ जानेवारी २०२५ मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदास तूर्तास कोणताही धोका नसल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांचे म्हणणे आहे.देशमुख हत्येप्रकरणी मंत्री मुंडे यांच्याविरोधात जोपर्यंत पुरावे आढळत नाहीत,सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीचे अहवाल येत नाहीत आणि त्यात मुंडेंना दोषी ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत … Read more

‘टोरेस’चा गुंतवणूकदारांना गंडा ; ५०० कोटी घेऊन मालक पसार

७ जानेवारी २०२५ मुंबई : पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका चिटफंड कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.या प्रकारानंतर सैरभैर झालेल्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे कार्यालय गाठले.चिटफंड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतील जवळपास एक, दोन नाही, तर तब्बल तीन लाख लोक बळी पडल्याची चर्चा आहे. संबंधित कंपनीकडे गुंतवणूकदारांचे ५०० कोटी … Read more

फक्त एक छोटासा उपाय दातांचा पिवळेपणा करेल दूर आणि दात चमकतील मोत्यासारखे! करून तर बघा

health of teeth

Health tips Of Teeth:- प्रत्येक व्यक्ती जेव्हा समाजामध्ये वावरत असतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे प्रामुख्याने लक्ष देत असतो व आपले व्यक्तिमत्व आकर्षक कसे दिसेल याबाबतीत आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतो. एखाद्याचे व्यक्तिमत्व हे अंतरंगापेक्षा त्याच्या बाह्य रंगावरून जास्त करून ओळखले जाते व यामध्ये अंगावर घातलेले कपडे तसेच केसांची रचना महत्त्वाचे असतेस परंतु दात देखील … Read more

मी आधीच सांगितले होते २०० आमदार निवडून आणू

६ जानेवारी २०२५ ठाणे : मी निवडणुकीपूर्वीच सांगितले होते की, महायुतीचे २०० आमदार निवडून आणू नाहीतर शेती करायला जाऊ. त्यानुसार, आम्ही २०० हून अधिक उमदेवार निवडून आणले आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबईचे माजी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्यासह नाशिक, धुळे, पालघर, … Read more

चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा ; पोलीस शहीद

६ जानेवारी २०२५ दंतेवाडा : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले.या धूमश्चक्रीत जिल्हा राखीव दलाचा एक पोलीस जवानही शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. दक्षिण अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून शुक्रवारपासून नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे.शनिवारी सायंकाळी नारायणपूर व दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेजवळील जंगलात या पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला … Read more

सुरकुत्यांना रामराम… आरोग्यदायी सवयी लावून करा नियंत्रण

४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा सामना करावा लागतो.मात्र काही वेळा आपल्या दैनंदिन तसेच खाण्या-पिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होते आणि आपण आपल्या वयापेक्षा मोठे दिसू लागतो. काही गोष्टी अशा आहेत की, वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकतात.या सवयींच्या मदतीने आरोग्यही सुधारते … Read more

पन्हाळगड : चार दरवाजाच्या भिंती झाल्या अखेर खुल्या

४ जानेवारी २०२५ पन्हाळा : रामचंद्र काशीद केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून ऐतिहासिक पन्हाळगडाच्या संवर्धनाचे काम चालू आहे. गडाचे मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजाच्या उत्खननाचे काम प्रगतिपथावर आहे. या दरम्यान चार दरवाजाच्या पूर्वीच्या भिंती आणि कमानींचे अवशेष उजेडात येऊ लागले आहेत.संपूर्ण उत्खननानंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या चार दरवाजाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व समजणार आहे. ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ … Read more

मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी कसली कंबर ; ‘डोअर टू डोअर’ गाठीभेटी घेण्याचा पदाधिकाऱ्यांना आदेश

४ जानेवारी २०२५ मुंबई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी त्यांनी ‘मातोश्री’वर बैठक घेतली. ‘सर्व प्रभाग पिंजून काढा, डोअर टू डोअर गाठीभेटी घेऊन मतदारांच्या अपेक्षा जाणून घ्या,’ असे आदेश ठाकरे यांनी … Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस

३ जानेवारी २०२५ बीड : मस्साजोग (ता. केज) येथील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार तीन आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून योग्य बक्षीस देण्याचे पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निघृणपणे हत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर … Read more

एकाच सरणावर तिघा बाप-लेकांवर अंत्यसंस्कार

३ जानेवारी २०२५ डोणगाव (बुलढाणा) : जालना जिल्ह्यातील महाकाळा फाट्याजवळ उभ्या ट्रकवर कार आदळून शेलगाव देशमुख येथील भागवत चौरे यांच्यासह मुलगा व मुलगी तसेच नात्यातील कुटे परिवारातील त्यांची मामी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अख्ख्या जिल्हा हळहळला असून, शेलगाववासीय शोकाकूल झाले आहेत. १ जानेवारीच्या रात्री बाराच्या सुमारास वडील भागवत यांच्यासह मुलगी सृष्टी आणि … Read more

जलद दर्शनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची लूट !

३ जानेवारी २०२५ नाशिक : नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी परराज्यातील भाविकांनी अलोट गर्दी केली असून जलद दर्शनाच्या नावाखाली त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी … Read more

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला वर्षभरात ४७.२७ कोटींचे उत्पन्न ! भाविकांच्या संख्येतही झाली वाढ, देणगी दर्शनातून सर्वाधिक १६ कोटी ९६ लाखांचे उत्पन्न

३ जानेवारी २०२५ तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मागील वर्षभरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.मंदिर संस्थानच्या तिजोरीत विविध माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मागील एक वर्षात एकूण ४७ कोटी २७ लाख ३२,२०६ रुपयांचे दान जमा झाले आहे. श्री तुळजाभवानी भक्तांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक गर्दी ही श्रवण मास ते दीपावली या … Read more

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी !

३ जानेवारी २०२५ मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी,अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी केली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन … Read more

सीआयडीकडून तीन फरार आरोपींचा शोध सुरू

३ जानेवारी २०२५ बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा घटनेच्या तीन आठवड्यांनंतरही पोलिसांना व नंतर सीआयडी पथकाला शोध लागलेला नाही.खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. असे असतानाच मस्साजोग येथे बुधवारी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन करत फरार आरोपी तत्काळ पकडण्याची मागणी केली. … Read more

पांडूतात्यांच्या आयुष्याला मिळाला यू टर्न ; रुग्णवाहिकेच्या धक्क्यामुळे मृत पांडूतात्या पुन्हा जिवंत

३ जानेवारी २०२५ कसबा बावडा : पांडूतात्या… उलपे मळ्यातील शेतात दिवसभर राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे… रात्री चार घास सुखाचे खाऊन येथील ज्ञानेश्वर मंदिरात भजनात दंग होणारे एक सर्वसामान्य वारकरी व्यक्तिमत्त्व. पंधरा दिवसांपूर्वी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक पांडूतात्यांना दरदरून घाम सुटला आणि पांडूतात्या दारात असलेल्या खाटेवर निपचित पडले. अडाणी बायको अस्वस्थ झाली. तिने आरडाओरड सुरू … Read more

अबब… माळेगाव यात्रेत एक कोटीचा घोडा ! ३ लाखांची देवणी गाय, ६० हजारांचा श्वान, ९ हजारांचा कोंबडा ठरतोय आकर्षण

३ जानेवारी २०२५ नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) येथील खंडेरायाच्या यात्रेत पशू प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात विविध पशुंमध्ये घोडे, गाढव, उंट, कोंबडे तसेच विविध जातींचे श्वान पाहावयास मिळाले. विविध श्वानाच्या जातींमध्ये राँट, ब्रिलर, लाँबराडॉग आदी जातींनी हजेरी लावली. यात्रेत एक कोटीचा घोडा दाखल झाला आहे. … Read more

लाडक्या बहिणींना टेन्शन ! तक्रारींनुसार फेरतपासणी ; प्राप्तिकर खात्याची मदत

३ जानेवारी २०२५ मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील काही अर्जाची फेरछाननी होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली. ज्या लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे, ज्यांच्याकडे कार, नोकरी आहे अशा महिलांना आता या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. याचा फटका राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो. यामुळे लाडक्या बहिणींचे … Read more

स्वतःसाठी वेळ काढा आणि नवीन वर्षात नक्कीच ‘या’ आरोग्य तपासण्या करा! मोठ्या प्रमाणावर रहाल फायद्यात

health check up

Health Check-Up:- आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपण बघितले तर प्रत्येक व्यक्ती हा कामाच्या धावपळीत असतो आणि दैनंदिन रुटीनच्या जाळ्यामध्ये व्यक्ती इतका अडकून पडतो की त्याला स्वतःच्या शरीराकडे म्हणजेच आरोग्याकडे देखील लक्ष द्यायला वेळ नसतो. तसेच खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी आणि अशा प्रकारचे धावपळीच्या जीवनशैलीमुळे ताण तणाव व त्यामुळे मानसिक स्थितीवर परिणाम होऊन अनेक शारीरिक आजारांनी व्यक्ती … Read more