ठाकरे सरकारमधील ‘ह्या’ मंत्र्याच्या पत्नीची ईडीकडून चौकशी !

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीच्या कारवाया सुरु आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून सुडापोटी या कारवाया केल्या जात असल्याचे स्पष्टीकरण यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी दिले आहे. नुकतेच पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या … Read more

..आता माझी हत्या होणार! पुजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- आता माझी हत्या होणार आहे. पूजा प्रकरणातील जे आरोपी आहे तेच माझी हत्या करणार आहे. मुख्यमंर्त्यांपर्यंत मला जाऊ देणार नाही, मला धमक्या येत आहे. संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाणसह त्यांच्या नातेवाईकांपासून मला धोका आहे’, असा खळबळजनक आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे. शांताबाई राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती … Read more

मिरवणूक काढणे पडले महागात आता गजाला मिळणार ‘ही’ सजा

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- निर्दोष सुटल्यानंतर मिरवणूक काढणे कुख्यात गुंड गजा मारणे याला आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे तसेच, त्यापूर्वीच्या फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू घेतल्याचा ठपका गजा … Read more

सरकारचा ‘तो’ उपक्रम ठरला अभिनव : राज्यपालांची सरकारवर स्तुतीसुमने

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  कोरोनाविरोधातील लढा सुरू असून राज्य सरकारने आता मी जबाबदार ही योजना सुरू केली आहे, सरकारचा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. असं म्हणत राज्यपालांनी राज्य सरकारचे एक प्रकारे कौतुकच केले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळीराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या … Read more

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा काळावधीत विविध उपाययोजना करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- एप्रिल व मे मध्ये होणार्‍या शिक्षण मंडळाच्या लेखी परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या वाढत्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, शिक्षक आमदार तथा कार्याध्यक्ष नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर यांनी शालेय शिक्षण … Read more

पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले !

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  पूजाच्या आई-वडिलांकडूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडू शकणार नाहीत. असा खळबळजनक आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे. पूजाला न्याय मिळावा यासाठी … Read more

मुख्यमंत्री म्हणतात: ‘त्यासाठीच’ राठोड यांचा राजीनामा घेतला!

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  जर राठोड दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होणारच, ही सरकारची भूमिका कायम आहे. परंतु सध्या संजय राठोड याच्या राजीनामा मुद्यावरुन गलिच्छ राजकारण केले गेले आहे. या प्रकरणाची पूर्णपणे निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठीच त्यांचा राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आमची जबाबदारी न्यायाने वागण्याची आहे. या प्रकरणात तपास झाला … Read more

‘ह्या’ कार्डाद्वारे पेट्रोल-डिझेल भरल्यास मिळेल कॅशबॅक, जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा या दिवसात वाढत आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढत आहेत. तेलाच्या वाढत्या किंमतींवरून विरोधी पक्ष सरकारवर हल्ला चढवित आहे. त्याच वेळी, लोक किंमती कधी कमी होतील असा प्रश्न विचारत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. देशातील सर्व मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि … Read more

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आज पेट्रोल दरवाढीविरोधात ‘चूल मांडा’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- इंधनाच्या रोज वाढणाऱ्या दारावरून आता राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या बेसुमार वाढीचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे. याचा आता थेट अगदी गाड्यांच्या वाहतुकीपासून ते घराच्या किरणा मालापर्यंत सर्वच क्षेत्रांवर दरवाढीचा परिणाम जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन … Read more

अहमदनगर मध्ये कांदा कोसळला ! प्रचंड घसरण झाल्याने झाले मिळाले ‘असे’ दर…

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याची आवक वाढल्याने काही दिवसांपूर्वी वधारलेल्या कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली असून, कांदा २० ते २४ रूपये प्रतिकिलोवर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा तेवढ्याच वेगाने आता कोसळत आहे.  मागील एक महिन्यापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची … Read more

महाराष्ट्रात वेगाने फोफावणाऱ्या कोरोनाला आवरण्यासाठी उचलले ‘हे’ पाऊल !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते संक्रमण हे आता राज्यासह केंद्र सरकारचीही चिंता वाढवत आहे. त्यामुळे कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी आता केंद्र सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रात वेगाने फोफावणाऱ्या कोरोनाला आवरण्यासाठी केंद्राने एक उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती आता राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रावर परत … Read more

काय सांगता ; 28 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही याविषयी तज्ज्ञांमध्येही अनेक मतभेद आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा वेग पाहता काही जाणकारांनी पुढील एक ते दोन महिने कोरोना रुग्णांची ही वाढ कायम राहिल असं म्हटलंय. दरम्यान महाराष्ट्रातील 36 पैकी तब्बल 28 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. 10 … Read more

नायक ! मला 24 तासांसाठी मुख्यमंत्री करा; बिचकुलेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- बिग बॉस फेम अभिजित बिचुकले नेहमी आपल्या काही बेताल विधानासाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान आता अभिजित बिचुकले यांनी उद्धव ठाकरेंकडे एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तशा आशयाचं पत्रच अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल आहे. उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा तरी द्या अन्यथा सक्तीच्या रजेवर जा. तुमचे सर्व … Read more

कोरोनाच्या पार्शवभूमीवर ‘या’ जिल्ह्यात सात दिवसांची संचारबंदी

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी वाढवली आहे. अमरावती, अचलपूर ,अंजनगाव सूर्जी शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या तिन्ही शहरात 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. दरम्यान अमरावतीमध्ये 22 फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी … Read more

‘त्याने’ नको ते पाहिले अन् आपल्या जीवालाच मुकला!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-एक विवाहित महिला व अविवाहित तरूणाचे अवैध संबंध एका तरूणाने पाहिले. आता आपल्या या संबंधांची चर्चा तो संपूर्ण गावात करेल या भितीपोटी ती महिला व तिचा प्रियकर या दोघंानी मिळून या तरूणाचा खून केल्याची घटना  नांदेड मधील देलगूर तालुक्यातील कुंडली गावात घडली  आहे. जगदिश हानमंत जाधव  (वय २७) असे … Read more

आनंदवार्ता: मागील वर्षीचा ‘त्या’ शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  जिल्हयातील सन २०१९ – २० चा खरीप  व रब्बी हंगाम (आंबे बहार फळबाग) मंजूर झालेला परंतु शेतकऱ्यांना न मिळालेला पीक विमा जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. वंचित शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी किंवा पारनेर बाजार समितीशी … Read more

पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या अहमदनगर मधील दर

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात अनेकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे महागाईने मोडले आहे. आता पेट्रोलच्या दरातही वाढ झाली आहे. देशात काही ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या किमतीने दरवाढीचे सर्व … Read more

मार्चनंतरच राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणूका होणार

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-   राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक गोष्टी पुन्हा बदलू लागल्या आहेत. तसेच प्रशाकीय पातळीवर पुन्हा अनेक निर्णय घेण्यात येऊ लागले आहे. दरम्यान वा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सहकार खात्याने आधीच सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकल्या आहे. त्यानुसार आता 24 जानेवारीपासून राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणूका पुढील तीन महिन्यांसाठी पुढे … Read more