अहमदनगर ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण जाणून घ्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-   जिल्ह्यात आज २१५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार ४४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत  २३५ ने वाढ झाल्याने उपचार … Read more

पत्रकार बाळ बोठेला अटक ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण आणि सत्य …

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  मागील वर्षी 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पत्रकार बाळ बोठे याचे नाव आले. मात्र तेव्हापासून बोठे हा फरार आहे. गेल्या तीन महिन्यापासून बोठे याचा शोध लागला नाही.  राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. … Read more

संतापजनक : विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून शाळेतच बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने शाळेतच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, नराधम मुख्याध्यापकाच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनीच विद्यार्थिनीवर होत असल्याच्या अत्याचाराच्या … Read more

परीक्षा कशा घ्यायच्या आज होणार निर्णय…

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या महाविद्यालये बंद असून ऑनलाईन क्लासेस सुरु आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कशा घ्यायचा हा प्रश्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनासमोर आहे. अशातच मंगळवारी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत प्रथम सत्राच्या परिक्षेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न सुमारे साडे सहा लाख … Read more

जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुकलीचा अकस्मात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- जंतनाशक गोळी दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील प्रांजल अंकुश रक्ताटे ह्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आष्टी येथील लोणी सय्यद मीर या गावात ही घटना घडली आहे. याबाबत प्रांजलचे काका भाऊसाहेब रक्ताटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ”लोणी सय्यद मीर या गावात जिल्हा आरोग्य यंत्रणेचे उपकेंद्र … Read more

आश्चर्यम‌् ! दोन दशकांनंतर सापडलं यात्रेत चोरी गेलेले मंगळसुत्र

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- यात्रेत चोरी गेलेले मंगळसुत्र तब्बल २२ वर्षांनंतर सापडले आहे. ही काही चित्रपट किंवा कथा-कादंबरीमधील कथा नाही, प्रत्यक्षात उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी या गावात घडलेली घटना आहे. मंगळसूत्र चोरीला गेले तेव्हा शकुंतलाबाई शिंदे चाळीस वर्षांच्या होत्या. आता त्यांनी वयाची साठी ओलांडली आहे. २२ वर्षांच्या या लढ्यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार पुन्हा वाढले ‘इतके’रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात  कोरोनाने हाहाकार माजवला असून आज पुन्हा ३२५ रुग्ण वाढले आहेत, यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या १७४० झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. शुक्रवार पासून दररोज तीनशेहुंन अधिक रुग्ण वाढत असल्याने चिंताजनक परीस्थिती निर्माण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात आज २१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार २२७ … Read more

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला ईडीने ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट या कायद्यांतर्गत 71 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीच्या मुंबई झोनल कार्यालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले, सयाजी पांडूरंग जाधव, तानाजी दत्तू पडवळ, शैलेश पडवळ या चौघांना ईडीने अटक केली. ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली आहे. पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार … Read more

महाराष्ट्र दिनापासून समृद्धी महामार्गावर धावणारे वाहने

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- मुंबई-नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 700 किमी पैकी 500 किमीचे काम पुर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी मार्ग महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2021 रोजी मार्ग खुला करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प 2021 विधानसभेत सादर केला. राज्यातील रस्तेवाहतूक, … Read more

केंद्राची ‘ती’ भूमिका राज्याच्या पाठीत खंजीर खुपसणारी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारनं पूर्णपणे राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याप्रकरणी मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जी भूमिका घेतली, ती मराठा समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी आहे,’ असा आरोप काँग्रेसनं केला आहे. ‘केंद्राच्या विरोधी भूमिकेनंतरही महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणासाठी लढणाऱ्या सर्व राज्यांना … Read more

लवकर करा तुमची बँकेची कामे कारण चार दिवस बँका राहणार बंद?

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ संघटनांनी पुढील आठवड्यात दोन दिवस संप जाहीर केला आहे. १५ आणि १६ मार्च रोजी संपाची हाक दिली आहे. दरम्यान, १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवार असल्याने सलग चार … Read more

Maharashtra Budget 2021 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.  तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कृषी … Read more

महिला दिनी महिलांना मिळणार घरकुलाचा लाभ !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- राज्यात जागतिक महिला दिनापासून म्हणजेच आजपासून महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतंर्गत महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच स्वयंसाहय्यता गटातील 100 टक्के लाभार्थी महिलांना घरकुलांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने मागील महिन्यांत काढलेला … Read more

‘त्या’आगीत दुकानातील सर्व हेल्मेट जळून खाक !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  एका हेल्मेटच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ‘त्या’ दुकानातील सर्व हेल्मेट खाक झाले. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील एआयपीटी समोर घडली. दिपक हेल्मेट असे या दुकानाचे नाव असून, रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत दुकानातील सर्व हेल्मेट जळून खाक झाले, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आग लागल्यानंतर हडपसर येथील … Read more

वर्षातून एकदा नव्हे हा दिवस ‘दररोज’ साजरा व्हावा! गृहमंत्री देशमुख यांची महिला पोलिस कर्मचाऱ्यांना खास भेट

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या रक्षणासाठी कोणत्याही संकटाला अत्यंत खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या. कितीही कठिण प्रसंग आला तरीदेखील विचलीत न होणाऱ्या, आपल्या पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सलाम करून महिला दिनाची खास भेट दिली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्री देशमुख यांनी राज्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना … Read more

राज्यातील ‘या’ महत्त्वाच्या प्रश्नावर सोमवारी ऑनलाइन सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आिण बहुचर्चित अशा मराठा आरक्षणावर असलेल्या सोमवारी (८ मार्च) ऑनलाईन पद्धतीने सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणी संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता उद्या आरक्षणाप्रकरणी सुनावणी होणार आहे. ८ मार्च १० … Read more

आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाला टाकले जातीबाहेर

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-वैदू समाजातील कृष्णा शिंदे (२१) हा तरुण आंतरजातीय विवाह करत असल्याने समाजाच्या जात पंचायतीने त्याला जातीबाहेर टाकल्याचा दावा या तरुणाने केला. जातपंचायतीचा कुटुंबीयांवर दबाव असल्याचेही या तरुणाने सांगितले. दरम्यान, याबाबत पोलिसांत अजून कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. नऊ महिन्यापासून हा तरुण आई-वडिलांचे घर सोडून वेगळा रहात आहे. आई- वडिलांवर दबाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ व्यावसायिकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील अपहरण झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात आढळला आहे.  बेलापूर येथील व्यावसायिक गौतम हिरण यांच्या अपहरणाच्या निषेधार्थ बेलापूर बंद ठेवण्यात आले होते. अपहरणाचा तपास लागत नसल्याने लोकांंमधून तीव्र संताप व्यक्त झाला होता. व्यावसायिक हिरण पाच दिवसांपासून बेपत्ता होते पोलीसांना अद्याप त्यांचा तपास लागला … Read more