राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याच्या आरोपाखाली दाखल याचिका न्यायालयाने रद्द केली

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्याविरुद्ध राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याच्या आरोपाखाली याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त (ऑगस्ट 2014) राष्ट्रध्वजाची रांगोळी काढण्यात आली होती. ध्वजवंदनानंतर विद्यार्थी आणि … Read more

राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत घसघशीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यापुढे स्थानिक विकास निधीअंतर्गत प्रतिवर्षी ३ कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी सन २०११-१२ पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदारास २ कोटी विकास निधी प्राप्त होत होता. विधान परिषदेचे ७८ आणि विधानसभेचे २८८ आमदार राज्य विधिमंडळात आहेत. अलीकडच्या काळात बांधकाम … Read more

दिव्यांगी लांडेला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पश्चिम विभागीय मैदानी स्पर्धा

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर येथील दिव्यांगी कृष्णा लांडे या खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले . पश्चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा कोटा स्टेडियम रायपूर ,छतिसगड येथे दि .२४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुरू आहेत. ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनची खेळाडू दिव्यांगी कृष्णा लांडे ही महाराष्ट्राकडून १४ वर्ष वयोगटात ६० मीटर … Read more

सरकार राबवणार “मिशन झीरो” अभियान

 अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्यात १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील ३ लाख ३७ हजार ९७८ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून २ लाख ९८ हजार ०९७  लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत १ लाख ८५ हजार ०३० घरकुले बांधून पूर्ण झाली असून उर्वरीत घरकुले ३१ मार्चपर्यंत पूर्ण करुन “मिशन झीरो” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

‘त्या’ शाळांवर कारवाई अटळ : शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :- कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावणे, ज्या विद्यार्थ्यानी फी भरली नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढणे, मागील सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणे, उशिरा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणे. अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, याबाबत ज्या शाळांसंदर्भात अशा तक्रारी आहेत त्या … Read more

आता कमी खर्चात आपत्तीरोधक घरकुलांची निर्मिती करणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :- राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाऊंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये भागीदारी करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. राज्यात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घरकुल डिझाईन करणे, कमी खर्चातील पण दर्जेदार अशा घरकुलाचे तंत्रज्ञान विकसीत करणे तसेच भुकंप, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा … Read more

वर्क फ्रॉम होमची परिणामकारक यंत्रणा निर्माण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना आज दिल्या. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आज वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन … Read more

खासदार डेलकर यांच्या आत्महत्येचा पोस्‍टमार्टम रिपोर्ट आला

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५८) यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मोहन यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. गुजराती भाषेतील चिठ्ठीत काही राजकीय पुढारी, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याचे समजते आहे. मात्र याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. खासदार डेलकर आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी … Read more

पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वाना सारखेच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत ‘ह्या’ वेळेत संचारबंदी !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणून नगर जिल्ह्यात १५ मार्चपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींना फिरण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणुन,  … Read more

भाजपासोबत आम्ही गेलो याचा अर्थ आम्ही निळा झेंडा खाली ठेवलेला नाही…

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शूटिंग बंद पाडू, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची गुंडागर्दी महाराष्ट्रात चालू देणार नाही. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी रिपब्लिकन पक्षाच्या … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे जनतेला भावनिक आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता वाढत आहे. यात अनेक प्रमुख मंत्री देखील कोरोना बाधित झाले आहेत.यात  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा देखील समावेश आहे. मात्र ते रूग्णालयात असतानाही राज्यातील जनतेला कोरोना पासून बचाव करण्यासाठी आवाहन केले आहे. ते म्हणतात की ,वर्षभरापासून आपण कोरोना विरुध्दची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, … Read more

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची प्रेम संबंधातून आत्महत्या ?

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  टिकटॉक स्टार ‘समीर गायकवाड’या तरुणाने रविवारी (दि. २१) सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. समीरचे वय २२ वर्ष होते. दरम्यान, समीरने हे पाऊल प्रेम संबंधातून उचलेले असल्याचे बोलले जात आहे. वाघोली परिसरातील निकासा सोसायटी येथील राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन समीर गायकवाडने आत्महत्या केली. ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पाच जण जागीच ठार !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना सोमवारी दि २२ रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली आहे.  मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे … Read more

महाविकास आघाडीने जिल्हा बँकेत भाजपाला पराभवाची धूळ चारली

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी रविवारी झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या नगर तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघ या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले. या शिवाय पारनेर व कर्जत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अनुक्रमे उदय शेळके, अंबादास पिसाळ निवडून आले आहेत. तर बिगरशेती संस्था मतदारसंघात प्रशांत गायकवाड … Read more

जिल्हा बँक आमदारांच्या कुटुंबियांसाठी राखीव आहे का …..?

लेखक – हेरंब कुलकर्णी :- अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक झाली. एकूण २१ संचालकांपैकी १३ संचालक हे आमदार, माजी आमदार किंवा आमदारांच्या कुटुंबीयांपैकी आहेत म्हणजे ६२ टक्के प्रतिनिधी हे आमदार कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे ही बँक आमदारांच्या कुटुंबियांसाठी राखीव आहे काय असा प्रश्न पडतो… सहकाराला गती देताना तळागाळातल्या माणसांचे आर्थिक सक्षमीकरण व त्याच वेळी सामान्य कुटुंबियांतील … Read more

Corona Live Updates : उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना राज्यात बंदी !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद  साधला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, काय बंद होणार याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. फेसबुक Live च्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधला आहे.  आपल्या राज्यात … Read more

पेट्रोलच्या दराने ९७ रुपये, तर डिझेलच्या दराने ८८ रुपयांची उंची गाठली

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- शनिवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या दराने ९७ रुपये, तर डिझेलच्या दराने ८८ रुपयांची उंची गाठली आहे. पेट्रोलच्या दरात विक्रमी ३९ पैसे आणि डिझेलच्या दरात ३७ पैशांची वाढ झाली आहे. सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर चढेच राहिल्याचे दिसून आले आहे. २०१७ मधील दरवाढीचा आढावा घेतल्यानंतर … Read more