स्वाभिमानी शेतकरी संघटनेन महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यलयातच कोंडले

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-  वीजबिल प्रश्नावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. तसेचज महावितरणने थकीत वीजबिल वसुलीसाठी सुरु केलेली आक्रमक मोहिमेमुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यातच अनेक संघटना आता यामध्ये सहभागी झाल्या आहेत. नुकतेच शेतकर्‍यांच्या शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडु नयेत तसेच लाकडाऊन काळातील वीजबील माफ करावे या मागणीसाठी वीजवितरण कंपनी आणि सरकारच्या … Read more

एका दिवसात राज्याने ओलांडला २५ हजार रुग्णांचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- महाराष्ट्रात विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीये. राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल २५६८१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यात कोरोनामुळे एकूण ७० जणांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४२ टक्क्यांवर आले असून मृत्युदर २.२० टक्क्यांवर आला आहे. आज शुक्रवारी १९ मार्च रोजी … Read more

ब्रेकिंग : जगभरात WhatsApp झाले होते Down !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- लोकप्रिय असलेले Whatsapp, Instagram व फेसबुक मेंसेंजर आज (शुक्रवारी) रात्री जगभरात ठप्प झाले होते. लाखो युजर्सने ही तक्रार केली की Whatsapp मेसेज सेंट होत नाही किंवा येत नाही. इन्स्टंट मॅसेजिंगसाठी सर्वाधिक प्रमाणावर वापरले जाणारे Whatsapp सध्या डाऊन आहे. जगभरातील युजर्सना याचा फटका बसला. आयओएस आणि अँड्रोइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील … Read more

बाळ बोठेच्या घराची पोलिसांकडून पुन्हा झाडाझडती, पोलिसांच्या हाती लागल्या महत्त्वाच्या वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पुन्हा पोलिसांनी आज झाडाझडती घेतली.  त्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू हाती लागल्या असल्याचे पोलिस सूत्राकडून समजते. तसेच बोठे याची शनिवारी (दि.२०) पोलिस कोठडी संपत असून त्याला पारनेर न्यायालयात हजर … Read more

महत्वाची माहिती : आता “दलित” शब्दाऐवजी होणार ह्या शब्दाचा वापर

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याची बाब समोर आली होती. राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धीगंत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नांवे देण्याबाबत शासन निर्णयाद्वारे … Read more

मोठी बातमी ! खाजगी कार्यालयांसाठी सरकारनं जारी केला महत्त्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-राज्यात कोरोनाचा धोका वाढू लागल्याने राज्य सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. हॉटेल, मंगल कार्यालयांवर निर्बंध आणल्यानंतर आज राज्य सरकारने नवीन नियमावली जारी करीत खाजगी कार्यालयांवर निर्बंध घातले आहेत. जाणून घ्या काय आहे नव्या गाईडलाईन्स? :- राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी … Read more

अहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवसात तब्बल 660 रुग्ण तर वाढले इतके मायक्रो कंटेन्मेंट झो…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  अहमदनगर शहरात आणखी चार सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आलीय. शहरात आतापर्यंत १९ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढतोय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या १९ :- नगर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात अशी होणार MPSC परीक्षा वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा दिनांक २१ मार्च, २०२१ रोजी एकूण ५१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे, या परीक्षेसाठी एकूण १५ हजार ८४७ विद्यार्थी बसले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी १ हजार ६३८ अधिकारी – कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे … Read more

आता ‘त्यांना’ देखील मिळणार वेतन!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  राज्यातील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, अघोषित,अंशत : विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना वेतन मिळावे यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. राज्य सरकारने हा निधी तातडीने मंजूर केला असल्याने आता या विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना वेतन मिळणार असल्याची माहिती आ.डॉ.तांबे यांनी दिली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, अंशत … Read more

बाष्पीभवनामुळे पाणी पातळी खालवते; मात्र समाधानकारक जलसाठा शिल्लक

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- गोदावरी नदीपात्रात मागील वर्षीही एप्रिलपर्यंत पाणीसाठा होता. यामुळे नदीकाठासह परिसरात पीक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली होती. यंदाही तीच परिस्थिती आहे 231 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या वसंत बंधार्‍यात फेब्रुवारीअखेरपर्यंत चांगला पाणीसाठा होता. गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होण्याची क्रिया जलदगतीने होऊन पाणी कमी झाले आहे. त्यामुळे बंधार्‍याजवळील … Read more

‘या’ घोषणाबाज काँग्रेस मंत्र्याचे मंत्रिपद जाणार?

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-संपूर्ण महाराष्ट्रातून वीज कापण्यावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. हे सर्व प्रकरण हाताळू न शकल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पद धोक्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ऊर्जामंत्रिपद जाऊ शकतं अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउन काळामध्ये १०० युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर ऊर्जामंत्री ठाम असल्याचं त्यांनी … Read more

अशोक चव्हाण म्हणतात, ‘त्यांना’ मुख्यमंत्री बनण्याची घाई

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-नारायण राणे काही झाले की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतात. ती त्यांची नित्याची सवय झालेली आहे. त्यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई झालेली आहे, अशी टीका मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. सचिन वाझे प्रकरणाबाबत अशोक चव्हाण म्हणाले, या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. ते कुणालाही पाठीशी घालणार नाहीत. तिन्ही पक्षांचीही तशीच मागणी … Read more

राज्यात कोरोनाचा कहर ; 24 तासात आढळले एवढे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोना फोफावू लागला आहे. दरदिवशी आकडेवारीमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २५ हजार ८३३ … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- उन्हाळ्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांतील वातावरणात बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या ताज्या अद्ययावत माहितीत म्हटले की, पश्चिम विक्षोभ पुन्हा एकदा देशात सक्रिय आहे, ज्यामुळे बर्‍याच राज्यात वादळाची शक्‍यता आहे. ज्यामुळे पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला … Read more

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु, देशाच्या ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असून देशाच्या ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. यामुळे केंद्र सरकारनेदेखील तातडीने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. बुधवारी एका दिवसात कोरोनाचे … Read more

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या – चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी … Read more

माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे पार्थिव अहमदनगरकडे रवाना

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी (दि.१७) पहाटे निधन झाले. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार चालू होते. अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार :- गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांचा पार्थिव दिल्ली येथून नगरला … Read more

पुन्हा लॉकडाऊन नाही, तर ‘हे’ करणार : आरोग्य मंत्री

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोविड नियंत्रण उपाययोजना सुरू आहे. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहे. पुन्हा लॉकडाउन न करता कडक निर्बंध आणणार आहे. राज्य सरकार लवकरच नवीन नियामवली जाहीर करणार आहे’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना … Read more